मोठा गौप्यस्फोट! 100 कोटींचा आकडा, जरांगेंच्या नावाने काय काय झालं?

'मराठा आंदोनलनाच्या नावाखाली सरकारकडून कामे घेतली आहेत. काहींनी पैसेही घेतले आहेत. हा आकडा छोटा मोठा नसून थेट 100 कोटींचा आहे.'

जाहिरात
Read Time: 2 mins
जालना:

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेले उपोषण स्थगित केले आहे. मात्र या आंदोलना दरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या आंदोलनाला एक वेगळे वळण मिळण्याची दाट शक्यता आहे. मराठा आंदोनलनाच्या नावाखाली सरकारकडून कामे घेतली आहेत. काहींनी पैसेही घेतले आहेत. हा आकडा छोटा मोठा नसून थेट 100 कोटींचा आहे. आपल्या नावाचा वापर करून पैसे लुटण्याचे काम झाले आहे. त्यांची नावे जाहीर करावीत असे आव्हान जरांगे पाटील यांनी मंत्री शंभूराजे देसाई यांना दिले आहे. त्यांच्या आरोपामुळे नक्की प्रकरण काय आहे याची चर्चा सुरू झाली आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सगे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. हे उपोषण सहा दिलस चालले. त्यानंतर या कायद्याची अंमलबजावणीसाठी जरांगे पाटलांनी राज्य सरकारला एक महिन्याची मुदत दिली. त्यानंतर त्यांचे उपोषण त्यांनी स्थगित केले. या आंदोलना दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी शंभूराजे देसाई यांच्याकडे माझं नाव सांगून ज्यांनी कामे घेतली, पैसे घेतले याची मला यादी द्यावी अशी मागणी केली आहे. मराठा आंदोलन आणि माझे नाव घेवून ही कामे घेणारे कोण? आणि कामे देणारे कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पूर्वी ही जरांगे पाटील यांनी नाव न घेता मुख्यमंत्री यांच्या OSD वर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे 100 कोटीची कामे देणारा आणि कामे घेणारा कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  सुनेत्रा पवारांचे बारामतीत लागले भावी केंद्रीय मंत्री म्हणून बॅनर

लोकसभा निवडणुका होत्या. त्यात आचारसंहीता होती. त्यामुळे जवळपास दोन महिने त्यात गेले. वाशीला जे आंदोलन झाले त्यानंतर सरकारला 5 महिन्याचा वेळ दिला होता. पण सरकारने काही केले नाही असा आरोप जरांगे पाटील यांनी उपोषणा दरम्यान केला आहे. आता जरांगेंनी नवा अल्टीमेटम दिला आहे. 13 जुलैपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले. यानंतर ही मागणी पूर्ण झाली नाही तर मराठा समाज विधानसभा निवडणुकीत उतरेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 14 जुलैनंतर सरकारचा एकही शब्द आपण ऐकणार नाही असेही ते म्हणाले. शिवाय या पुढच्या काळात निवडणूक लढवण्याची चळवळ उभी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

Advertisement

Advertisement