Mill Workers Protest: गिरणी कामगारांच्या आंदोलनावर तोडगा निघणार? 'ते' महत्त्वाचे कलम रद्द; बैठकीत सकारात्मक चर्चा

बैठकीला  गिरणी कामगार संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीत गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा निघाल्याचं सांगण्यात येत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Mill Workers Strike News: मुंबईतील हक्काच्या घरासाठी आंदोलन पुकारलेल्या गिरणी कामगारांच्या लढ्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गिरणी कामगारांच्या आंदोलनावर तोडगा निघाला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत सगळ्यात महत्वाचा 17 नंबर कलम रद्द करण्याचा निर्णय रद्द झाला आहे.

(नक्की वाचा: डीआरपीने सुरु केली पर्यावरण मंजुरी प्रक्रिया, धारावी प्रकल्पांतर्गत अक्सा-मालवणीतील जमिनीसाठी टीओआर दाखल)

मुंबईत हक्काचे घर मिळावे.. या मागणीसाठी गिरणी कामगारांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन पुकारले आहे. आज गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. या बैठकीला  गिरणी कामगार संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीत गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा निघाल्याचं सांगण्यात येत आहे. 

17 नंबर कलमामध्ये जर एखाद्या अर्ज दराने शेलू किंवा वांगणीमध्ये घरे घेण्यास नकार दिला  तर त्यांचा अर्ज नाकारला जाईल असं नमूद केलं होते. मात्र आता या बैठकीत हा कलम रद्द करण्यात आला आहे. ज्या अर्ज दरांना शेलू वांगणीमध्ये घर नको हवं असेल त्यांना मुंबईत घरं मिळतील असं आश्वासन या बैठकीत देण्यात आलं आहे. सोबतच जास्तीत जास्त घर मुंबईत उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रयत्न हे सरकार करणार आहे.

विद्यार्थी अपघात विमा योजना; नुकसान भरपाई जलद देणार

रमाबाई कामराज नगर इथे एसआरएचा प्रकल्प सुरु आहे, तिथे देखील घरं शक्यतो दिली जातील.  ज्यांचा मेंटेनन्स मोठा आहे, पण घरं लहान आहेत त्यांचा मेंटेनन्सही माफ केला जाणार आहे. तसेच कोन गावात जी घरं दिली आहेत त्यांचा मेंटेनन्स माफ करण्याचा आदेश दिला आहे.नवीन लोकं जी येतील त्यांचा मेंटेनन्स साडे चार हजारवरून केवळ एक हजारवर करण्याची मागणी या गिरणी कामगारांनी केली असून यावर सरकार विचार करेल असं उत्तर देण्यात आलं आहे

Advertisement