2 hours ago

Mahashivratri 2026 LIVE Updates: आज देशभरात महाशिवरात्रीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडत आहे. भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस म्हणून महाशिवरात्रीचा सण साजरा होतो. हिंदू धर्मात महाशिवरात्रीच्या व्रताला अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भक्त कडक व्रत करून महादेवाची पूजा-आराधना करतात. आज सकाळपासूनच राज्यभरातील मंदिरे गर्दीने फुलून गेली आहेत. 

Feb 15, 2026 08:43 (IST)

Mahashivratri LIVE Updates: शिवरात्री निमित्ताने गंगागोरजेश्वर मंदिरात शिवभक्तांची गर्दी..!

महाशिवरात्री निमित्ताने शहापूर तालुक्यातील श्री क्षेत्र गंगा गोरजेश्वर देवस्थान मढ, येथे रात्रीपासूनच शिवभक्तांची कमालीची गर्दी दिसून आली. रात्री पासूनच मंदिरांत बंम बंम भोलेचा जय घोष घुमत होता. श्री क्षेत्र गंगा गोरजेश्वर देवस्थान, मढ हे जागृत पांडवकाली देवस्थान असल्याने या मंदिरात रात्री १२ वाजता एक कारंजी प्रकट होऊन शिवलिंगावर जल अभिषक करते. हे आद्भूत दृश्य पहाण्यासाठी हजारो भाविक भक्त या ठिकाणी रात्रीच गर्दी करून आसतात. हे स्वयंभू असे शिव लिंग असून ते पाण्यात आहे. बारामहिने हे शिव लिंग हे पाण्यात असते. रात्रीच १२ वाजता काळू नदीच्या त्रिवेणी संगम पात्रात स्नान करून शिवभक्तांनी गोरजेश्वराला दुग्ध अभिषेक करुन महाआरती नंतर दर्शन घेतले. रात्री पासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

Feb 15, 2026 08:41 (IST)

Mahashivratri LIVE Updates: महाशिवरात्रीनिमित्त अंचलेश्वर मंदिरात शिवभक्तांची गर्दी

चंद्रपूर शहरातील झटपट नदीच्या काठावर स्थित असलेले सोळाव्या शतकातील अंचलेश्वर मंदिर आज महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांच्या गर्दीने फुलले आहे. प्रसिद्ध शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविक येतात. महाशिवरात्री निमित्त या मंदिरात शिवभक्तांची पुजेसाठी मोठी गर्दी उसळते. चंद्रपूरातील अंचलेश्वर मंदिर हे भगवान शिवाचं मंदिर असून या मंदिराच्या गाभा-यात एक नैसर्गिक जलकुंड आहे. ऐतिहासिक मान्यतेनुसार, जलकुंडातील पाणी हे पवित्र मानलं जातं. तिथंच बाजूला शिवलिंग स्थापित आहे.

Feb 15, 2026 08:38 (IST)

Mahashivratri LIVE Updates: महाशिवरात्री निमित्त स्वयंभू बेलेश्वर मंदिरात शिवभक्तांची मांदियाळी

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर अहिल्यानगर शहरानजीक श्री क्षेत्र बेलेश्वर स्वयंभू महादेव मंदिरात शिवभक्तांची मोठी मांदियाळी पहायला मिळते. काल मध्यरात्रीपासूनच 'हर हर महादेव' च्या गजरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या... बेलाच्या झाडाखाली प्रकटलेले हे स्वयंभू शिवलिंग पुरातन काळापासून साधू-संतांची तपोभूमी राहिले आहे...विशेषतः ऐतवारनाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या क्षेत्रात आजही नाथपंथी साधूंच्या हस्ते विधिवत पूजा, महाआरती व नैवेद्य अर्पण करण्यात येतो. मंदिर परिसरात शनैश्वर, हनुमान आणि दत्तगुरूंच्या मूर्तींचेही दर्शन भाविक घेत असतात...नगर शहरासह जिल्हाभरातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पोलिसांसह स्वयंसेवक विशेष परिश्रम घेत आहेत

Feb 15, 2026 07:47 (IST)

Mahashivratri LIVE Updates: महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीपासून शिवालय गजबजली

बीडमध्ये महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीपासून शिवालय दर्शनासाठी गजबजली आहे. बीड मधील कंकालेश्वर या प्राचीन हेमाडपंती मंदिरात मध्यरात्रीपासून दर्शन आणि अभिषेक सुरू आहे. तर पहाटे भाविकांच्या उपस्थितीत महापूजा पार पडली. कंकालेश्वर मंदिर साधारणपणे १२ व्या शतकात चालुक्य किंवा यादव काळातील असावे असा अंदाज वर्तवला जातो. 

भगवान शंकरांनी 'कंकासुर' नावाच्या राक्षसाचा वध येथे केला होता. अशी पौराणिक कथा आहे. तर हे मंदिर एका मोठ्या सरोवराच्या मध्यभागी बांधलेले आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी एक अरुंद पूल आहे. मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात असून त्यावर अत्यंत कोरीव काम केलेले आहे. हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे. कंकालेश्वर बीड शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. यावर्षी मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे.

Advertisement
Feb 15, 2026 07:46 (IST)

Mahashivratri LIVE Updates: त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

- त्र्यंबकेश्वर  येथील मंदिरात भाविकांची मोठी गर्दी 

- महाशिवरात्री निमित्ताने देशभरातील भाविक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनाला  

-  महाशिवरात्री निमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई 

- पहाटे पासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी 

- मंदिर प्रशासनाकडून देखील गर्दीचे नियोजन

- बम बम बोले आणि हर हर महादेव चा गजरामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर भक्तिमय

Feb 15, 2026 07:11 (IST)

Mahashivratri LIVE Updates: महाशिवरात्रीला श्री राजेश्वर महाराज मंदिर येथे भक्तांची उसळलेली गर्दी

अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजेश्वर महाराज मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आकर्षक विद्युत रोषणाई आणि घोषणांनी संपूर्ण राजराजेश्वर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. 

रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. ऐतिहासिक आणि पुरातन अशी ओळख असलेले हे मंदिर अकोल्यातील श्रद्धेचे केंद्र मानले जाते. विशेष पूजा-अर्चा, अभिषेक आणि भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भक्तांनी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भगवान शंकराचे दर्शन घेत महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जात आहे.

Advertisement
Feb 15, 2026 07:11 (IST)

Mahashivratri LIVE Updates: महाशिवरात्रीनिमित्त अकोल्यात धान्यांपासून साकारली ‘नीलकंठ’ रांगोळी

महाशिवरात्रीनिमित्त अकोला शहरात यंदा भक्ती आणि पर्यावरणपूरकतेचे अनोखे चित्र पाहायला मिळाले. सौ. रेवती भांगे यांनी 5 बाय 5 फूट आकाराची आकर्षक रांगोळी साकारत सर्वांचे लक्ष वेधले. तांदूळ, जव, गहू, काळे तीळ, बोर, चना डाळ, धतूरा आणि बेलाची पाने-फुले अशा विविध नैसर्गिक साहित्याचा वापर करून बारा ज्योतिर्लिंग मंदिराची प्रतिकृती रेखाटण्यात आली. भगवान शंकरांना ‘नीलकंठ’ म्हणून ओळखले जात असल्याने तांदळाला इको-फ्रेंडली निळा रंग देण्यात आला. निळ्या रंगाचे नैसर्गिक धान्य उपलब्ध नसल्याने हलका रंग वापरून देखणेपणा साधण्यात आला. तब्बल चार तासांच्या परिश्रमानंतर साकारलेली ही रांगोळी सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

Feb 15, 2026 07:10 (IST)

Mahashivratri LIVE Updates: श्री देव कुणकेश्वर यात्रेला आजपासून सुरुवात

दक्षिण कोकण'ची काशी म्हणून ओळख असलेलं कोकणातील श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेला आजपासून सुरुवात होतेय.तीन दिवस  ही यात्रा असणार आहे.दरवर्षी लाखो भाविकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रोत्सवाची जय्यत तयारी व नियोजन करण्यात आले आहे.मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षण सजावट करण्यात आलीय. त्याचप्रमाणे

शिवभक्तांना श्री देव कुणकेश्वराचे दर्शन सुलभ मिळावे, यासाठी दर्शन मंडप रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.

Advertisement
Feb 15, 2026 07:09 (IST)

Mahashivratri LIVE Updates: ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात मध्यरात्रीपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी

 हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे देशातील आठव्या स्थानी असलेले ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिर आहे. आज महाशिवरात्रीच्या पर्वावर या मंदिरात भाविकांनी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते मध्यरात्रीनंतर दुग्धाभिषेक व महापूजा करण्यात आली.

या महापूजेनंतर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यातून महाशिवरात्रीच्या या पर्वावर मोठ्या संख्येने भाविक औंढा नागनाथ नगरीत दाखल झाले आहेत. दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे. हर हर महादेव व बम बम बोले चा गजर करत भाविक भक्तीमय वातावरणात दर्शन घेत आहेत. मंदिराचा परिसर देखील आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे.