जाहिरात

MHADA Pune Lottery: पुण्यात स्वस्तात घर खरेदीची सुवर्णसंधी! लॉटरीशिवाय मिळवा म्हाडाचे घर; कुठे अन् किती घरे?

जे अर्जदार तांत्रिकदृष्ट्या आधी अर्ज प्रक्रिया पूर्ण करतील आणि सदनिका निश्चित (Book) करतील, त्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे.

MHADA Pune Lottery: पुण्यात स्वस्तात घर खरेदीची सुवर्णसंधी! लॉटरीशिवाय मिळवा म्हाडाचे घर; कुठे अन् किती घरे?

Pune MHADA Lottery:  पुणे शहरात स्वतःच्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी म्हाडाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळांतर्गत विविध गृहप्रकल्पांमधील २९५ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही घरे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (First Come First Served) या तत्त्वावर उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

Pre Wedding Locations: ऐतिहासिक वारसा, निसर्गाची साथ! पुण्यातील टॉप 10 प्री- वेडिंग लोकेशन्स; लगेच चेक करा

​नोंदणी कधी आणि कुठे?

या घरांसाठीची ऑनलाईन अर्ज नोंदणी ४ मे २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. इच्छुकांना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://bookmyhome.mhada.gov.in येथे जाऊन आपला अर्ज नोंदवता येईल. जे अर्जदार तांत्रिकदृष्ट्या आधी अर्ज प्रक्रिया पूर्ण करतील आणि सदनिका निश्चित (Book) करतील, त्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे.

​अर्जाची प्रक्रिया आणि महत्त्वाचे नियम:

अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने सदनिका निवडल्यानंतर ती बुक करणे आवश्यक आहे. सदनिका निश्चित केल्यानंतर पुढील ४८ तासांच्या आत घराच्या एकूण विक्री किमतीच्या १० टक्के रक्कम भरणे बंधनकारक आहे. ही १० टक्के रक्कम म्हाडाकडे जमा झाल्याची खात्री पटल्यानंतरच अर्जदाराला उर्वरित रक्कम भरण्यासाठी 'तात्पुरते देकार पत्र' (Provisional Offer Letter) ऑनलाइन दिले जाईल.

​कुठे आहेत ही घरे?

पुणे महानगरपालिका क्षेत्रात ११३ आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रात १८२ अशा एकूण २९५ सदनिकांचा यात समावेश आहे. प्रामुख्याने चिखली, ताथवडे, वाकड, लोहगाव, मुंढवा, येवलेवाडी, किवळे, फुरसुंगी, डुडुळगाव, पिसोळी, बालेवाडी, हडपसर आणि पुनावळे या वेगाने विकसित होणाऱ्या भागात ही घरे उपलब्ध आहेत. यात १-आरके, १-बीएचके आणि २-बीएचके अशा विविध प्रकारच्या सदनिकांचा समावेश असून, त्यांच्या किमती खाजगी विकासकांच्या तुलनेत अत्यंत परवडणाऱ्या आहेत.

Mango Price : 3 लाखात एक 1 किलो आंबा; कोणतं फळ सर्वात महाग? देशातील सर्वात उत्कृष्ट दर्जाचा आंबा कोणता?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com