Pankaja Munde News: पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने संपवलं आयुष्य, 10 महिन्यापूर्वी झालेलं लग्न

Pankaja Munde PA Anant Garje News:  अनंत गर्जे असे  पंकजा मुंडे यांच्या पीएचे नाव असून गौरी गर्ज असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pankaja Munde PA Wife Suicide Case:  भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत गर्जे असे  पंकजा मुंडे यांच्या पीएचे नाव असून गौरी गर्ज असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. गौरी गर्जे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. १० महिन्यांपूर्वीच पीए अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांचा विवाह झाला होता. १० महिन्यातच गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 

अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर असल्याने गौरी गर्जे या अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गौरी गर्जे यांचा सासरच्या मंडळींकडून छळ होत होता, असा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. ही आत्महत्या नसून हत्या आहे असा थेट आरोप गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांनी केला असून याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी कुटुंबीय दाखल झाले आहेत. जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिकाही कुटुंबियांनी घेतली आहे.