13 hours ago

Maharashtra Election LIVE Updates:  राज्याच्या राजकारणात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मुंबईसह पुण्यात ठाकरे बंधु एकत्र आल्याने रंगत वाढली आहे दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र लढणार असल्याने भाजप- शिवसेनेसमोर मोठे आव्हान पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट, भाजपने पहिली यादी जाहीर केली असून इच्छुकांना डावलल्याने मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. 

Dec 29, 2025 14:37 (IST)

Jalna Election LIVE Updates: जालन्यात युतीचा तिढा अखेर सुटला! भाजपा- 35, शिंदे गटाला 30 जागा

 जालन्यात ही युती बाबद सहा बैठका पार पडल्या अखेर युतीचा फर्म्युला ठरलाय,यात भाजपा- 35,तर शिवसेना शिंदे गटाला 30 जागा देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती कैलास गोरंट्याल यांनी NDTV मराठीशी बोलताना दिलीय.राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याने हा त्यांचा निर्णय असल्याचं देखील गोरंट्याल यांनी म्हंटलय जालन्यात भाजपा- शिवसेना युतीच्या 45 + जागा निवडून येईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला

Dec 29, 2025 14:29 (IST)

BMC Election LIVE Updates: राज ठाकरेंकडून एबी फॉर्मचे वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून आज एबीफॉर्मचे वाटप केले जात आहे..

राज ठाकरेंनी यशवंत किल्लेदार यांना वॉर्ड क्रमांक १९२ मधून एबीफॉर्म दिला आहे. 

Dec 29, 2025 13:50 (IST)

Dhule Election LIVE Updates: धुळ्यात महायुतीचं फिस्कटलं! शिवसेना शिंदे गट- राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

महायुतीत बिघाडी... शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवणार....

महायुतीत भाजपा आणि शिवसेना बैठकीत युतीत फिस्कटल्यानंतर शिवसेना शिंदे गटाची स्वतंत्र बैठक सुरू....

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत....

Dec 29, 2025 13:34 (IST)

Pune Election LIVE Updates: पुण्यात काँग्रेस- ठाकरे गटाची युती! जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला

पुण्यात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची युती जाहीर झाली आहे. सुरुवातीला ठाकरे गटाने ४५ तर काँग्रेसने ६० उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. पुढील जागांवरही चर्चा होईल. आमची वंचितसोबतही चर्चा सुरु आहे त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन चर्चा होईल, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली आहे. 

Advertisement
Dec 29, 2025 13:34 (IST)

Pune Election LIVE Updates: पुण्यात काँग्रेस- ठाकरे गटाची युती! जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला

पुण्यात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची युती जाहीर झाली आहे. सुरुवातीला ठाकरे गटाने ४५ तर काँग्रेसने ६० उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. पुढील जागांवरही चर्चा होईल. आमची वंचितसोबतही चर्चा सुरु आहे त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन चर्चा होईल, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली आहे. 

Dec 29, 2025 13:22 (IST)

Nagpur Election LIVE Updates: आयात उमेदवारांना तिकीट, चंद्रशेखर बावनकुळेंना भाजप कार्यकर्त्यांनी जाब विचारला

प्रभाग 15 मधील दोन महिलांच्या जागांवर नुकतंच भाजपमध्ये आलेल्या दोन महिला उमेदवारांना उमेदवारी मिळत असल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी आज थेट नितीन गडकरींच्या घरी धाव घेतली...

यावेळी प्रभागाच्या बाहेरील लोकांना उमेदवारी देणार असाल तर पक्षनिष्ठ कार्यकर्ता काय करेल असे गंभीर सवाल नाराज कार्यकर्त्यांनी बावनकुळेंना विचारले.

Advertisement
Dec 29, 2025 13:19 (IST)

BMC Election LIVE Updates: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का:

मुंबई काँग्रेस अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपप्रवेश:

Dec 29, 2025 13:13 (IST)

Nanded Election News: नांदेडचे माजी महापौर सुधाकर पांढरेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नांदेड महापालिकेचे प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. नांदेड चे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. सुधाकर पांढरे हे मूळचे शिवसेनेचे होते. महापालिकेत सेनेची सत्ता आल्यावर पांढरे महापौर झाले. नंतर त्यांनी काँग्रेस भाजप जनसुराज्य असे पक्ष बदलले. विधानसभेला त्यांनी नशीब आजमावले पण यश मिळाले नाही.

Advertisement
Dec 29, 2025 12:55 (IST)

PCMC Election LIVE Updates: पिंपरीत शरद पवार गटाकडून मविआला धोका, ठाकरे गटाचा खळबळजनक आरोप

पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आमची फसवणूक करून शेवटच्या क्षणी अजित पवार गटाशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी केला आहे.

Dec 29, 2025 12:52 (IST)

BMC Election 2026: भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात बैठक

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात बैठक 

नवी मुंबईतील उध्दव ठाकरे गटाचे उपनेते विठ्ठल मोरे आणि त्यांचे  सुपुत्र अवधूत मोरे , उपजिल्हाप्रमुख प्रमोद कदम ,  राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सलूजा सुतार भाजपात प्रवेश करणार 

थोड्या वेळात रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार 

शिवसेना आणि भाजप युती होण्याची शक्यता मावळल्याने भाजपाने इतर पक्षातील उमेदवारांना प्रवेश देण्यास सुरवात केली आहे

Dec 29, 2025 12:51 (IST)

Amravati Election LIVE Updates: भाजप आणि शिवसेना यांच्यातील फिसकटलेल्या युतीबाबत पुन्हा चर्चा

अमरावती महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील फिसकटलेल्या युती संदर्भात आज पुन्हा होणार चर्चा. 

थोड्याच वेळात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड, भाजपचे नेते संजय कुटे, आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत बैठक सुरू होणार..

भाजप शिवसेनेचे यांची युवती होणार की दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार, याकडे राजकीय क्षेत्राच लक्ष...

Dec 29, 2025 12:48 (IST)

Akola Election: अकोल्याचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

अकोल्याचे माजी महापौर तथा भाजपचे नेते विजय अग्रवाल यांनी आज उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांच्याकडे आपला नामनिर्देशन भाजपकडून प्रथम अर्ज दाखल केला. गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील जागावाटपावरून राजकीय रणधुमाळी सुरू असतानाच भाजपचे महानगराध्यक्ष असलेले विजय अग्रवाल यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी बोलताना विजय अग्रवाल म्हणाले की, महायुती व्हावी ही आमची इच्छा असून दुपारपर्यंत यावर तोडगा निघेल. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ३५ ते ४० जागांची मागणी होत असल्याच्या चर्चा आहेत, मात्र तसे कुठेही ठरलेले नाही. लवकरच या विषयावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Dec 29, 2025 12:42 (IST)

Nashik Election LIVE Updates: नाशिकमध्येही घराणेशाहीला ऊत, आमदार सीमा हिरेंचे कुटुंबीय रिंगणात

- नाशिकमध्येही घराणेशाहीला ऊत

- भाजपच्या नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सिमा हिरे यांचे कुटुंबीय निवडणुकीच्या रिंगणात 

- मुलगी रश्मी हिरे आणि दिर योगेश हिरे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Dec 29, 2025 12:39 (IST)

Jalna Election News: jजालन्यात महायुती झाल्यास सामूहिक राजीनामा देणार: कार्यकर्त्यांचा इशारा

 जालन्यात महायुतीला भाजप कार्यकर्त्यांनीच विरोध केला असून युती झाल्यास सामूहिक राजीनामा देणार असल्याचाही इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय.. स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी मिळावी यासाठी कार्यकर्ते पक्षात अनेक वर्षांपासून काम करत असतात.. मात्र आता युती झाल्यास तिकीट मिळण्याची संधी अनेक कार्यकर्त्यांना मिळत नाही. अशात मागच्या दोन दिवसांपासून जालना महापालिकेत युतीसाठी पक्षांच्या बैठका सुरु आहेत.. त्यामुळं युतीला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला असून दानवेंच्या निवासस्थांनी गर्दी केलीये. यासह युती झाल्यास सामूहिक राजीनामा देऊ असा इशाराही कार्यकर्त्यांनी वरिष्ठांना दिलाय.. त्यामुळं आज युती संदर्भात शेवटची बैठक असून अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळं पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Dec 29, 2025 12:37 (IST)

Kolhapur Election 2026:शक्तिप्रदर्शन करत काँग्रेस उमेदवाराने भरला अर्ज

शक्तिप्रदर्शन करत काँग्रेस उमेदवाराने भरला अर्ज 

ढोल ताशाच्या गजरात फाळके यांनी प्रभाग क्रमांक तीनमधून रिंगणात 

 

काँग्रेसकडून यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्या उमेदवराचा अर्ज

Dec 29, 2025 12:35 (IST)

Pune Election 2026: पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त

पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त

 निष्ठावंत कार्यकर्त्यांसह आरपीआय कार्यकर्ते भाजप कार्यालयाबाहेर करणार आंदोलन 

आर पी आय कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता जागा दिल्याने कार्यकर्ते नाराज 

भाजप कार्यालयाबाहेर आरपीआय कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे 

या सगळ्यात रामदास आठवले मात्र not रिचेबल....

Dec 29, 2025 12:33 (IST)

Pune Election 2026: दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सूनेला भाजपकडून उमेदवारी

दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून स्वरादा बापट यांना भाजपकडून उमेदवारी

तसेच कसबा विधानसभा च्या माजी आमदार दिवंगत मुक्ता टिळक यांचे सुपुत्र कुणाल टिळक यांना सुद्धा भाजपने दिली उमेदवारी

दोन्ही जण भरणार पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी

Dec 29, 2025 12:31 (IST)

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

मुंबई महापालिकेसाठी भाजपाने जवळपास 70 लोकांची यादी समोर आले आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत जवळपास 90 जणांना एबी फॉर्म अधिकृतरित्या भाजपाने दिला आहे

भाजपाच्या पहिल्या यादीत प्रामुख्याने उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयांच्या तुलनेने मराठी चेहऱ्यांना अधिक संधी दिल्याचे दिसून येत आहे. 

विनोद मिश्रा ममता यादव सुद्धा सिंह सिद्धार्थ शर्मा शिवकुमार झा राणी त्रिवेदी जितेंद्र पटेल जिग्नेश शहा तेजेन्द्र सिंग तिवाना या अमराठी चेहऱ्यांना आवर्जून संधी दिल्याचा पहिल्या अधिक दिसून येते पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे अनेक मराठी चेहरे भाजपाने पहिल्या यादीतच जाहीर केल्याचे दिसून येते.

Dec 29, 2025 12:28 (IST)

BMC Election 2026: मुंबई वेगळी करण्याचे स्वप्न उद्ध्वस्त करा: बाळा नांदगावकर

  1. महाराष्ट्रासाठी , मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी एक यायला हवे. 

  2. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे प्लॅनिंग करत आहेत

  3. मुंबई आपल्या हातात राहायला हवी

  4. मुंबई वेगळी करण्याचे स्वप्न उध्वस्त करा

  5. भांडणापेक्षा आणि वडापेक्षा निवडणूक महत्त्वाची आहे

  6. मुंबई कोणत्याही परिस्थितीत आपल्या हातात ठेवायची आहे.. 

  7. सीट येतात जातात पण मुंबईसाठी निवडणूक महत्वाची आहे.. 

  8. आपल्या अस्तित्वाची लढाई आहे.. रात्र वैऱ्याची आहे.. कार्यकर्ते पूर्ण चार्ज होईल मतदारसंघात शिवसेना सीट्स आहे त्या ठिकाणी फॉर्म भरताना सहभागी व्हायचे आहे

Dec 29, 2025 12:26 (IST)

Nashik Election 2026: नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दिनकर पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज

- नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दिनकर पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज 

- दिनकर पाटलांसोबतच त्यांचे पुत्र अमोल पाटील यांचाही अर्ज दाखल 

- जोरदार शक्ती प्रदर्शन करत पाटलांचे अर्ज दाखल

- आयारामांच्या घरी भाजप दोन तिकीट देणार का ? याकडेही लक्ष

- मनसेच्या सरचिटणीस पदी असलेल्या दिनकर पाटलांनी तीन दिवसांपूर्वी भाजपमध्ये केलेला प्रवेश ठरला होता वादग्रस्त

Dec 29, 2025 12:25 (IST)

PMC Election 2026: अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक, एकत्रित येण्याची घोषणा होणार

पुण्यात अजित पवार यांच्या जिजाई या निवासस्थानी अजित पवार यांची बैठक

अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

बैठकीला पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व स्थानिक नेते उपस्थित

आज राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता 

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्यावर शिक्कामोर्तब