संकेत कुलकर्णी, पंढरपूर:
MLA Rohit Pawar Protest Pandharpur: आमदार रोहित पवार यांचे आज पंढरपुरात अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरूवात सुरू झाले. हे आंदोलन राज्यव्यापी करण्याच्या दृष्टीने पंढरपूरची निवड रोहित पवारांनी केली. पंढरपूरच्या विठ्ठलाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भक्तांचा पाठिंबा मिळावा, हा हेतू या आंदोलनातून होता. मात्र प्रत्यक्षात पंढरीत येणारे भाविक असो किंवा राष्ट्रवादीतील प्रमुख नेते साऱ्यांनीच रोहित पवारांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली.
Navi Mumbai News: नवी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा! सिग्नलवरील यंत्रणेत होणार मोठे बदल
रोहित पवारांच्या आंदोलनाचा फ्लॉप शो..
आमदार रोहित पवारांनी विठ्ठलाचे नामदेव पायरी येथून दर्शन घेऊन अन्नत्याग सुरू केले. यापूर्वी संत गाडगे महाराज मठात आमदार रोहित पवारांचे समर्थक आणि शेतकरी उपस्थित होते. यावेळी आलेल्या समर्थकांना व शेतकऱ्यांना पोटभर नाश्ता देऊन तृप्तीची ढेकर देण्याची व्यवस्था कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. त्यामुळे अन्न त्याग अगोदर तृप्तीची पोटभर ढेकर... अशा घटनांची पंढरपुरात खुमासदार चर्चा सुरू झाली.
वास्तवात पंढरपूरच्या आंदोलनात आमदार रोहित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर नेते सहभागी होतील. अशी शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात गुरुवारी भाजपाच्या मंचावर असणारे आमदार अभिजीत पाटील यांनी आंदोलनाला हजेरी लावली. आमदार राजू खरे ही आंदोलनात उपस्थित होते. या सर्वांमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील ,आमदार नारायण पाटील, आमदार उत्तम जानकर, आणि विधान परिषदेचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार तथा जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख हे मात्र दुपारपर्यंत फिरकताना दिसून आले नाहीत.
बड्या नेत्यांनी फिरवली पाठ
छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन सुरू झाले आहे. पुरुषोत्तम अधिकमासानिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी आहे. त्यामुळे गर्दीच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन करून अशी नोटीस पोलिसांनी सकाळीच बजावली. तरीदेखील आंदोलन सुरू झाले. विठ्ठल भक्त असणारा वारकरी हा शेतकरी आहे. त्यामुळे हे सारे आंदोलनाकडे येतील. अशी आशा होती. मात्र प्रत्यक्षात रोहित पवारांचे समर्थक सोडून कोणीच या आंदोलनाकडे जास्तीचे फिरकलेले दिसून आले नाही. एकीकडे आंदोलनाच्या सुरुवातीला नेते नाहीत. अशातच आमदार रोहित पवारांनी राज्यातील नेत्यांनी पंढरपुरातील आंदोलनात सहभागी व्हावे. अन्यथा गाव पातळीवर आंदोलन सुरू करावे असे आवाहन केले
विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांच्यासोबत शामियानामध्ये उपस्थित असणारे समर्थक कार्यकर्ते हे सर्वाधिक प्रमाणात कर्जत जामखेड याच परिसरातील असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर कुणीही कार्यकर्ते या आंदोलनात फारसे सहभागी झाले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आंदोलनाचा डाम डौल मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. माध्यमातून राज्यभर चर्चा झाली. मात्र प्रत्यक्षात आंदोलनाकडे पाठच दिसून येते.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)