IPS Transfer: मुंबई पोलीस दलात मोठे बदल! 6 धडाकेबाज IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संदीप घुगेंकडे मोठी जबाबदारी

पोलीस आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानंतर, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ (एन) (२) अन्वये हे अधिकृत आदेश काढण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

रिझवान शेख, मुंबई:

Mumbai Police News:  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राची प्रशासकीय सेवा तसेच पोलीस यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी बदल्यांचा धडाका सुरु आहे. रविवारी पुन्हा एकदा गृह विभागाने मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार अनेक पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत तसेच नवीन पदस्थापना जाहीर करण्यात आली आहे. 

Nalasopara Crime: गर्भपाताच्या गोळ्यांचा काळाबाजार! रंगेहाथ पकडताच डॉक्टरने जे केलं; थेट FDA अधिकाऱ्यांनाच...

मुंबई पोलीस दलात मोठे बदल 

मुंबई पोलीस दलातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील कायदा व सुव्यवस्था अधिक चोख ठेवण्यासाठी आणि प्रशासकीय कामात गतिशीलता आणण्यासाठी पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अनेक वरिष्ठ पोलीस उपायुक्तांच्या (DCP) बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. पोलीस आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानंतर, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ (एन) (२) अन्वये हे अधिकृत आदेश काढण्यात आले आहेत.

Advertisement

​या बदल्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या परिमंडळांचे अधिकारी बदलले आहेत. यामध्ये डीसीपी मनीष कलवानिया यांची परिमंडळ ८ मधून परिमंडळ १ मध्ये बदली झाली आहे. तर परिमंडळ ४ च्या डीसीपी राघासुधा आर. आता परिमंडळ २ चा कारभार सांभाळतील. विशेष कृती दलातून निमित्त गोयल यांची परिमंडळ ८ चे नवे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

​तसेच, परिमंडळ २ चे डीसीपी मोहित कुमार गर्ग यांची परिमंडळ ९ मध्ये बदली करण्यात आली आहे. राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत असलेले संदीप घुगे आता मुंबईत परिमंडळ ११ चे उपायुक्त असतील. तर 'फोर्स वन'चे पोलीस अधीक्षक गजानन राजमाने यांच्याकडे परिमंडळ १२ च्या पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक तसेच गुन्हेगारी नियंत्रण या पार्श्वभूमीवर हे फेरबदल अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पोलीस प्रशासनाला अधिक बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Pune News: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! दगडूशेठ गणपती मंदिराबाबत मोठा निर्णय; CM फडणवीसांची घोषणा