Raj Thackeray: 'मराठी माणसा जागा हो', राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट, केंद्रीय मंत्र्यांवर संतापले

गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे' असं म्हणत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Raj Thackeray IIT Mumbai News: आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुंबई नावाबाबत केलेल्या एका विधानाने नवा वाद उभा राहिला आहे. मला आयआयटी बॉम्बेचं (IIT Mumbai) नाव बदलून मुंबई केलं नाही, याचा आनंद आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. जितेंद्र सिंह यांच्या या विधानावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. 

काय म्हणाले राज ठाकरे? 

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, 'आयआयटीच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं'. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय. आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि  आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे' असं म्हणत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. 

T20 WC 2026: 'प्रत्येक फायनलचा सामना अहमदाबादलाच का?' आदित्य ठाकरेंचा संताप; ICCला सवाल

खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे.  या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. 

तुमचं शहर खुपतंय...

यांना 'मुंबई' हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय. आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. 

Advertisement

Shivsena v BJP: एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत? गुलाबराव पाटलांच्या उत्तराने अनेक प्रश्न उपस्थित

'मुंबई' नको 'बॉंबे'च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच, आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं ! असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.