14 days ago

Maharashtra Municiple Corporation Election LIVE Updates:  मुंबई, ठाणे, पुण्यासह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून राज्यभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही फायनल झाला आहे. मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष १३७ जागा लढवणार असून शिवसेना शिंदे गटाला ९० जागा देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे ठाण्यात 131 जागांपैकी शिवसेनेला 87 जागा तर मित्र पक्ष असणाऱ्या भाजपला 40 जागा देण्यात आल्या आहेत.तर मुंब्रा विकास आघाडीला 4 जागा सोडण्यात आल्या आहेत. आज महापालिका निवडणुकांचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत. 

Dec 30, 2025 15:16 (IST)

BMC Election: मनसे उमेदवाराचं मोठं शक्ती प्रदर्शन

BMC: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभाग क्रमांक 207 च्या उमेदवार शलाका हरयाणा यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केला दाखल.

Dec 30, 2025 14:45 (IST)

Vasai Virar Election Result: हितेंद्र ठाकुरांचा कट्टर विरोधक धनंजय गावडे BVA सोबत एकत्र

भाजपला रोखण्यासाठी कट्टर विरोधक आले एकत्र

हितेंद्र ठाकुरांचा कट्टर विरोधक धनंजय गावडे BVA सोबत एकत्र

धनंजय गावडे यांनी स्वतः विभाग क्रमांक 16 मधून बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला

धनंजय गावडे यांनी एकेकाळी ठाकूर यांच्या साम्राज्याला सुरुंग लावला होता.

नंतर ठाकूर यांनीच गावडे यांचे विरोधात अनेक गुन्हे दाखल केले होते.

 वसई विरार महापालिकेसाठी नवी राजकीय समीकरणे

Dec 30, 2025 14:30 (IST)

Pune Election LIVE updates: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकरांच्या घरात उमेदवारी

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकरांच्या घरात उमेदवारी

लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या पक्षाकडून देण्यात आला AB फॉर्म

आंदेकर यांच्या  वकिलांच्या मार्फत भरण्यात आले AB फॉर्म 

पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल

Dec 30, 2025 14:01 (IST)

PCMC Election LIVE Update: मोठी बातमी: पिंपरी- चिंचवडमध्ये भाजप शिवसेना युती तुटली

मोठी बातमी: पिंपरी- चिंचवडमध्ये भाजप शिवसेना युती तुटली...

शिवसेना स्वबळावर लढणार: खासदार श्रीरंग बारणे याची माहिती

-आज बैठक झाली. शिवसेने च्या वतीने आम्ही सकारात्मक होतो. 

-आमची पारंपरिक युती होती. 

-भाजपसोबत आपण युती करायची असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी केली.

-आम्ही 29 जागेचा प्रस्थाव दिला होता. 16 जागांवर चर्चा झाली. मग 13 जागा आणि अखेर दहा जागा देण्यावर तयार झाले होते. 

-राज्यात आमची युती राहील.

Advertisement
Dec 30, 2025 13:52 (IST)

Akola Election LIVE Updates: अकोल्यात भाजपची बंडखोरी थंड; नाराज नेत्यांची ‘घरवापसी

अकोला शहरातील भारतीय जनता पक्षातील बंडखोरी थंड करण्यासाठी भाजपने ठोस पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वी नाराज झालेले कार्यकर्ते आणि नेते पुन्हा पक्षात परतू लागले असून माजी नगरसेवक प्रतुल हातवळणे आणि माजी नगरसेवक गिरीश गोखले यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस व निवडणूक प्रभारी आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे आणि शहराध्यक्ष जयंत मसने यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात त्यांचा पुनःप्रवेश झाला. यावेळी महानगरपालिकेत भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी यांनी केले.

Dec 30, 2025 13:51 (IST)

Solapur Election LIVE Updates: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी फॉर्मुल्यावरून अजूनही संभ्रम

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी फॉर्मुल्यावरून अजूनही संभ्रम..

राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्ष यांच्या युतीत अजूनही एक मत नाही.

महापालिकेच्या निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक असतानाही चर्चा सुरूच..

- महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू

Advertisement
Dec 30, 2025 13:43 (IST)

NCP Candidate List: रूपाली ठोंबरे यांना दोन प्रभागातून उमेदवारी

रूपाली ठोंबरे यांना दोन प्रभागातून उमेदवारी 

अजित पवारांनी रूपाली ठोंबरेंना दोन प्रभागातून दिली उमेदवारी 

रुपाली पाटील ठोंबरे यांना कसब्यातून दोन ठिकाणी उमेदवारी प्रभाग क्रमांक 25 अ शनिवार पेठ,महात्माफुले मंडई,

 प्रभाग क्रमांक 25 ब घोरपडी पेठ-गुरुवार पेठ-समता भूमी या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी

Dec 30, 2025 13:41 (IST)

Pune Election LIVE Update: माजी महापौर कमल व्यवहारे यांचं तिकीट काँग्रेसने कापले

विधानसभा निवडणुकीत कमल व्यवहारे यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर कमल व्यवहारे यांच्यावर पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी काँग्रेसने कारवाई केली होती त्यानंतर पुन्हा त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यात आले होते 

आता महापालिका निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा त्यांचे तिकीट कापले आहे. त्यानंतर कमल व्यवहारी या अजित पवार यांच्या भेटीला आले असून त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत

Advertisement
Dec 30, 2025 13:41 (IST)

BMC Elections LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर 

पहिल्या यादीत ७ तर दुसऱ्या यादीत ४ उमेदवार 

प्रभाग क्रमांक २२४- सानिया शाह, १६५- अभिजीत कांबळे, १०७- भरत दनानी आणि २११ मधून सुफियान अन्सारी उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाकरे बंधू सोबत युती करून निवडणूक लढत असून ११ जागा सोडण्यात आल्या

Dec 30, 2025 13:40 (IST)

Nashik Election LIVE Update: नाशिकमध्ये भाजपमध्ये जोरदार नाराजीनाट्य, भाजप पदाधिकाऱ्यांना इच्छुकांनी घेरले

- नाशिकमध्ये भाजपमध्ये जोरदार नाराजीनाट्य

- ए बी फॉर्म घेऊन जाणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना इच्छुकांनी घेरले

- आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या वाहनांचा केला जातोय पाठलाग

- मुंबई नाशिक महामार्गावर रंगला आहे थरार

Dec 30, 2025 13:39 (IST)

Pune Election LIVE Updates: ए बी फॉर्म घेण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी

शिवसेनेचा ए बी फॉर्म घेण्यासाठी हॉटेलमध्ये मोठी गर्दी 

विजय शिवतारे व नीलम गोरे जिथे बसले आहेत  तिथे मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांची झुंबड

अनेकांना एबी फॉर्म मिळत नसल्याने शिवसैनिक संतप्त

 विजय शिवतारे व निलम गोऱ्हे यांनी दालनाचं दार लावलं असल्याने शिवसैनिक आक्रमक

"शांत रहा कुणीही गडबड करू नका"

पुणे बाहेर येऊन आता विजय शिवतारेंनी सांगितल आहे

Dec 30, 2025 12:20 (IST)

Thane Election LIVE Updates: खासदार नरेश म्हस्के यांना झटका, मुलाला उमेदवारी नाकारली

- खासदार नरेश म्हस्के यांना झटका 

- ⁠नरेश म्हस्केंच्या मुलाचे कापले तिकिट 

- ⁠मुलगा आशुतोष म्हस्के याला तिकिट मिळाले याकरता म्हस्केंनी लावली होती फिल्डिंग 

- ⁠मात्र म्हस्केंचे डाव ठरले अपयशी

Dec 30, 2025 11:04 (IST)

Pune Election LIVE Update: पुण्यातही सेना- भाजप युती फिस्कटली, शिंदे गटाकडून स्वबळाचा नारा

छत्रपती संभाजीनगरनंतर पुण्यामध्येही महायुती फिस्कटली आहे. पुण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. रविंद्र धंगेकर यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

Dec 30, 2025 10:54 (IST)

Pune Election LIVE Update: रुपाली ठोंबरे पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर

रुपाली ठोंबरे पाटीलाला अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर

अजित पवार यांनी दिला रुपाली पाटीलला एबी फॉर्म मिळाला

प्रभाग क्रमांक २६ मधून अधिकृत उमेदवारी

Dec 30, 2025 10:53 (IST)

Worli Ward Election LIVE Updates: वरळी वॉर्ड नंबर 196 मध्ये महायुतीत बंडखोरी

वरळी वॉर्ड नंबर 196 मध्ये महायुतीत बंडखोरी...

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेविका मानसी दळवी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार

जागा वाटपामध्ये 196 वॉर्ड हा भाजपाला गेला आहे. त्यामुळे मानसी दळवी यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्याबाहेर महिलांना घेऊन शक्ती प्रदर्शन केलं होतं

वॉर्ड नंबर 196 मधून मानसी दळवी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत आहेत

Dec 30, 2025 10:52 (IST)

Pune Election LIVE Updates: गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी

कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात...

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणेला अजित पवार गटाकडून प्रभाग १० बावधन मधून एबी फॉर्म देण्यात आलाय. 

जयश्री मारणे या अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार 

गुन्हेगारी मिटवा म्हणणाऱ्या अजित पवारांनी गजा मारणेच्या पत्नीला दिली उमेदवारी

Dec 30, 2025 10:15 (IST)

BMC Election LIVE Update: राज ठाकरेंच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे, प्रचार सभांमधून घेणार समाचार

मुंबई आणि परिसरातील महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरे यांच्या निशान्यावर एकनाथ शिंदे असणार. 

राज ठाकरे हे त्यांच्या निवडणूक प्रचारांच्या सभा मधून एकनाथ शिंदे यांचा समाचार घेणार 

एकनाथ शिंदे हेच राज ठाकरे यांचे मुख्य लक्ष असणार आहे. 

खऱ्या खोट्या शिवसेने संदर्भातला जो काही वाद गेल्या काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे याबाबत राज ठाकरे आपल्या सभांमधून योग्य ती भूमिका मांडणार असल्याचे कळते.

Dec 30, 2025 10:12 (IST)

Chhatrapati Sambhajinagar Election LIVE Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिस्कटली, स्वतंत्र लढण्याचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील युती फिस्कटल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दोन्ही पक्षांनी आपापल्या जागांवरून माघार घेण्यास नकार दिल्यामुळे अखेर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

Dec 30, 2025 10:07 (IST)

Thane Election LIVE Update: ठाण्यात अजित पवारांचा भाजपला धक्का, विश्वासू शिलेदार फोडले

भारतीय जनता पक्षाचे  माजी नगरसेवक  राजकुमार यादव, केवलादेवी यादव, महेंद्र सोडारी व वर्षा पाटील या सर्वच माजी नगरसेवकांनी जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला व महाराष्ट्र प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश..

पक्षप्रवेश करताच कार्यकर्त्यांना दिला एबी फॉर्म..

भारतीय जनता पक्षात योग्य तो मानसन्मान न मिळाल्याने व आमचे तिकीट भाजपा आमदाराने विकल्याचा देखील आरोप यावेळी भाजपा मधून राष्ट्रवादी पक्षात आलेल्या कार्यकर्ती केला आहे...

Dec 30, 2025 10:06 (IST)

Thane Election LIVE Updates: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार, 10 जानेवारीला सभा

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार राज ठाकरेंची तोफ. 

10 जानेवारीला राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा. 

ठाण्यातील जाहीर सभेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा राजकीय समाचार राज ठाकरे घेणार. 

ठाणे महानगरपालिकेच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा

Dec 30, 2025 09:59 (IST)

BMC Election 2026: नातेवाईकांना तिकीटे देऊ नका.. भाजप नेत्यांना स्पष्ट सूचना

भाजपमधील आमदार खासदार आणि सर्वच लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा काल रात्री आपल्या कुटुंबातील सदस्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरू नयेत अशा स्पष्ट सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या मुलांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज त्यांना मागे घ्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी भाजपचा महापौर होणार, त्या ठिकाणी आता तो लोकप्रतिनिधीचा मुलगा किंवा नातेवाईक नसणार तर सामान्य कार्यकर्ता असणार हे देखील यातून स्पष्ट झाले आहे.

Dec 30, 2025 09:17 (IST)

Akola Election LIVE Update: उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसमध्ये असंतोष; आमदारांच्या पोस्टरला काळं फासलं

अकोला शहरात काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे कार्यकर्ता मोहम्मद नौशाद शेख आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप व्हायरल व्हिडिओवरून पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या पोस्टरला पेनाच्या शाईने काळं फासण्यात आल्याची घटना घडली. तर आमदार पठाण यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप नौशाद शेख यांनी केला आहे. 

मोहम्मद नौशाद शेख यांनी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेत एकही मुस्लीम मतदाराने काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करू नये, तसेच सर्वांनी एमआयएम पक्षाला मतदान करावे, असे आवाहन केल्याचा दावा करण्यात आला आहे. अकोला शहर ‘हिरवामय’ करण्याची भाषा करत त्यांनी एमआयएमकडून निवडणूक लढवणार असून काँग्रेसचा सुपडा साफ करू, असेही विधान केल्याचे सांगितले जात आहे. 

Dec 30, 2025 09:14 (IST)

Kolhapur Election LIVE Updates: भाजपमध्ये नाराजीनाट्य! महिला उमेदवाराचा आत्मदाहनाचा इशारा

भाजपकडून संभाव्य उमेदवारी समजल्यानंतर एका महिला उमेदवाराने आत्मदाहनाचा इशारा दिलाय. कोल्हापूर शहर सरचिटणीस धनश्री तोडकर यांनी आज पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करून तिकीट कापल्याचा संताप व्यक्त करण्याची भूमिका घेतलीये  पदाधिकाऱ्यांचं तिकीट कापण हा अन्याय आहे. तोडकर यांच्या या निर्णयामुळे शहरात खळबळ उडाली.  तोडकर या प्रभाग क्रमांक 14 मधून इच्छुक उमेदवार आहेत.

Dec 30, 2025 09:10 (IST)

Pune Election LIVE Update: पुण्यात अजित पवारांचं आजही बैठकांचं सत्र

पुण्यात अजित पवारांचं आजही बैठकांचं सत्र सुरु आहे. त्यामुळे जिजाई निवासस्थानाबाहेर इच्छुकांनी गर्दी केलीय. सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसतेय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि इतर महत्वाचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. तर दुसरीकडे ज्या पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलं नाही तेसुद्धा आज अजित पवारांच्या पक्षात प्रवेश घेत आहेत. 

Dec 30, 2025 09:07 (IST)

PCMC Election LIVE Updates: पिंपरी चिंचवडमध्ये सर्व पक्षांचे जागा वाटप ठरले! वाचा सर्व फॉर्म्युला

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून सर्वच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या याद्या आज समोर येणार आहेत.  सर्वच पक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून यादी सुद्धा आज स्पष्ट होणार आहे.

महायुती: भाजप + शिवसेना शिंदे गट + आर पी आय ( आठवले गट ) 

  1. भाजप 110
  2. शिवसेना शिंदे गट 13
  3. आर पी आय  5 

महाविकास आघाडी: शिवसेना उद्धव ठाकरे गट + काँग्रेस+ मनसे + रासप 

  1. शिवसेना उद्धव ठाकरे गट 71 
  2. काँग्रेस 35
  3. मनसे 19
  4. रासप 3

दोन्ही राष्ट्रवादी युती: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार + राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार 

  1. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट 110
  2. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट 18 

संभाव्य पक्ष:

  1. आम आदमी पार्टी 50 - 60
  2. वंचित बहुजन आघाडी 25 - 30

दरम्यान,  उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ असून सर्व अधिकृत उमेदवारांना आज एबी फॉर्म देण्यात येणार आहेत. या अर्जांची छाननी  31 डिसेंबर रोजी उद्या होणार असून  2 जानेवारी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, तर 3 जानेवारी रोजी अंतिम उमेदवार यादी स्पष्ट होईल.

Dec 30, 2025 09:02 (IST)

LIVE Update: शिवसेना शिंदे गटात वाॅर्ड क्रमांक २०० मध्ये बंडखोरी

शिवसेना शिंदे गटात वाॅर्ड क्रमांक २०० मध्ये बंडखोरी

वाॅर्ड क्रमांक २०० हा भाजपला सुटल्याने शिवसेना शाखा क्रमांक २०० चे शाखाप्रमुख आशिष कोदे यांनी अपक्ष फाॅर्म भरत बंडखोरी केली आहे

कार्यकर्ता हा नेहमी कार्यकर्ताच राहतो अशी पोस्ट सोशल मिडियावर करत आशिष कोदे यांनी पक्षश्रेष्टींवर नाराजी व्यक्त केली

या ठिकाणाहून भाजपने महायुतीचा उमेदवार म्हणून संदीप पानसंडे यांना उमेदवारी दिली आहे

या मुळे भाजपसह शिवसेनेच्या शिंदेगटातही बंडखोरी झाली आहे

Dec 30, 2025 08:10 (IST)

Nagpur Election LIVE Updates: नागपुरात अखेर भाजप शिंदे सेना यांची युती; जागा वाटपही ठरले

नागपुरात अखेर भाजप शिंदे सेना यांची युती!

अजित दादांचा पक्ष नागपुरात महायुतीबाहेर पडला, मात्र शिवसेना चर्चेच्या टेबलावर टिकून राहिली. इकडे भाजपने ए बी फॉर्म वितरित करणे सुरू केले होते. अशात शेवटी मध्यरात्री नंतर समेट झाला.

शिवसेना शिंदे गटाला भाजपने दिल्या 8 जागा.. शिंदे सेनेने 25 जागांची मागणी केली होती. तर, भाजपने सहा जागा देऊ केल्या होत्या.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मॅरेथॉन चाललेल्या बैठकीत मध्यरात्रीनंतर एकदाचे ठरले. शिवसेनेकडून आशिष जयस्वाल, किरण पांडव, कृपाल तुमाने उपस्थित होते. 2012 मध्ये एकत्र लढून एकीकृत सेनेला 6 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, 2017 मध्ये स्वबळावर लढवून शिव सेना मात्र 2 जागांवर विजयी ठरली होती.

Dec 30, 2025 07:59 (IST)

Ichalkaranji Election LIVE Updates: इचलकरंजी महानगरपालिकेत महायुती एकत्र, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला. त्यामुळे ही निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढविण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजप 52, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 2 जागा असा फॉर्मुला निश्चित झाला आहे.

 भाजपने महापालिका निवडणुकीची उमेदवारी ज्यांना जाहीर केली त्यांना पक्षाचा एबी फॉर्म भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर याच्या हस्ते देण्यात आला. तर ज्यांना भाजपाची उमेदवारी मिळाली नाही त्यापैकी काहींनी विरोधी शिव-शाहू विकास आघाडीमधून उमेदवारी घेत, भाजप विरोधात लढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी ठेवली आहे.

Dec 30, 2025 07:45 (IST)

Mira Bhayandar Election LIVE Updates: मीरा-भाईंदरमध्ये भाजप शिवसेना युतीची शक्यता मावळली

मीरा-भाईंदर मध्ये भाजप शिवसेना युतीची शक्यता मावळली

भाजपकडून रात्री उशिरा उमेदवारांना एबी फॉर्म वाटप सुर

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून कोणताच प्रतिसाद नाही

. प्रताप सरनाईकांनी युतीबाबत नरेंद्र मेहता यांना दिला होता 24 तासाचा अल्टिमेटम 

 सोमवारी दुपारी अल्टिमेटम संपून देखील मेहता यांच्याकडून कोणताच प्रतिसाद नाही

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला अवघे काही तास शिल्लक

Dec 30, 2025 07:24 (IST)

Nashik Manapa Election LIVE Updates: नाशिकमध्ये काँग्रेसला धक्का, एकमेव नगरसेवक शिवसेनेत

नाशिकच्या मनमाडमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव नगरसेवक मुश्ताक उर्फ बब्बू कुरेशी यांनी पक्षाला राम राम ठोकून आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेने प्रवेश केला. नगर परिषद निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात फक्त मनमाडला काँग्रेसने खाते उघडले होते मात्र एकमेव निवडून आलेल्या या नगरसेवकाने देखील पक्षाची साथ सोडली त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे 

Dec 30, 2025 07:17 (IST)

BMC Election LIVE Update: मुंबईत काँग्रेसचे ठरले, 139 जागा लढवण्याचा निर्णय

मुंबईत काँग्रेस पक्षाचं ठरलं

मुंबई महापालिका निवडणूकिसाठी एकूण 139 जागा मुंबई काँग्रेस लढावणार

इतर 62 या वंचित बहुजन आघाडी तर इतर छोट्या मित्र पक्षांना देण्यात आल्या आहेत

Dec 30, 2025 07:17 (IST)

Nashik Election LIVE Updates: भाजपकडून आज दुपारी २ वाजता 'बी' फॉर्मचे वाटप

भाजपकडे इच्छुकांचा प्रचंड भरणा असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक बंडखोरीची शक्यतादेखील भाजपमध्येच आहे. त्यामुळे या संभाव्य बंडखोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी भाजपने आधीच निर्धारित केलेल्या उमेदवारांना मंगळवारी दुपारी २ वाजता 'बी' फॉर्मचे वाटप करण्यात येणार आहे.भाजपकडे प्रत्येक वॉर्डमध्ये किमान १० ते कमाल २० उमेदवार इच्छुक आहेत. त्यातील निम्मेच उमेदवार जरी प्रबळ दावेदार असल्याचे मानले तरी एकाला तिकीट जाहीर झाल्यानंतर निम्म्या इच्छुकांकडून बंडखोरी करून नये, यासाठी सर्व अंतिम उमेदवारांना दुपारी २ वाजता बोलावून 'बी' फॉर्मचे वाटप करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

Dec 30, 2025 07:15 (IST)

Pune Election LIVE Updates: दोन्ही राष्ट्रवादींचा जागांचा फॉर्म्युला ठरला

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही पक्षांमध्ये पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुणे महापालिका निवडणूकही एकत्र लढविण्यावर शिक्कामोर्तब झाले. 

दोन दिवस चाललेल्या जागा वाटपाच्या वाटाघाटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १२५, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ४० जागा लढविण्याचा फॉर्म्युला दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये मान्य करण्यात आला. 

Dec 30, 2025 07:14 (IST)

Nashik Election LIVE Updates: नाशिकमध्ये इच्छुकांची गर्दी, एकाच दिवसात तब्बल ८९७ उमेदवारी अर्ज दाखल

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सोमवारी एकाच दिवसात तब्बल ८९७ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने आज आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे.

शहरातील सर्व दहा निवडणूक कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती. सिडको विभागात अर्ज दाखल करताना गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, तर सातपूर विभागात १३६ अर्ज दाखल झाले. नाशिकरोडमध्ये इच्छुकांची मोठी वर्दळ दिसून आली.

पंचवटीत इच्छुकांमध्ये उत्साह तर कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. पश्चिम विभागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून पूर्व विभागात तरुणांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले.अधिकृत उमेदवारांना देण्यात येणारे एबी फॉर्म मंगळवारी वितरित होणार असल्याने पक्षाकडून उमेदवारी निश्चित होणार की नाही, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.