3 days ago

Maharashtra Live Blog: बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात काल सर्वात महत्त्वाची घडामोड घडली असून मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे पोलिसांच्या रडारवर असलेल्या वाल्मिक कराडचीही सीआयडी चौकशी सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी होत आहे. आज पुण्यात सर्वपक्षीय सभेला मोठी गर्दी झाली होती. यावेळी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही दुपारी पत्रकार परिषद घेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना धमकी दिली जात असल्याचा आरोप केला. त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्या जात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. 

Jan 05, 2025 19:52 (IST)

बीडमधील वादग्रस्त पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची बदली

 बीडमधील वादग्रस्त पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची बदली

वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी तडकाफडकी बदली 

गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षाला बदली

खासदार बजरंग सोनावणे यांच्याबद्दल Whatsapp वर केली होती वादग्रस्त पोस्ट

Jan 05, 2025 18:37 (IST)

मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात परळीत अदखलपात्र गुन्हा दाखल

Manoj Jarange Patil :  धनंजय मुंडे यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा परळीत तीव्र निषेध करण्यात आला. जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली होती. परळी शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन घेतला आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता अखेर परळी शहर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jan 05, 2025 17:13 (IST)

नवी मुंबईत डंपरची 3-4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू

नवी मुंबईतील सायन महामार्गावर भीषण अपघात.  जुईनगर येथील मार्गावर एका डंपरने एका मागोमाग तीन ते चार वाहनांना धडक दिली.  अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच नेरुळ पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. पोलीस फरार डंपरचालकाचा शोध घेत आहेत.

Jan 05, 2025 16:14 (IST)

रायगडमधील खालापूर येथील SPR कंपनीला सिपला कंपनीच्या समोर कंपनीला भीषण आग

Raigad News : रायगडमधील खालापूर येथील SPR कंपनीला सिपला कंपनीच्या समोर कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल दाखल झाल्या असून आग नियंत्रिक करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement
Jan 05, 2025 16:13 (IST)

शिवसेनेचा ठाकरे गटाला धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षाला जय महाराष्ट्र

मुरबाड , पालघर, जव्हार, मोखाडा, नवी मुंबई , बीड , परभणी, धुळे या ठिकाणचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश,  ठाणे जिल्ह्यातले सगळे जिल्हा प्रमुख आणि नगरसेकांचा पक्षप्रवेश

Jan 05, 2025 15:21 (IST)

Live Update : दलित समाजाच्या लेकराची बाजू घेतली म्हणून संतोष देशमुख यांची हत्या - सुरेश धस

दलित समाजाच्या लेकराची बाजू घेतली म्हणून संतोष देशमुख यांची हत्या - सुरेश धस

Advertisement
Jan 05, 2025 15:15 (IST)

Live Update : बीडचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शेकडो धनंजय मुंडे समर्थक दाखल

बीडचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शेकडो धनंजय मुंडे समर्थक दाखल 

अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

मनोज जरांगे पाटील यांनी देखील आक्षेपार्ह बोलल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी 

Jan 05, 2025 15:01 (IST)

Live Update : मंत्रिपद सोडा, राज्याच्या राजकारणातून निवृत्ती घेतो पण संतोष देशमुखाला परत आणून द्याल का? - सुरेश धस

मंत्रिपद सोडा, राज्याच्या राजकारणातून निवृत्ती घेतो पण संतोष देशमुखाला परत आणून द्याल का? - सुरेश धस

Advertisement
Jan 05, 2025 14:50 (IST)

Live Update : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात एका महिलेची आत्महत्या

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात एका महिलेची आत्महत्या 

- एका झाडाला गळफास घेत केली आत्महत्या 

- आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट 

- पंचवीस वर्ष महिलेने केली आत्महत्या

 

- सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल, अधिक तपास सुरू

- जिल्हा शासकीय रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर

Jan 05, 2025 14:23 (IST)

Live Update : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध ओबीसी समाज आक्रमक

परभणी येथे मनोज जरांगे पाटील यांनी काल कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हिंगोलीत ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ओबीसी समाज बांधव हिंगोली शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यामुळे जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होऊन महाराष्ट्रमधील वातावरण खराब होत असल्यान मनोज जरांगे पाटील यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत ओबीसी समाजाकडून हिंगोली शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केल आहे.

Jan 05, 2025 14:21 (IST)

Live Update : नाशिकमधून चोरीला गेलेलं पाच दिवसाचं बाळ अखेर सापडलं

नाशिक जिल्हा रुग्णालयातून चोरीला गेलेलं पाच दिवसाचं बाळ अखेर सापडलं असून नाशिक गुन्हे शाखा  पथकाने नाशिकच्या दिंडोरीतून बाळाला 12 तासांच्या आत सुखरूप ताब्यात घेतलं आहे. स्वतःला बाळ होत नसल्याने धुळ्याच्या सपना मराठे या 35 वर्षीय महिलेने बाळ चोरल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. गेल्या 8 दिवसांपासून सदर महिला बाळ चोरण्याच्या उद्देशाने जिल्हा रुग्णालय परिसरात रेकी करत होती आणि काल दुपारी बारा वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातून प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या आणि नुकताच डिस्चार्ज मिळालेल्या एका महिलेचे बाळ तिने पळवले होते. बाळ चोरी करून सदर बाळ दिंडोरीत आपल्या आई वडिलांच्या स्वाधीन तिने केले होते. दरम्यान या घटनेमुळे नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Jan 05, 2025 14:19 (IST)

Live Update : मुंबई-नाशिक महामार्गावर कारला भीषण आग, वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मुंबई-नाशिक महामार्गावर कारला भीषण आग, वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मुंबई-नाशिक महामार्गावर दिवा गावाजवळ एका चारचाकी वाहनाला अचानक भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. मात्र, कारमध्ये असलेल्या एका व्यक्तीला वाहतूक पोलिसांनी तात्काळ कारमधून बाहेर काढत सुरक्षित वाचवले.

Jan 05, 2025 14:19 (IST)

Live Update : हेलिकॉप्टर दोन वेळा उडता उडता खाली आलं, ओव्हरलोडमुळे हेलिकॉप्टर टेक ऑफमध्ये अडचणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार चिपळूणमधील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमावरून परत जात असताना त्यांचं हेलिकॉप्टर दोन वेळा उडता उडता पुन्हा खाली आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. हेलिकॉप्टर मध्ये शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

ओव्हरलोडमुळे हेलिकॉप्टर टेक ऑफ झालं नसावं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओव्हरलोड  झाल्यामुळे हेलिकॉप्टर टेक ऑफ होण्यात अडचणी आल्या असाव्यात असे म्हटले जात आहे. एक व्यक्ती हेलिकॉप्टरमधून खाली उतरवण्यात आल्यानंतर हेलिकॉप्टरचं सुखरूप उड्डाण झालं. 

Jan 05, 2025 14:16 (IST)

Live Update : पुण्यातील जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर

पुण्यातील जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन पोहचला आहे. याठिकाणी उभारलेल्या व्यासपीठावरून आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसोबत इतर अनेक नेते हे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करणार आहेत

Jan 05, 2025 13:48 (IST)

Live Update : पुण्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा

Jan 05, 2025 13:20 (IST)

Live Update : पोरबंदरमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू

पोरबंदरमधील कोस्टगार्ड एअरपोर्टवर हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू

Jan 05, 2025 12:50 (IST)

Wardha News: वर्ध्याच्या आर्वी येथे जनावरांना विषबाधा; 11 जनावरे दगावली

वर्ध्याच्या आर्वी येथे चराईसाठी गेलेल्या जनावरांना विषबाधा झाल्याने अकरा गुरांचा मृत्यू झाला आहे. आर्वी येथील शेतकरी जानराव वहाने आणि सुधाकर वहाने व दिनेश बर्डे या शेतकऱ्यांच्या म्हशींचा मृत्यू झालाय. दिडशेच्या जवळपास पशुधन या भागात विषबाधेमुळे आजारी असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे या भागात आपली जनावरे चराईसाठी पाठविली पण शेतात असलेल्या कपाशीची बोंडे खाल्ल्याने विषबाधा झाली आणि जनावरे आजारी पडत आतपर्यंत 11 जनावरांचा मृत्यू झालाय, खाजगी पशु तज्ञाकडून उपचार घेण्यात आले आहेय. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पशुधनाचे नुकसान झाले आहे त्यामुळे पशु पालकांमध्ये भीतीचे वातवरण आहे.

Jan 05, 2025 12:45 (IST)

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य नोंदणीचा संकल्प: मुक्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'आज संघटन पर्वाच्या निमित्ताने सदस्यता नोंदणी अभियान होत आहे. संघटन पर्वाच्या शुभेच्छा. पहिल्या दोन तासांत 25 हजार नवे सदस्य झाले. आपल्या महानगर परिसरात विविध क्षेत्रात माझ्या कोड चा वापर करत कार्यरत 25 लोकांना सदस्य केले आहे. मी सदस्य बनविलेला एकेक व्यक्ती 25 हजार सदस्यांच्या बरोबरीचा.

भाजप आणि भाकप सोडली तर बाकी राजकीय पार्ट्या कोणत्या न कोणत्या परिवाराच्या खाजगी मालकीच्या आहे.  कम्युनिस्ट पार्टी आता राष्ट्रीय पार्टी राहिलेली नाही. भाजप देशात एकमेव राष्ट्रीय पक्ष ज्याची मालकी कुठल्याही परिवाराकडे नसून जनतेकडे.

खालपासून वर पर्यंत पूर्णपणे लोकतान्त्रिक पार्टी भाजप. याच पक्षात संभव आहे की लहानपणी चहा विकणारा पोऱ्या पुढे देशाचा पंतप्रधान आणि जगाचा सर्वात लोकप्रिय नेता ठरू शकतो. मी वॉर्ड स्तरावरून काम करत करत तीन वेळा मुख्यमंत्री पदावर पोहोचलो. संघटन पर्वाला भाजप मध्ये अनन्य साधारण महत्त्व.

Jan 05, 2025 09:49 (IST)

Washim Accident: रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर थेट नाल्यात कोसळला; 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

वाशीम ते रिसोड मार्गावर हराळ फाट्याजवळ  ट्रॅक्टर थेट नाल्यात कोसळल्याने या ट्रॅक्टरखाली तरुणाचा दबून मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली आहे. या एकेरी अपघातात 21 वर्षीय तरुणचा मृत्यू झालाय. मयत झालेल्या तरुणाच अर्जुन मदन भडके  अस नाव असून हा तरुण हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील रहिवाशी होता.रिसोड इथून ट्रॅक्टरचे काम अर्जुन फडके हा ट्रॅक्टर घेऊन रात्री हिंगोलीकडे निघाला होता. 

मयत अर्जुन हा दोन वर्षांपूर्वी दुचाकीच्या भीषण अपघातातून बचावला होता. सोबत असलेल्या दोन  मित्रांचा अपघातात मृत्यू झाला होता.

तीन महिने उपचार केल्यानंतर तू बरा झाला होता मात्र दोन वर्षानंतर परत एकदा अर्जुनला अपघाताने गाठले व त्यात त्याचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेमुळे कुटुंबीय व गावाकऱ्यावर शोककळा पसरली आहे.

Jan 05, 2025 09:48 (IST)

Suraj Chavan: सुरेश अण्णा धस यांना आवरावे... राष्ट्रवादीच्या नेत्याचा इशारा

स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आ.सुरेश अण्णा धस जाणीव पूर्वक राजकारण करत आहेत.परभणीच्या सभेत अजित दादांना क्या हुआ तेरा वादा ...म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेश अण्णा ला माझा प्रश्न आहे आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत मग गृह खातं झोपा काढत आहे का ? निष्पक्ष चौकशी होईल म्हणून तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का?

स्व.संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक जरी नेता,कार्यकर्ता जर चौकशीत दोषी आढळला तर अजित दादा त्यांच्यावर कार्यवाही करायला गय करणार नाहीत. फडणवीस साहेब यांना विनंती आहे आ.सुरेश अण्णा धस यांना आवरावे. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याच काम ते करत आहेत. विनाकारण अजितदादांना या प्रकरणात बदमान करण्याचं काम केलं तर जशास तस उत्तर आम्ही देऊ.

Jan 05, 2025 08:59 (IST)

Ind Vs Aus: सिडनी कसोटीत टीम इंडियाचा पराभव, ऑस्ट्रेलियाचा 6 विेकेट्सने विजय

ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट मैदानावर सुरु असलेला पाचवा कसोटी सामना टीम इंडियाने गमावला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी  162 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने तीन बळी गमावत हा सामना जिंकला असून 3- 1 ने मालिकाही खिशात घातली आहे. 

Jan 05, 2025 08:14 (IST)

Meghana Kirtikar News: माजी खासदार गजानन कीर्तिकर यांना पत्‍नी शोक

शिवसेनेचे  नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या पत्‍नी स्‍व. मेघना गजानन कीर्तिकर यांचे अल्‍पश: आजाराने दु:खद निधन झाले.  रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता वयाच्‍या ८२व्‍या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर शिवधाम स्‍मशानभूमी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व) येथे त्यांच्यावर अंत्‍यसंस्‍कार होतील.

Jan 05, 2025 07:56 (IST)

Shivshahi Bus: शिवशाही धावणार की थांबणार; जिल्ह्यात १६ बसेसची होणार तपासणी

वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिवशाही बसची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे अहवाल सादर करण्यात येणार असून, त्यानंतर शिवशाही धावणार की थांबणार, हे ठरणार आहे.

भंडारा आगाराकडे 11, तुमसर आगाराकडे 5 शिवशाही आहेत, तर साकोली व पवनी आगाराकडे एकही शिवशाही नाही. भंडारा आगाराच्या ताफ्यात साधारणतः पाच ते सहा वर्षांपूर्वी शिवशाही दाखल झाली. प्रारंभी शिवशाहीचे महामंडळाचे चालक, वाहक, कर्मचाऱ्यांसह प्रवाशांतून स्वागत झाले. परंतु, शिवशाही बसच्या अपघाताच्या घटनांत वाढ झाल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न राज्य मार्ग महामंडळाच्या वतीने करण्यात येत असून, तपासणी अहवाल सादर झाल्यानंतर शिवशाही ताफ्यात राहणार की नाही, हे निश्चित होणार आहे

Jan 05, 2025 07:54 (IST)

Raksha Khadse: पक्षात कोणाला घ्यायचं किंवा नाही हे गिरीश महाजन ठरवतील: रक्षा खडसेंचे विधान

गिरीश महाजन हे आमचे ज्येष्ठ नेते असून पक्षात त कोणाला घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हे गिरीश महाजन ठरवत आलेले आहेत व यापुढेही तेच ठरवणार असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले आहे. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एका नेत्यासह शिवसेना ठाकरे गटाचे नेते हे भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे आणि या प्रश्नावरून रक्षा खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 05, 2025 07:51 (IST)

Sangli Crime: पोलीस कंट्रोल रूममध्ये बॉम्ब ठेवल्याचा खोटा कॉल; तरुणाला अटक

सांगली पोलीस कंट्रोल रूम मध्ये बॉम्ब लावला आहे आणि मदत हवी आहे, असा खोटा कॉल केल्याचा प्रकार सांगली पोलिसांबाबत आज घडला आहे,यानंतर सांगली पोलिसांची एकच तारांबळ उडाली. त्यानंतर पोलिसांकडून जिल्हा पोलीस मुख्यालयातल्या कंट्रोल रूम परिसराचे बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली,मात्र कोणताही संशयस्पद गोष्ट आढळून आली नाही,त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला,दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करत कॉल करणाऱ्या इसमाला शोधून काढत अटक केली आहे.यमनाप्पा माडर,राहणार मालगाव तालुका मिरज,असे या व्यक्तीचे नाव असून दारूच्या नशेत त्याने हा खोटा कॉल केल्याचा समोर आले असून याआधीही त्याने अशाच प्रकारचा बॉम्ब ठेवल्याचा खोटा कॉल केल्याचे प्रकार केला होता,या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील झाला होता.

Jan 05, 2025 06:37 (IST)

Dharashiv: धाराशिव- तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाचा पहीला टप्पा 18 महीन्यात पुर्ण होणार

सोलापूर - तुळजापूर - धाराशिव रेल्वे मार्गाच्या कामाचे काम सुरू झाले असुन धाराशिव ते तुळजापूर या 30 किलोमीटर रेल्वे मार्गाचे पहील्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर आहे.  दरम्यान या कामाची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पाहणी करुन आढावा घेतला तर हे काम 18 महीन्यात पुर्ण होईल असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला, गेल्या अडीच वर्षांमध्ये ठाकरे सरकार असल्यामुळे हे विकास काम रेंगाळले होते परंतु आता या कामाला गती मिळाली आहे. या रेल्वेमार्गाचे काम झाल्यावर तुळजापूरला येणाऱ्या भाविक भक्तांची मोठी सोय होणार आहे.

Jan 05, 2025 06:35 (IST)

Dharashiv News: गायब झालेल्या थंडीचे झाले पुन्हा आगमन, १३ अंशांवर किमान पारा घसरला

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील थंडी गायब झाली होती. दोन दिवसांपासून अचानक थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी पुन्हा गरम कपड्यासह कानटोप्या बाहेर निघत आहेत.  दोन दिवसांपूर्वी १७ अंशांवर स्थिरावला. किमान तापमानाचा पारा दोन दिवसांपासून कमी होत आहे. किमान तापमानाची नोंद १३ अंशांवर झाली आहे. आगामी काळात १० ते १२ अंशांपर्यंत किमान तापमानाची नोंद होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेली थंडी आगामी काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Jan 05, 2025 06:34 (IST)

Ratnagiri News: शिवसेनेत जोरदार इनकमिंग, भाजपसह मविआमधील बड्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

लांजामध्ये शिवसेना उबाठा, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसला धक्का बसला आहे. या चारही पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. लांजामधील भाजपचे माजी तालुकाप्रमुख, जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक मुन्ना खामकर, शिवसेना उबाठाच्या लांजा शहर महिला संघटक छाया गांगण, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि लांजा शहरातील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न उर्फ दादा शेट्ये, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरीफ नाईक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सर्वांच्या पक्ष प्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेला लांजात आणखी बळकटी आली आहे. त्यामुळे एकूणच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिंदेंच्या शिवसेनेची लांजा-राजापूरमध्ये मोर्चेबांधणी केल्याचं दिसून येत आहे..