Mumbai MHADA 2026: मुंबई म्हाडा लॉटरीची प्रतिक्षा संपली! 2640 घरांच्या सोडतीबाबत मोठी अपडेट, कधी होणार फैसला?

गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेल्या या प्रक्रियेमुळे अर्जदारांमध्ये काहीशी अनिश्चितता होती, मात्र आता यावर पडदा पडणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai MHADA Lottery News: मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो मुंबईकरांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या २६४० सदनिकांच्या सोडतीची प्रतीक्षा आता संपणार असून, पुढील आठवड्यात या सोडतीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेल्या या प्रक्रियेमुळे अर्जदारांमध्ये काहीशी अनिश्चितता होती, मात्र आता यावर पडदा पडणार आहे.

Mumbai Local News: 15 डब्यांच्या लोकलमधून दिवा, डोंबिवली स्टेशनवर उतरता येणार नाही? मध्य रेल्वेचं स्पष्टीकरण

मुंबईतील म्हाडाच्या घरांची प्रतिक्षा संपली!

समोर आलेल्या माहितीनुसार, ​म्हाडा मुंबई मंडळाने ३० मार्च रोजी ही सोडत जाहीर केली होती. सुरुवातीला १५ मे रोजी ही सोडत काढण्याचे नियोजित होते. मात्र, विविध कारणांमुळे, प्रामुख्याने निवडणुकीची आचारसंहिता आणि मुदतवाढीमुळे या प्रक्रियेला विलंब झाला. या योजनेसाठी तब्बल ७५,३६६ अर्ज प्राप्त झाले आहेत. जुलै महिन्याचा उत्तरार्ध सुरू असतानाही तारीख जाहीर न झाल्याने अर्जदारांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र, आता ही प्रतीक्षा संपणार आहे.

Advertisement

​या सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी घरांचे वाटप केले जाणार आहे. यात विशेषतः कन्नमवार नगर, विक्रोळी येथील प्रकल्पांमधील १२२१ सदनिकांच्या किमतीत ७.५ टक्के कपात करण्यात आली होती. यामुळे या घरांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे, यातील ६१० सदनिका उच्च उत्पन्न गटासाठी राखीव ठेवण्यात आल्या असून, आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशा या घरांसाठी नागरिकांची मोठी पसंती दिसून येत आहे. आता सर्व लक्ष पुढील आठवड्यात जाहीर होणाऱ्या अधिकृत तारखेवर लागले आहे.

Central Railway: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मध्य रेल्वेवर 7 वर्षानंतर मोठा बदल; प्रवास होणार सुखकर