MNS Protest : गो बॅक, 50 खोकेच्या घोषणा.. मनसेच्या मोर्चामधून प्रताप सरनाईक यांचा काढता पाय

मनसेच्या मोर्चाला सुरुवात झाली असून ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील मोर्चात सहभागी झाले आहे. मात्र अविनाश जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांना सोडल्याशिवाय मोर्चाची सांगता होणार नाही, अशी भूमिका मोर्चेकरांनी घेतली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

MNS Protest : मराठीच्या मुद्द्यावरून मीरा-भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याने वातावरण सकाळापासूनच चिघळलं होतं. मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्याने मीरा भाईंदरमध्ये जमले होते. मात्र मोर्चाला विरोध केल्याने मनसे कार्यकर्ते आणि पोलीस आक्रमक झाले होते. मात्र मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारला माघार घ्यावी लागली आणि मनसेच्या मोर्चाला अखेर परवानगी मिळाली. या आंदोलनामध्ये प्रताप सरनाईक सहभागी झाले होते, मात्र आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना काढता पाय घ्यावा लागला.

MNS Protest: "मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली?" CM फडणवीस यांचा पोलिसांवर संताप

नेमकं काय घडलं?

सकाळपासून जी धरपकड मराठी माणसांची आणि कार्यकर्त्यांची सुरु आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांकडेही निषेध नोंदवतो. आता मी स्वत: त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मीरा- भाईंदरकडे निघालो आहे, असे जाहीर आव्हान देत मंत्री प्रताप सरनाईक हे मनसेच्या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी निघाले होते. मात्र आंदोलकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे त्यांना मोर्चामधून पळ काढावा लागला.

मंत्री प्रताप सरनाईक यांना पाहताच आंदोलकांनी प्रताप सरनाईक गो बॅक, ५० खोके एकदम ओके, जय गुजरातच्या घोषणा दिल्या. यावेळी आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काही आंदोलकांनी प्रताप सरनाईक यांच्या दिशेने बॉटल्सही फेकल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांचा  हा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी प्रताप सरनाईक यांना मोर्चामधून बाहेर काढले. मंत्री सरनाईक हे भाषणही करणार होते, मात्र आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून त्यांनी काढता पाय घेतला. 

(नक्की वाचाMNS Morcha News: 'मराठी'साठी मनसेचा मोर्चा! पोलिसांकडून नेत्यांची धरपकड; मीरा भाईंदरमध्ये वातावरण तापलं)

दरम्यान,  मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर मंगळवारी पहाटेपासून पोलिसांनी मनसे नेत्यांची धरपकड सुरु केली होती. मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन आणखीनंच तापलं. मनसेच्या मोर्चाला इतर पक्षांचाही पाठिंबा मिळाल्यानंतर आणि मराठीच्या मुद्द्यावर नागरिक मीरा भाईंदरमध्ये जमू लागल्यावर सरकारला देखील नरमाईची भूमिका घ्यावी लागली आणि मोर्चाला परवानगी द्यावी लागली. तसेच अविनाश जाधव यांचीही सुटका करण्यात आली आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article