Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यासह 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट! पुढील 5 दिवस धोक्याचे; वाचा हवामान अंदाज

Maharashtra Mumbai Weather Report IMD Alert Update News: विशेषतः २८ आणि २९ सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे प्रशासनाने सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

 Maharashtra Weather Update News: राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत असतानाच आता मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी आगामी पाच दिवसांसाठी गंभीर हवामान इशारा जारी केला आहे. विशेषतः २८ आणि २९ सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे प्रशासनाने सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Mumbai Thane Palghar Raigad Weather Update IMD Alert News)

पुढील पाच दिवस  धोक्याचे, काय आहे हवामान अंदाज?

  शनिवारी २७ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या चारही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला असून जोरदार ते अति जोरदार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा असण्याची शक्यता फार जास्त आहे. यामुळे नागरिकांनी गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. उद्या, २८ सप्टेंबर रोजी परिस्थिती अधिक गंभीर होणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या सर्व जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा कायम राहणार आहे. 

२९ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे आहे. तर ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा सुरू राहील. तसेच   ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी म्हणजेच महिन्याच्या शेवटच्या आणि पुढील महिन्याच्या पहिल्या दिवशी या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rains Live Update: सोलापुरला पुन्हा पुराचा धोका! सीना नदीत पूर येण्याची दवंडी

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या या गंभीर इशाऱ्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच, समुद्रात न जाण्याच्या सूचना मच्छीमारांना देण्यात आल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणांनी संभाव्य पूर आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी करावी, असे निर्देश जारी करण्यात आले आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.