PCMC News: हिंदू धर्मात घरवापसीनंतर सायली सुर्वेचं अपहरण? प्रचंड मारहाण, मानसिक दबाव, पुण्यात खळबळ

तिचे धर्मांतरण ही करण्यात आल्याचा आरोप सायलीने केला होता. ती नॉट रिचेबल असल्यामुळे तिचा अपहरण झाल्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:

Sayali Surve Kidnapped:  2019 ची मिस इंडिया अर्थ स्पर्धेतील सुंदरी, सायली सुर्वे हिचं शुद्धीकरण करून तिला हिंदू धर्मात सामावून घेण्यात आले होते. पिंपरी चिंचवडमधील रहिवासी असलेल्या सायलीन 2019 मध्ये मीरा भाईंदर शहरातील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासे सोबत घरच्यांचा विरोध झुगारून लग्न केलं होतं. मात्र आतिफ तासेशी लग्न करणे आपली चूक होती, लग्न झाल्यानंतर सतत आपला छळ केला गेला आणि धर्मांतरण देखील केलं गेलं असा आरोप सायलीने केला होता. परंतु या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. सायली सुर्वे संपर्कात नसल्यामुळे तिचा अपहरण झाल्याची शक्यता हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांनी केला आहे.

Hinjewadi Metro: मेट्रो धावणार, पर्यावरणही जपणार! काय आहे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा ग्रीन पॅटर्न?

सायली सुर्वेचे अपहरण..?

सायली सुर्वेने 2019 मध्ये आतिफ तासे सोबत लग्न केलं होतं. मात्र कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. सायलीने हा विरोध झुगारुन आतिफशी लग्न केले. लग्नानंतर तिचं नाव अतेझा असं करण्यात आलं. मात्र तिचा ह्या निर्णयामुळे तिला बराच त्रास सहन करावा लागला. सायलीने सांगितले की, आतिफ तासेशी लग्न करणं ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. लग्नानंतर काही काळातच तिचा छळ सुरु झाला. तसेच तिचे धर्मांतरण ही करण्यात आल्याचा आरोप सायलीने केला होता. ती नॉट रिचेबल असल्यामुळे तिचा अपहरण झाल्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे.

Advertisement

मिलिंद एकबोटेंचं हिंदू संघटनांना आवाहान.. 

"सायली सुर्वे हिचे आरोप आतिफ तासे याने अपहरण केलेलं आहे. कदाचित तिला प्रचंड मारहाण होत असेल किंव केस मागे घेण्यासाठी तिच्यावर मानसिक दबाव आणला जात असेल. तिचा ठावठिकाणा सापडत नाही. तिचे आई- वडील तिचा शोध घेत नाहीत, मात्र त्यांनाही शोध लागत नाही. सायली सुर्वेला सुखरुप परत आणणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे. तिने पुन्हा हिंदुधर्म स्विकारला आहे. महाराष्ट्रातील सर्व हिंदू संघटनांना विनंती आहे की सायलीच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न करावेत," असं आवाहन मिलिंद एकबोटे यांनी केलं आहे. 

Topics mentioned in this article