2 days ago

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live Updates: मराठा आरक्षणाच्या लढ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर ठिय्या मांडला आहे. जरांगे पाटील यांच्या बेदुमत उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृतीही खालावत चालली आहे. दुसरीकडे आजपासून पाणीही पिणार नाही, असाही इशारा जरांगेंनी दिला आहे. त्यामुळे सरकारसमोर हे उपोषण सोडवण्याचा मोठा पेच निर्माण झाला असून आज मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. 

Sep 01, 2025 22:28 (IST)

Manoj Jarange Patil Mumbai Morcha: शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते रिकामे करा , जरांगेंचे आवाहन

Manoj Jarange Patil Mumbai Morcha: शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते रिकामे करा असं आवाहन मनोज  जरांगे पाटील यांनी केले आहे.  उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर त्यांनी हे आवाहन केले आहे. काही झालं तरी आंदोलनातून माघार घेणार नाही असं ते म्हणाले. आरक्षण घेतल्यानंतरच आंदोलन थांबवणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

Sep 01, 2025 19:30 (IST)

मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ओबीसी नेते छगन भुजबळांचे बैठकीत ओबीसी नेत्यांना आश्वासन. 

उद्याच्या कोर्टाच्या सुनावणीनंतर आणि राज्य सरकारच्या भूमिकेनंतर सभा घेऊन ओबीसीची भूमिका जाहीर करणार

मोठं आंदोलन करण्याआधी स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचा बैठकीत निर्णय

स्थानिक पातळीवर ओबीसीसाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांना ताकद देणार, ओबीसी समाजाची एकजूट या आंदोलनातून दाखवणार 

जे नेते आंदोलन करत आहेत, त्यांच्या मागे उभे राहा. पण त्या नेत्यांनी उथळपणा टाळावा, जेणेकरून आपल्या आंदोलनाला फटका बसणार नाही, छगन भुजबळ यांचे नेत्यांना मार्गदर्शन

Sep 01, 2025 19:28 (IST)

मनोज जरांगे पाणी प्यायले. सराटीच्या सरपंचांच्या विनंतीनंतर जरांगे यांच्याकडून जलप्राशन. अ‍ॅड. पिंगळेंनीही घेतली जरांगेंची भेट

Sep 01, 2025 19:26 (IST)

खासदार नागेश आष्टीकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.

Advertisement
Sep 01, 2025 17:23 (IST)

Live Update: मराठा आंदोलनाबाबत कोर्टाचे मोठे 7 आदेश

कोर्टाचे 7 मोठे आदेश

- जरांगे, वीरेंद्र पवारांना नोटीस द्या

- दक्षिण मुंबईतून आंदोलकांना बाहेर काढा

- सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह परिसरातून बाहेर काढा

- उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा

- मुंबईत आणखी आंदोलकांना येऊ देऊ नका

- मुंबईत येणाऱ्यांना आता ठाण्यातच रोखा

- जेवण आणण्यास तात्पुरती परवानगी द्या

Sep 01, 2025 17:18 (IST)

Live Update- कोर्टाने आदेश दिले तर कडक कारवाई करणार - देवेंद्र फडणवीस

कोर्टाने आदेश दिले तर कडक कारवाई करावीच लागेल अशी भूमीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मांडली आहे. चर्चेला आलात तर तोडगा निघू शकेल असं ही फडणवीस यावेळी म्हणाले. कायदेशीर मार्ग काढण्यावर आमचं काम सुरू आहे असं ही ते म्हणाले. मविआ सरकारने मराठ्यांसाठी काही निर्णय घेतला नाही असं ही ते म्हणाले. कोर्ट जो आदेश देईल तो आपल्याला मान्य असेल असंही ते म्हणाले. 

Advertisement
Sep 01, 2025 15:40 (IST)

Live Update: कोर्टाची आजची सुनावणी संपली, निर्णय काहीच नाही, उद्या सुनावणी

मुंबई हायकोर्टातली आजची सुनावणी संपली कोणतेही आदेश कोर्टाने दिले नाही. त्यामुळे यावर आता उद्या सुनावणी होणार आहे. 

Sep 01, 2025 15:38 (IST)

Live Update- आमचं अन्न मुंबईत येण्यापासून अडवू नका - मराठा आंदोलक

जेवणाच्या गाड्या तरी मुंबईत सोडा. आमचं जेवण अडवू नका अशी मागणी मराठा आंदोलकांनी कोर्टात केली आहे. शिवाय मराठा आंदोलक गाडीमधून दारू आणत आहेत. त्यामुळे पोलिसांना त्रास होत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता कारवाई करावी अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात केली आहे. शिवाय खळबळजनक आरोपही सदावर्ते यांनी केला आहे. 

Advertisement
Sep 01, 2025 15:34 (IST)

Live Update: कोर्टाने आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावेत, सरकारची कोर्टात मागणी

कोर्टाने आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात सरकार मार्फत केली आहे. सरकारकडून कोर्टाला आवाहन करण्यात आले आहे. कोर्टाने आदेश द्यावेत अशी मागणी ही केली आहे. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयावर आता मराठा आंदोलनाचे भवितव्य ठरणार आहे. 

Sep 01, 2025 15:32 (IST)

Live Update : मराठा आंदोलकांना कोर्टाने खडसावले

दोन्ही स्टेडिअम ही ऐतिहासिक आहेत. तुम्ही काय मागणी करताय तुम्हाला काय समजतं का असा प्रश्न कोर्टाने मराठा आंदोलकांना केला आहे. 

Sep 01, 2025 15:31 (IST)

Live Update : मुंबईच्या बाहेरून जे येत आहेत त्यांना बाहेरच थांबवा - कोर्ट

मुंबईच्या बाहेरून जे येत आहेत त्यांना बाहेरच थांबवा असे आदेश कोर्टाने दिले आहेत. मुंबईकरांना त्याचा त्रास होत आहे असं कोर्टाने म्हटलं आहे. शिवाय सिग्नलवर मराठा आंदोलक नाचत असल्याचा व्हिडीओ ही कोर्टात दाखवला गेला. त्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. 

Sep 01, 2025 15:29 (IST)

Live Update: पाच हजार जणांना आंदोलनाची परवानगी होती मग जास्त लोक कसे आले- कोर्ट

पाच हजार आंदोलकांना परवानगी दिली होती. अन्य आंदोलकांना परत जावं असं कोर्टानं मत मांडलं आहे. मनोज जरांगे यांना अटी आणि शर्ती राहून आंदोलन करावं लागेल. कोर्ट थोड्या वेळात मोठा निर्णय देण्याची शक्यता 

Sep 01, 2025 15:25 (IST)

Live Update: वानखेडे स्टेडिअम आंदोलनासाठी द्यावं - मराठा आंदोलक

वानखेडे आणि ब्रेबॉन स्टेडिअम आंदोलनासाठी द्यावं अशी मागणी मराठा आंदोलकांना कोर्टात केली आहे. त्यामुळे आणखी पेच निर्माण झाला आहे. 

Sep 01, 2025 15:24 (IST)

Live Update: जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाही -सरकार

जरांगेंना आंदोलनाला वाढीव परवानगी दिलेली नाही. शहराला खेळाचे मैदान केले आहे. पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडले जात आहेत. त्यांची खेळणी बनवली जात आहे. सरकारने चर्चा सुरू ठेवली आहे. तर दुसरीकडे हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचं सरकारने कोर्टात सांगितलं आहे. आंदोलनावर तोडका कसा काढणार असा प्रश्न कोर्टाने विचारला. त्यावर कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं आहे. शिवाय कोर्टाने कारवाईचा आदेश द्यावा अशी मागणी सरकारने कोर्टाकडे केली आहे. 

Sep 01, 2025 15:21 (IST)

Live Update: सर्व सामान्यांना त्रास होईल असं करू नका - कोर्ट

जिवनावश्यक वस्तूंचा पुरवाठा खंडीत होवू देवू नका. तुमची चिखलात बसण्याची तयारी आहे का. शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्रास होता कामा नये असे कोर्टाने मराठा आंदोलकांना सांगितलं आहे. 

Sep 01, 2025 15:18 (IST)

Live Update: कोर्टाने आदेश द्यावेत आम्ही कारवाई करू, सरकारची कोर्टात भूमीका

सरकार गप्प का बसले आहे. कोर्टाने निर्णय द्यावा आम्ही लगेच कारवाई करू असं सरकारने कोर्टात सांगितलं आहे. शिवाय बाहेरून लोकांना बोलवू असं धमकावलं जात असल्याचं ही सरकारने कोर्टात सांगितलं आहे. माल वाहतूकीत कोणतीही अडचण येवू नये असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. 

Sep 01, 2025 15:17 (IST)

Live update: कोर्टाकडून मराठा आंदोलनाबाबत मोठा युक्तीवाद

जरांगेंना नोटीस बजावलं की कोर्टाने विचारलं आहे. रस्ता रोको केला गेला असं सदावर्ते यांनी कोर्टात सांगितलं. गाड्या अडवल्या जात आहेत असंही सरकारतर्फे कोर्टात सांगितलं गेलं. 

Sep 01, 2025 15:16 (IST)

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: मुंबई हायकोर्टाचे मराठा आंदोलकाना काही सवाल

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live:  मुंबई हायकोर्टाचे मराठा आंदोलकाना काही सवाल विचारले आहेत. तुमचे तंबू आझाद मैदानात असताना तुम्ही रेल्वे स्टेशनमध्ये का जात आहात. तुमची चिखलात बसण्याची तयारी आहे का. अटी आणि शर्तींचे उल्लंघन का केलं गेलं असे प्रश्न कोर्टाने उपस्थित केले आहे. पाच हजार आंदोलकांनाच परवानगी होती मग जास्त आंदोलक कसे आले असं ही कोर्टाने विचारले आहे. मुंबईकरांना या आंदोलनाचा त्रास होता कामा नये असं ही कोर्टाने म्हटलं आहे. आम्ही संयम ठेवून आहोत कारण काही तरी चांगलं होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे असं ही कोर्टाने म्हटलं आहे.  

Sep 01, 2025 14:31 (IST)

ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक होणार

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना आता ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यातील ओबीसी नेते उपस्थित असणार आहेत. छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके,  प्रकाश शेंडगे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहून जरांगे यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर भूमिका घेणार आहेत.

Sep 01, 2025 14:29 (IST)

Manoj Jarange Maratha Morcha: मनोज जरांगे यांनी नियमांचे उल्लंघन केले- महाधिवक्ता

मनोज जरांगे यांनी आंदोलनासाठी दिलेल्या हमीपत्रात सर्व नियम पाळणार असल्याचे सांगितले होते. पण त्यांनी त्याचे उल्लंघन केले आहे. त्यांनी दावा केला की, आंदोलनाला केवळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी होती. परंतु नियमांचे उल्लंघन करून आंदोलन सुरू ठेवले, महाधिवक्त्यांच्या हायकोर्टात युक्तीवाद. 

Sep 01, 2025 13:16 (IST)

Manoj Jarange Maratha Andolan : CSMT स्थानकावर मराठा समाजाची गर्दी नियंत्रणाबाहेर

CSMT स्थानकावर मराठा समाजाची गर्दी नियंत्रणाबाहेर

रेल्वे पोलीस, प्रशासनाकडून आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे

मात्र आवाहन करूनही मराठा आंदोलक गोंधळ घालताना दिसत आहेत

मराठा आरक्षणांच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले आहेच

Sep 01, 2025 12:58 (IST)

Maratha Morcha : CSMT स्थानकात मराठा आंदोलकांचा रुळावर उतरून गोंधळ

CSMT स्थानकात मराठा आंदोलकांचा गोंधळ

मराठा आंदोलक रुळावर उतरले

पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न 

Sep 01, 2025 12:44 (IST)

Maratha Morcha: "मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन बेकायदेशीर", हायकोर्टात याचिका दाखल

मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन बेकायदेशीर

मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

आजच सुनावणी होण्याची शक्यता

Sep 01, 2025 12:09 (IST)

Manoj Jarange Maratha Morcha: सकल मराठा समाजाच्यावतीने परभणीत मदत कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई येथे मराठा आरक्षण आंदोलनासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. परंतु त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू आणि इतर गोष्टींचा तुटवडा भासत असल्याने परभणीतील सकल मराठा समाजाच्या वतीने परभणीमध्ये आरक्षण आंदोलन मोर्चा मदत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आला आहे. परभणी शहरातील जिजाऊ पॅथॉलॉजी लॅब डॉक्टर बोंडे यांचा दवाखाना या ठिकाणी हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून मोर्चासाठी गेलेल्या मोर्चेकरांना अन्नधान्य, वैद्यकीय सेवा आणि जीवनावश्यक वस्तू गोळा करून पुरवठा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही स्वरूपाची आर्थिक मदत घेतली जाणार नाही 

Sep 01, 2025 11:26 (IST)

मराठा आंदोलनासाठी कोल्हापूरच्या ग्रामीण भागातून भाकरी, पाण्याच्या बाटल्यासह खाद्यपदार्थ मुंबईला रवाना

मराठा आंदोलनासाठी कोल्हापूरच्या ग्रामीण भागातून भाकरी, पाण्याच्या बाटल्यासह खाद्यपदार्थ मुंबईला रवाना

खुपीरे इथल्या वन चॅलेंज ग्रुपच्या पुढाकाराने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मदत

खुपीरे, साबळेवाडी, वाकरे, खांटागळे, शिंदेवाडी, कुडित्रे परिसरातून कार्यकर्त्यांनी गोळा केल्या भाकऱ्या

सात हजार भाकरी, दोन हजार पाण्याच्या बाॅटल आणि ५० किलो फरसाणा घेवून वन चॅलेंज ग्रुपचे कार्यकर्ते मुंबईला रवाना

Sep 01, 2025 11:20 (IST)

मराठा आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांशी गैरवर्तन, केंद्रीय महिला आयोगाने घेतली दखल

मराठा आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांशी गैरवर्तन

केंद्रीय महिला आयोगाने घेतली दखल


Sep 01, 2025 11:16 (IST)

मराठा आरक्षणासाठी भाजप आमदार किसनराव वानखेडे यांना आज घेराव घालण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षणासाठी भाजप आमदार किसनराव वानखेडे यांना आज घेराव घालण्याचा प्रयत्न

यवतमाळमध्ये उमरखेड तालुक्यातील मुळावा गावात मराठा समाजाने वानखेडे यांना घेराव घालत आक्रमक भूमिका घेतली

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आमदारांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, तसेच विधीमंडळात ठोसपणे आवाज उठवावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली

या आंदोलनादरम्यान मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजी करत त्यांनी आमदार वानखेडे यांच्याकडून तातडीने भूमिका जाहीर करण्याची मागणी केली

Sep 01, 2025 10:54 (IST)

Maratha Morcha Live : सायन-पनवेल हायवेवर वाशी टोल नाका ते मानखुर्दपर्यंत वाहतूक कोंडी

सायन-पनवेल हायवेवर वाशी टोल नाका ते मानखुर्दपर्यंत वाहतूक कोंडी 

सोमवारचा दिवस आणि मराठा आंदोलन यामुळे वाहतूक कोंडीत भर 

पोलिसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु

Sep 01, 2025 10:48 (IST)

मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याला आमचा विरोध कायम, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा जरांगेंवर निशाणा

मनोज जरांगे पाटील यांचा आपल्या मागणीपासून यू टर्न घेत असल्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघांचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा आरोप

सुरुवातीला सरसकट मराठ्यांना आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे आता ज्यांची गॅझेटमध्ये नोंद त्यांना आरक्षण देण्याची मागणी करत आहेत

मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली, त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची धार कमी झाली

मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याला आमचा विरोध कायम

गॅझेटमध्ये नोंद असलेल्या, शैक्षणिक, महसूल कागदावर नोंद असलेल्याना कुणबी प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध नाही

Sep 01, 2025 10:34 (IST)

Manoj Jarange Patil LIVE: अकलूजमध्ये गौराई सोबत सजावटीत मनोज जरांगे पाटलांचा फोटो

गौरी गणपती सणाचा उत्साह सध्या सर्वत्र सुरू असताना. मुंबईत जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाची धग आता ग्रामीण भागातही पोहोचताना दिसते. अकलूज येथील प्रताप ढेरे पाटील यांनी आपल्या घरातील गौराई समोर आई तुळजाभवानीच्या गर्भगृहाची प्रतिकृतीची आरास उभा करून गौराईची स्थापना केली. यावेळी आई तुळजाभवानी या सरकारचे डोळे उघडू दे व मराठा समाजाला आरक्षण मिळू दे. असे फलक लावून गौराई सोबत मनोज जरांगे पाटील यांचाही संदेशा सोबतचा फोटो ठेवला आहे.

Sep 01, 2025 10:32 (IST)

Manoj Jarange Patil Morcha LIVE : माढा तालुक्यातून सर्व जाती धर्माच्या लोकांकडून मुंबईला पाठवले जेवण

मुंबईतील मराठा आंदोलनाच्या निमित्ताने माढा तालुक्यातील मोडनिंब या ठिकाणहून मराठा बांधव इतर अठरापगड जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन भाकरी, बेसन आणि शेंगदाणा चटणी अशी जेवणाची सामग्री एकत्रित करून दोन टेम्पोच्या माध्यमातून मुंबईला पाठवली. प्रशांत गिड्डे यांच्या पुढाकाराने सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन मुंबईच्या मराठा बांधवांसाठी जेवण पाठवले आहे.

मनोज जरांगे-पाटील यांची मागणी योग्यच: रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही मनोज जरांगे-पाटील यांची मागणी योग्यच आहे. सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून या समाजाला आरक्षण दिले पाहिजे, ही आपलीही मागणी आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत्या २ दिवसात आपण जरांगे-पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी दिली आहे. तसेच मतचोरीची काँग्रेसची ओरड चुकीची असल्याचे स्पष्ट केलं.

Sep 01, 2025 10:32 (IST)

LIVE Update: भाजप आमदाराचा मराठा आंदोलनाला पाठिंबा

आपला मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. आपल्या सर्वांगीण विकासासाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठी मराठा आरक्षण ही काळाची गरज आहे. यासाठी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्र लिहून मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला आहे!  

कायद्याच्या चौकटीत टिकणारे आणि सुप्रीम कोर्टात टिकेल असे आरक्षण मिळावे, यासाठी मी सरकारला योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकार नेहमीच आपल्या पाठीशी उभे आहे, आणि मला पूर्ण विश्वास आहे की, आपल्याला लवकरच न्याय मिळेल!

Sep 01, 2025 08:50 (IST)

Maratha Morcha : वाशी पुलावर मोठा वाहतूक कोंडी

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमी चौथ्या दिवशीही वाहतूक कोडींची समस्या

वाशी पुलावर मोठा वाहतूक कोंडी, गाड्या जागच्या हालेना

Sep 01, 2025 08:47 (IST)

Maratha Morcha Live: मनोज जरांगेंच्या बालेकिल्ल्यात ओबीसींकडून आंदोलन

मनोज जरांगेंच्या बालेकिल्ल्यात ओबीसींकडून आंदोलन

अंतरवाली सराटीत आजपासून ओबीसींचं उपोषण

राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून अंतरवाली सराटीत उपोषण

उपोषणाचे निवेदन पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले 

रात्रीपर्यंत पोलिसांनी आंदोलनास परवानगी दिली नव्हती

उपोषणाला बसणाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावली

Sep 01, 2025 08:47 (IST)

Maratha Morcha Live: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली 

रेल्वे प्लॅटफॉर्म खाली करण्याची पोलिसांची विनंती

Sep 01, 2025 08:46 (IST)

मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांची फोनवरुन चर्चा

मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांची फोनवरुन चर्चा

जच्या मुंबईतील बैठकीत आंदोलनाबाबत जो निर्णय होईल, त्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी होणार

नागपुरात उपोषण सुरु असल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीत ड. बबनराव तायवाडे सहभागी होणार नाही

नागपूरात राष्ट्रीय ओबीसी महासंघांच साखळी उपोषण सुरु असल्याने बबनराव तायवाडे बैठकीला जाणार नाही

Sep 01, 2025 08:45 (IST)

राज्यातील 235 खाजगी अनुदानित आश्रमशाळांना वॉशिंग मशीन देण्याचा निर्णय

राज्यातील 235 खाजगी अनुदानित आश्रमशाळांना वॉशिंग मशीन देण्याचा निर्णय

तर मागास बहुजन कल्याण विभागाच्या राज्यातील 950 खाजगी अनुदानित आश्रमशाळांना वॉशिंग मशीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

त्यानुसार वाटपही सुरू झाले.. त्यापैकी 235 आश्रमशाळांना वॉशिंग मशीन द्यायचे राहिले होते... यासाठी आता निधी मंजुर करण्यात आला आहे

नागपूर विभागात 77 आश्रम शाळा आहेत. त्यापैकी 17 आश्रम शाळा या नागपूर जिल्ह्यात आहे. त्यांना याचा फायदा होणार

आता आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कपडे धुण्याचा वेळ वाचणार