निवडणूक लढायची की नाही? मनोज जरांगेंचा प्लॅन ठरला? आता थेट घोषणा?

सलाईन लावून उपोषण करण्यात काही अर्थ नाही. त्या पेक्षा मैदानात उतरून लढलेलं बरं असा त्यांनी निर्णय घेतला.त्यानुसार आज पासून मनोज जरांगे पाटील हे दौऱ्यावर निघाले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

मराठा समजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी अंतरवलीत पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले होते. पण त्यांच्या उपोषणाला सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. ना मंत्र्यांचा फोन ना प्रतिनिधींची भेट. त्यात ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जरांगे यांनी आपले उपोषण आटोपले. त्यानंतर संपुर्ण महाराष्ट्राच दौरा करून सरकारला आव्हान देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. सलाईन लावून उपोषण करण्यात काही अर्थ नाही. त्या पेक्षा मैदानात उतरून लढलेलं बरं असा त्यांनी निर्णय घेतला.त्यानुसार आज पासून मनोज जरांगे पाटील हे दौऱ्यावर निघाले आहेत. आज ते मूळ गावी मातुरी येथे जाणार आहेत. दरम्यान विधानसभा निवडणूक मराठा समाज लढणार की नाही याबाबत त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्वीस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

निवडणूक लढणार की नाही? 

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढायची की नाही हे अजून स्पष्ट केलेले नाही. मात्र विधानसभे आपले हक्काचे 40 ते 50 जण असले पाहीजे असे विधान त्यांनी केले होते. शिवाय आपल्याला राजकारणात जायचं नाही असेही त्यांनी सांगितले होते. आजपासून ते पुन्हा दौऱ्यावर निघाले आहेत. त्यावेळी त्यांनी निवडणूक लढण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की विधानसभा निवडणूक लढायचं की नाही ते समाज ठरवेल. 29 ऑगस्टला समाज एकत्र येत आहे. त्याच दिवशी विधानसभा निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय होणार. निवडणूक लढणार की नाही हा भाग असला तरी कोणाला पाडायचं यावरही याच वेळी ठरेल. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - पावसाचं आजही धुमशान, शाळांना सुट्टी, मुंबई पुणे रायगडला रेड अलर्ट, आतापर्यंत 10 बळी

भाजपवर पुन्हा हल्लाबोल 

जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले आहे. भाजपच्या लोकांची डोकी बिघडली आहे. त्यांचा मला रोखण्याचा प्रयत्न आहे. पण आपण त्यांना जास्त भाव देत नाही असेही त्यांनी सांगितले. जर भाजपवाले शांत बसले नाहीत तर त्यांचे राजकीय करीअर मराठा संपवल्या शिवाय राहाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान उपोषणा दरम्यान भाजपचा एकही उमेदवार निवडून येता कामा नाही असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला दिले होते. त्यानंतर भाजपनेही जरांगे यांच्यावर टिका करण्यास सुरूवात केली आहे. 

Advertisement

सरकारने पुढाकार घ्यावा 

उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी मराठा आरक्षणा बाबत भूमिका जाहीर करावी असे आवाहन सत्ताधारी पक्षाने दिले होते. यावरही जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर ठाकरे, पवार पटोले हे भूमिका जाहीर करत नसतील तर मग सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावावा असे प्रति आव्हान जरांगे यांनी सरकारला दिले आहे. ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीवर जरांगे अजूनही ठाम आहेत. त्यामुळेच राज्य सरकार समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. नक्की काय करावे या कात्रीत सरकार सापडले आहे.  

Advertisement