4 days ago

Maratha Morcha LIVE Updates: मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणाचा आजचा तिसरा  दिवस आहे. ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. या उपोषणामुळे मुंबईमध्ये मोठी वाहतूक कोंडी, विविध ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्य सरकारकडून या उपोषणावर तोडगा काढण्याच्या जोरदार हालचाली सध्या सुरु आहेत. 

Aug 31, 2025 19:12 (IST)

Live Update: जरांगे यांनी आम्हाला आणखी वेळ द्यावा - राधाकृष्ण विखे पाटील

सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश पलीकडे जाता येणार नाही. आता जे गॅझेट लागू करताना कायद्याच्या चौकटीत करावे लागेल असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. माजी न्यायमूर्ती शिंदे आणि महाधिवक्ता कायेदशी तोडगा काढू पाहतात. जरांगे यांना विनंती वेळ द्यावा. त्यांच्याकडे काही कायदेशीर लोक असतील चर्चा करण्यास तयार आहे. आम्ही चर्चा करायला सकारात्मक आहे . ओबीसी आरक्षण धक्का लागणार नाही ही शासनाची भूमिका आधी पासून आहे. आता गॅझेट लागू केले तर ओबीसी आरक्षण धक्का लागणार नाही असं ते यावेळी म्हणाले. 

Aug 31, 2025 19:09 (IST)

Manoj Jarange Patil Mumbai Morcha LIVE: मनोज जरांगेंची केली डॉक्टरांनी तपासणी

Manoj Jarange Patil Mumbai Morcha LIVE:  मनोज जरांगेंची डॉक्टरांनी तपासणी केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. उपोषणामुळे त्यांना काही त्रास होत आहे का याची तपासणी डॉक्टरांनी यावेळी केली.  

Aug 31, 2025 16:39 (IST)

Live Update: शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा

शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून तो सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांच्या अन्न पाण्याच्या सोयीसाठी दिला आहे.

मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शविला. तसेच, या आंदोलनादरम्यान आंदोलकांची होत असलेली गैरसोय पाहून खंतही व्यक्त केली.

लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाकडे सरकारने मानवतेच्या भूमिकेतून पाहावे, असे आवाहन माजी आमदार पवार यांनी केले.

Aug 31, 2025 16:37 (IST)

Manoj Jarange Patil Mumbai Morcha LIVE: जरांगेच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे- लक्ष्मण हाके

जरांगेच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे ओबीसी मधून आरक्षण मागत आहेत असं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं आहे.  जरांगे उद्या पाणी त्याग करेल नाही तरी अजून काही करेल पण संविधान न मानणारा न्यायालयाच्या निर्णयाला न मानणारा शासन प्रशासनाला न मानणारा हा माणूस लोकशाहीच्या विरोधात वागत आहे. झुंड गोळा करून एखाद्या हुकूमशहाप्रमाणे हा माणूस वागत आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगत होतो की या माणसाला मुंबईकडे येऊ देऊ नका. या माणसाचा इतिहास दंगलीचा आहे. या माणसाला संविधान कळत नाही या माणसाला कायदा आणि लोकशाही देखील कळत नाही असं ही हाके म्हणाले.  

Advertisement
Aug 31, 2025 12:14 (IST)

LIVE Update: नवी मुंबई एक्जीबिशन सेंटर मध्ये 7 000 लोकांची राहण्याची व्यवस्था

मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस 

नवी मुंबई एक्जीबिशन सेंटर मध्ये 7 000 लोकांची राहण्याची व्यवस्था केली असून 80 टक्के लोक आजाद मैदान कडे रवाना झाले आहे.

 नवी मुंबई महानगरपालिकेकडून शौचालयाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे.

Aug 31, 2025 12:13 (IST)

LIVE Update: मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू...

मराठा आरक्षणाबाबत सरकार निर्णय घेणार ? 

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू 

पंढरपुरातून मंत्री चंद्रकांत पाटील बैठकीला ऑनलाइन उपस्थित 

बंद दाराआड मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला लावली ऑनलाइन हजेरी

Advertisement
Aug 31, 2025 10:05 (IST)

LIVE Update: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या पार्श्वभूमीवर , वाहतुकीत मोठे बदल

नवी मुंबई पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही रस्ते सामान्य वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्याचबरोबर पर्यायी रस्तेही खुले करण्यात आले आहेत. ऐरोली टोल नाका वाशी टोल नाका आणि अटल सेतू वरून अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेले आहेत

Aug 31, 2025 08:43 (IST)

Manoj Jarange Patil Morcha LIVE: मुंबईतील लोकलसेवा सुरळीत

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे 

आज मुंबईची जीवन वाहिनी मानली जाणारी लोकल ही सुरळीत धावत आहे.

पश्चिम मध्य आणि हार्बर या तीनही रेल्वे मार्गावरची वाहतूक विना अडथळा सुरू आहे. 

तसेच पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गाला आज कुठली वाहतुकीची कोंडी नाही. 

मात्र दक्षिण मुंबईत पोहोचल्यानंतर जे जे फ्लावर त्यासोबतच या ठिकाणी मार्ग वळवण्यात आल्याने थोड्याफार प्रमाणात वाहतुकीची कोंडी बघायला मिळते

Advertisement
Aug 31, 2025 08:18 (IST)

Live UpDate: तेलंगणा राज्याच्या मुलुगु जिल्ह्यातील एसपीसमोर 7 नक्षल्यांचे आत्मसमर्पण

तेलंगणा राज्याच्या मुलुगु जिल्ह्यातील एसपीसमोर 7 नक्षल्यांचे आत्मसमर्पण 

वेगवेगळ्या स्वरूपात नक्षल चळवळीत सक्रिय असलेल्या 7 नक्षल्यांनी  तेलंगणा राज्याच्या मुलुगु जिल्ह्यातील एसपीसमोर आत्मासमर्पण केले 

Aug 31, 2025 08:17 (IST)

LIVE Update: पाचशे पाणी बॉटल बॉक्स 2000 भाकरी 8 टन जेवण मुंबईकडे रवाना

मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या दोन दिवसापासून मुंबई या ठिकाणी उपोषणास बसले असून... त्यांच्याबरोबर गेलेल्या सकल मराठा बांधवांची जेवणामुळे उपासमार होत असल्या कारणाने समाज बांधवांना पुरेसं जेवण मिळावं... यासाठी अहिल्यानगरच्या नागापूर बोल्हेगाव परिसरातील सकल मराठा समाजाकडून पाचशे पाणी बॉटल बॉक्स 2000 भाकरीसह जेवणाचे साहित्य मुंबईकडे रवाना करण्यात आले

Aug 31, 2025 08:14 (IST)

LIVE Update: शरद पवार मनोज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता

मनोज जरांगे पाटील यांची मध्यरात्री प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. आज शरद पवार हे आझाद मैदानावर त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. 

Aug 31, 2025 08:11 (IST)

LIVE Uodate: खेडमधील शामराव पतसंस्थेच्या अध्यक्ष - उपाध्यक्षांसह ५ जणांना अटक

खेड तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल ४ कोटी २२ लाख ८१ हजार २१ रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात गुन्हा दाखल झालेल्या १६ संशयित आरोपीपैकी ५ जणांना रत्नागिरी येथील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. यामध्ये पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ताराम बाळा बैकर, उपाध्यक्ष सुधाकर रामभाऊ शिंदे, माजी उपाध्यक्ष शशिकांत नथुराम शिंदे, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया योगेश सुतार आणि सुभाष भिकू शिंदे या पाच जणांचा समावेश आहे. 

Aug 31, 2025 08:10 (IST)

LIVE Update: महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका, भरत गोगावलेंचा राज ठाकरेंना सल्ला

महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कुणी करू नये अशा शब्दात मंत्री भरत गोगावले यांनी राज ठाकरे यांना दिलंय. मनोज जरांगे पुन्हा का आले हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं त्यावर ते बोलत होते. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 4 महिन्यांची मुदत दिली होती त्यामुळे ते आले आहेत. यामागे त्यांचा वैयक्तिक स्वार्थ अजिबात नाही. पण त्यांना एकनाथ शिंदे यांनी मोर्चा काढायला लावला असं  कुणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे, आणि एकनाथ शिंदे असा विचार करणार नाहीत, असं गोगावले म्हणाले.

Aug 31, 2025 08:09 (IST)

LIVE Update: निधीअभावी रखडले कसनसूर उपकेंद्राचे काम

निधीअभावी रखडलेल्या ३३/११ केव्ही कसनसूर उपकेंद्राच्या बांधकामामुळे एटापल्ली तालुक्यातील सुमारे ७० ते ८० गावांना विजेच्या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे. नियमित वीजपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले.

Aug 31, 2025 08:08 (IST)

Manoj Jarange Patil Morcha: मराठा आंदोलकांसाठी गावागावातुन शिदोरी

मराठा आरक्षणासाठी मुंबई गेलेल्या बाधंवासाठी पैठण तालुक्यातील गावागावातुन भाकरी, चटणी, लोणचं जमा करुन शिदोरी मुंबाईला पाठवण्यात आली. 

महिलांनी गरम गरम पोळी,भाकरी तयार करुन एका ठिकाणी जमा करुन सर्वच शिदोरी मुंबाईल पाठवली