Mumbai News: लोकल, मेट्रो, बेस्ट, तिकीटासाठी एकच कार्ड अन् ॲप! PM मोदी करणार उद्घाटन; कधीपासून होणार सुरु?

 Mumbai 1 Smart Card & Mumbai 1 App Inauguration Date: मुंबईकरांना आता बेस्ट, रेल्वे, एसटी, मोनो, मेट्रो आणि 'एमएमआर'मधील सार्वजनिक वाहतुकीसाठी एकाच कार्डवरून तसेच एकाच अॅपवरूनही तिकीट काढता येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

 Mumbai 1 Smart Card & Mumbai 1 App News: सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून, त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचबाबत आता एक सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबईकरांना आता बेस्ट, रेल्वे, एसटी, मोनो, मेट्रो आणि 'एमएमआर'मधील सार्वजनिक वाहतुकीसाठी एकाच कार्डवरून तसेच एकाच अॅपवरूनही तिकीट काढता येणार आहे. या एकात्मिक तिकीट प्रणालीचे ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्यता आहे.

दैनंदिन प्रवासासाठी मुंबईकर उपनगरीय रेल्वे, बेस्ट, एसटी, मोनो, मेट्रोचा वापर करतात. या सर्व प्रवासाची तिकीटे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन काढावी लागतात. मात्र आता मुंबईकरांचा हा त्रास मिटणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत 'मुंबई १ स्मार्ट कार्ड' आणि 'मुंबई १ अॅप' तयार केले आहे. हे कार्ड आणि अॅप कधी सुरु होणार? याबाबतच सर्वांना उत्सुकता होती.याबाबतच आता सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.  या कार्ड आणि अॅपचे बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्यता आहे. 

Cyclone Shakhti: 'शक्ती' चक्रीवादळामुळे मुंबईत अतिवृष्टी होणार? महाराष्ट्रावर काय परिणाम? वाचा सविस्तर

'एमएमआरडीए'च्या दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो-२ अ आणि दहिसर-गुंदवली मेट्रो-७ मार्गिकांसाठी तयार केलेल्या 'मुंबई-१ कार्ड'मध्येच बदल करून 'मुंबई-१ स्मार्ट कार्ड' तयार करण्यात आले आहे. हे कार्ड 'मेट्रो-२ अ', 'मेट्रो-७', 'मेट्रो-१', मेट्रो-३', मोनोरेल, बेस्ट, उपनगरीय रेल्वे, एसटी प्रवासासाठीही चालणार आहे.

८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळ आणि कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मेट्रो-३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक-कफ परेड टप्प्याचे  लोकार्पण होणार आहे. बीकेसीत होणाऱ्या या कार्यक्रमात 'मुंबई १ कार्ड' आणि 'मुंबई १ अॅप'चे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसत्ता या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.