Malegaon Bomb Blast: 'माझ्याच देशाने मला दहशतवादी बनवलं', निर्दोष सुटकेनंतर साध्वी प्रज्ञाला अश्रू अनावर

Sadhvi Pragya Thakur On Malegaon Bomb Blast Case: स्फोट घडवल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असे निरीक्षण नोंदवत कोर्टाने सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Malegaon Bomb Blast case Verdict:  2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. स्फोट घडवल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असे निरीक्षण नोंदवत कोर्टाने सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी या सर्वांची याप्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे. या निकालानंतर प्रज्ञा ठाकूर यांना अश्रू अनावर झाले. 

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींना एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर या देखील या प्रकरणात आरोपी होत्या. निर्दोष मुक्त झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "न्याय व्यवस्थेवर असलेल्या विश्वासामुळे मी आले. माझा 13 दिवस छळ करण्यात आला. माझे आयुष्य उद्धस्त करण्यात आले. 17 वर्षे माझा अपमान करण्यात आला. माझ्याच देशात मला दहशतवादी बनवण्यात आले.

Malegaon Bomb Blast: मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपींची सुटका कशी झाली? कोर्टाने निकालात काय म्हटलं?

भाजपची प्रतिक्रिया

या प्रकरणी आता भाजपनेही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक मालेगाव बॅाम्बस्फोट खटल्यांचा निकाल हा अनेक अर्थानी महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे काँग्रेसचे हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचे कारस्थान या निकालाने हाणून पाडले आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केले आहे. 

तत्कालिन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी प्रथम हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला व नंतर शरद पवार यांनी अलीबाग येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात याचा उच्चार केला. चिदंबरम यांनी हीच भूमिका मांडली सातत्याने दहशतवादी घटनांमध्ये एकाच समाजाचे आरोपी सापडत असताना मतांच्या राजकारणासाठी जाणीव पूर्वक हिंदूं समाजाला बदनाम करायचं कारस्थान रचले होते, असंही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

Advertisement

Malegaon Bomb Blast Case: मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरण! सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता