Manoj Jarange: 'एकतर सरकार निर्णय घेईल, नाहीतर मी..', दिल्लीत मराठा आंदोलन पेटणार? मनोज जरांगेंचा मोठा इशारा

 मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या लढ्याला आता निर्णायक वळण देण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Manoj Jarange Patil Strike News

लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी 

Manoj Jarange Latest News : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या लढ्याला आता निर्णायक वळण देण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. अंतरवाली सराटी येथे आज मराठा समाजाच्या बैठकीत आंदोलकांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी  29 ऑगस्टपासून मोठे आणि शेवटचं आंदोलन छेडण्याची घोषणा केलीय. "29 ऑगस्टला आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत असून,आता शेवटचा निर्णायक लढा उभारायचा आहे.एकतर सरकार निर्णय घेईल,नाहीतर मी जाईल,"असे भावनिक वक्तव्य देखील जरांगे पाटील यांनी यावेळी केलं. 

"...अन्यथा 29 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन"

हैदराबाद गॅझेटनुसार सापडलेल्या तब्बल 58 लाख नोंदींना प्रमाणपत्र देण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. 28 ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्यावीत अन्यथा 29 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू होईल,असा थेट इशारा जरांगे यांनी दिला.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आणि मराठा तरुणांना टार्गेट केल्याचा आरोप केला. 

Advertisement

नक्की वाचा >> प्रियांका गांधींनी ज्यांना 'गोमूत्र तज्ज्ञ' म्हटलं, ते V Kamakoti कोण आहेत? सर्वांना माहिती हवी ही ओळख

ECBC आरक्षण,MPSC भरती,सारथीच्या योजना,अण्णासाहेब महामंडळ,स्वतंत्र मराठा मंत्रालय, कर्जमाफी आणि आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे अशा अनेक मुद्द्यांवर सरकारवर जोरदार टीका देखील केली.29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी "कोणीही घरी थांबू नये,"असे आवाहनही केलं.हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज केलेल्या सर्व मराठा बांधवांनी अर्ज घेऊन अंतरवाली सराटीत यावे,असेही त्यांनी सांगितले.तसेच मुंबईत प्रश्न सुटला नाही,तर पुढचे आंदोलन थेट दिल्लीत होईल,अशी घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी  केलीय.