20 hours ago

Manoj Jarange Patil Mumbai Protest Update: मराठा बांधवांनी मुंबईमध्ये उभारलेल्या आरक्षणाच्या लढाईचा आजचा पाचवा दिवस आहे. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावत आहे. दुसरीकडे हायकोर्टाने मराठा आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचे तसेच फक्त आझाद मैदानावर आंदोलन करण्याचे निर्देश दिले आहेत. आजही सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी होणार असून कोर्ट काय आदेश तदेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Sep 02, 2025 14:27 (IST)

Manoj Jarange Maratha Morcha Live: सीएसएमटी, आझाद मैदानात पोलीस दाखल

सीएसएमटी, आझाद मैदानात पोलीस दाखल

मराठा आंदोलकांना परिसर सोडण्याच्या सूचना दिल्या देत आहेत

काही मराठा आंदोलक आक्रमक असून त्यांचीही समजूत काढली जात आहे

Sep 02, 2025 10:48 (IST)

Maratha Quota Protest: रस्त्यावर शौचाला बसण्यापासून आत्महत्येच्या धमकीपर्यंत,आंदोलकांकडून 11 अटींचे उल्लंघन

Maratha Quota Protest: रस्त्यावर शौचाला बसण्यापासून आत्महत्येच्या धमकीपर्यंत,आंदोलकांकडून 11 अटींचे उल्लंघन

Sep 02, 2025 10:47 (IST)

Manoj Jarange Protest Live : राज्य सरकारकडून मनोज जरांगेंकडे प्रस्ताव देण्यात येणार

राज्य सरकारकडून मनोज जरांगेंकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे. यासंबंधीचा मसुदा सरकारकडून मागील दोन दिवसातल्या बैठकीत जवळपास निश्चित करण्यात आला आहे. महाधिवक्ता बिरेंद्र सराफ याच्या अंतिम हात फिरवत असल्याची माहिती आहे. यात, राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात जीआर काढण्याच्या देखील तयारीत आहे.  ह्या जीआरमध्ये सरकारकडून - कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्रधारक यांच्या ॲफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार आहे. 

कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय केला जाण्याची तयारी असणार आहे. 

हैदराबाद गॅजेटियर जसंच्या तसं लागू करता येणार नाही आहे. कारण गॅझेटीयरमध्ये केवळ नंबर्स (लोकसंख्या) आहेत. त्यात स्पष्टता नाही. ते जसंच्या तसं लागू केलं जाऊ शकत नाही अशी सरकारची पातळींवर चर्चा आहे. अशात हे मध्य मार्ग काढत तात्काळ मराठी बांधवांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.  अशात, मनोज जरांगे हा सरकारचा प्रस्ताव मान्य करतात का? हे बघणं महत्त्वाचं असेल.

Sep 02, 2025 10:41 (IST)

Manoj Jarange Maratha Morcha: "आझाद मैदान रिकामे करा", पोलिसांनी जरांगेंच्या समितीला बजावली नोटीस

Manoj Jarange Maratha Morcha: "आझाद मैदान रिकामे करा", पोलिसांनी जरांगेंच्या समितीला बजावली नोटीस

Advertisement
Sep 02, 2025 10:00 (IST)

Manoj Jarange Maratha Morcha: मराठा आंदोलनावरून रोहित पवारांची सरकारवर टीका

मराठा आंदोलनावरून रोहित पवारांची सरकारवर टीका

Sep 02, 2025 09:27 (IST)

Maratha Morcha Live : खासदार शाहू महाराज यांची पत्रक काढून मराठा आरक्षणबाबत भूमिका जाहीर

खासदार शाहू महाराज यांची पत्रक काढून मराठा आरक्षणबाबत भूमिका जाहीर 

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेताना महाविकासआघाडीसह सर्व पक्षांना विश्वासात घ्यावं अशी खासदार शाहू महाराज यांची पत्रकाद्वारे मागणी 

मराठा समाजाला आरक्षण देण्याऐवजी महायुतीचे नेते विषयाला बगल देत असल्याचा पत्रकातून आरोप 

मराठा समाजाला आरक्षण देऊ असं प्रचार सभेतून जाहीरपणे भूमिका मांडलेल्या सरकारने माघार घेऊन चालणार नाही 

मराठा समाजाची सहनशीलता संपली आहे त्यामुळे सरकारने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला तर याचे गंभीर परिणाम होतील

Advertisement
Sep 02, 2025 09:23 (IST)

Maratha Morcha Live : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली

Sep 02, 2025 09:22 (IST)

OBC Protest : राज्यभरात आज ओबीसी बांधव रस्त्यावर उतरण्याची शक्यता

राज्यभरात आज ओबीसी बांधव रस्त्यावर उतरण्याची शक्यता 

काही जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार तर कुठे उपोषण छेडले जाणार

ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये असा छगन भुजबळ यांनी काल पत्रकार परिषद घेत सरकारला दिला होता इशारा

Advertisement
Sep 02, 2025 09:03 (IST)

Manoj Jarange Maratha Morcha: आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नोटीस

आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नोटीस

मनोज जरांगेंच्या कोर कमिटी समितीच्या आठ सदस्यांना आजाद मैदान पोलिसांची नोटीस

पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली

आंदोलकांनी आझाद मैदान लवकरात लवकर रिक्त करण्याचे पोलिसांचे आदेश

आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचा पोलिसांचा दावा

Sep 02, 2025 07:50 (IST)

मराठा आरक्षण आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेण्याची हालचाली सुरू

मराठा आरक्षण आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेण्याची हालचाली सुरू

२० दिवसांत तपासणी करून अहवाल देण्याचे  गृहमंत्रालयाकडून आदेश

गृहमंत्रालयाकडून सर्वच जिल्ह्यांना आदेश

५ लाखांपेक्षा कमी नुकसान असलेल्या गुन्ह्यात अर्जदाराची वाट न पाहता समितीने स्वतःहून तपासणी करण्याचे आदेश

जीवितहानी झाली नसलेले गुन्हे मागे घेणार

Sep 02, 2025 07:49 (IST)

Manoj Jarange Maratha Morcha: मालेगावातून एक ट्रक किराणा मुंबईला रवाना

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला सुरू केलेल्या उपोषण आंदोलनासाठी राज्यभरातील मराठा बांधव मुंबईत जात आहेत. त्यांची जेवणाची गैरसोय होऊ नये यासाठी नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आवाहनाला मराठा बांधवांसह सर्धधर्मीय बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर धान्य, डाळी, तेल कांदे , पाणी बॉटल, बिस्कीट पुडे यांसह किराणा माल जमा केला. एक ट्रकभर किराणा माल  मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आला आहे.

Sep 02, 2025 07:35 (IST)

आंदोलनात काही समाजकंटक घुसून गोंधळ घालत आहेत, मराठा आंदोलकांचा गंभीर आरोप

मराठा आंदोलनात काही समाजकंटक घुसून गोंधळ घालत आहेत

मराठा आंदोलकांचा गंभीर आरोप

Sep 02, 2025 07:14 (IST)

Manoj Jarange Patil Live News : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली 

मनोज जरांगे पाटील यांनी कोणतेही उपचार घेण्यास नकार दिला आहे

Sep 02, 2025 07:13 (IST)

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा पाचवा दिवस

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा पाचवा दिवस

आज १२ वाजेपर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत

आझाद मैदानाशिवाय कुठे आंदोलन न करण्याचेही आदेश हायकोर्टाने दिलेत