महायुती सरकारची लाडकी बहीण योजने सध्या चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सध्या नवनव्या अपडेट्स समोर येत असून अपात्र महिलांचे पैसे परत घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हजारो महिलांनी अर्ज मागे घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. याबाबत आता स्वतः महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सर्वात महत्त्वाचा खुलासा केला आहे.
काय म्हणाल्या आदिती तटकरे?
वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून गैरसमज पसरवले जात आहेत की लाडकी बहीण योजनेत बदल होणार आहे. मात्र एकाही लाडक्या बहिणीचे लाभ किंवा पैसे आम्ही परत घेतलेले नाहीत. तसेच आमच्याकडे वेगवेगळ्या ठिकाणाहून पत्र येतं आहेत की जे पात्र नाहीत त्यांचा लाभ बंद करायचा. 5-10 हजार अर्ज दररोज येत आहेत. काही महिन्यात महिला अविवाहित होत्या आणि लाभ घेत होत्या पण त्या आता इतर राज्यात गेल्या आहेत त्या योजना बंद करण्यासाठी अर्ज करत आहेत, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
तसेच काही जणांनी चारचाकी वाहन घेतलं असेल काहींना सरकार नोकरी लागली असेल. पण कुठल्याही लाडक्या बहिणींचा लाभ आम्ही परत मागितलेला नाही. पण त्याचं बोलत आहेत की आमचा लाभ परत घ्या. ज्यांना लाभ गेला आहे, त्यांच्याकडून परत कुठलेही पैसे घेतलेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जानेवारी महिन्याचा लाभ आता जाणार आहे. 2-3 महिन्यांचे लाभ मिळाले आहेत. त्यावेळी त्यांच्या काही लक्षात आलं नसेल, काहींनी मुलांच्या आधार कार्डचा नंबर दिला आहे.ही एक योजना नाही ज्याची पडताळणी केली जात आहे. पण काही अफ़वा आहेत ते पसरवण्याचं काम सुरु आहे. सालाबादप्रमाणे कुठल्याही योजनेचे पडताळणी होतं असते. ही एक प्रक्रिया आहे. योजना नवीन असल्यामुळे अशा अफ़वा उठवल्या जात आहेत. आम्ही एकही महिलेचा लाभ त्यांच्या इच्छेविना परत मागे घेणार नाही, असेही आदिती तटकरे पुढे बोलता म्हणाल्या.
(नक्की वाचा- Saif Ali Khan : सैफ अली खानच्या कुटुंबीयांना धक्का, 15 हजार कोटींची संपत्ती सरकार ताब्यात घेणार!)