Mumbai Underground : रस्त्यावर ट्रॅफिक, रस्त्याखालून सुसाट! मुंबईत भुयारी मार्गाने प्रवास, कसा असेल मार्ग?

कितीही उड्डाणपुलं उभारण्यात आले तरीही मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होत नाही. अशावेळी भुयारी मेट्रोनंतर आता भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Underground Route : मुंबईतील वाहतूक कोंडी ही आता नित्याचीच झाली आहे. कितीही उड्डाणपुलं उभारण्यात आले तरीही मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होत नाही. अशावेळी भुयारी मेट्रोनंतर आता भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. यासाठी MMRDA कडून तयारी सुरू झाली आहे. रस्त्यावरील वाहतुकीवर तोडगा म्हणून मुंबईकरांना रस्त्याखालून प्रवास करता येणार आहे. मुंबईत उभारण्यात येणारं भुयारी मार्गाचं जाळं विणण्यासाठी एमएमआरडीएकडून लवकरच सल्लागार नेमण्यात येणार असल्याची माहिती आहे.  

कसा असेल भुयारी मार्ग?

सद्यस्थितीला दक्षिण मुंबईपासून थेट बोरीवली आणि पूर्व उपनगरांपर्यंत भुयारी मार्गाचं जाळं विस्तारण्याचा प्लान आहे. सध्या बीकेसीमध्ये महत्त्वाची कार्यालयं आहे. त्यामुळे येथे कायम वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यातही वांद्रे आणि कुर्ला स्थानकं लांब असल्याने रिक्षावाल्यांची मुजोरी वाढली आहे. यासाठी भुयारी मार्गाचा प्रस्ताव आहे. वरळी ते बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत भुयारी मार्गाची उभारणी करण्याचा प्लान असून त्यापुढे आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत विस्तार करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. हा भुयारी मार्ग पुढे ठाणे, बोरीवलीपर्यंत नेता येऊ शकतो का याचीही चाचपणी केली जात आहे. 

नक्की वाचा - Golden Metro : मुंबईचा कायापालट निश्चित! 30 मिनिटात सांताक्रूझ ते नवी मुंबई; विमानतळांना जोडणारा भव्य प्रकल्प

सध्या महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पात भुयारी मार्ग असून MMRDA घोडबंदर रस्त्यावर फाऊंटन हॉटेल ते गायमुख असा भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. लोकमत वृत्तपत्राने यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध केली आहे.  

Advertisement

कोणत्या भुयारी मार्गांची कामं सुरू ?

ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग - ११.८५ किलोमीटर - खर्च : १८,८३८ कोटी

ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्ग - ९.२३ किलोमीटर - खर्च : ९,१५८

गोरेगाव ते मुलुंड भुयारी मार्ग - १२.२० किलोमीटर