9 hours ago

Mumbai Rain Live Updates:  गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा बॅटिंग सुरु केली आहे. नवी मुंबई (Navi Mumbai Rain) शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतील बेलापूर, वाशी, खारघर, उरण या भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन सज्जही सज्ज झाले आहे.  मुंबईत पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर समुद्रालगत कोणीही जाऊ नका, असं आवाहन मुंबई पोलिसांनी ही सोशल मीडियावरुन केले आहे.

Jul 15, 2025 17:59 (IST)

पुढील दोन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांत पाऊस परतणार

बुधवार 16 जुलैपासून दोन दिवस नागपूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या पावसाचा इशारा 

बुधवार आणि गुरुवारी नागपूर जिल्ह्यात कित्येक ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजेच्या कडकडाटासह वादळी वारे आणिहलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवारी पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांत तसेच पश्चिम विदर्भातील बुलढाणा आणि अकोला या दोन जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुरुवार 17 जुलै रोजी उत्तर विदर्भात नागपूर सह भंडारा, गोंदिया आणि अमरावती या चार जिल्ह्यांत येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Jul 15, 2025 16:40 (IST)

Rain News: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अणूस्कुरा घाट बंद

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अणूस्कुरा घाटामार्गे कोल्हापूर जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

राजापूर पाचल कोल्हापूर रोडवर करंजफेण मार्गावर पुराचे पाणी आल्याने सकाळ पासून  वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे

पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Jul 15, 2025 15:07 (IST)

Rain News: रोह्याच्या भिसे खिंडीत दरड कोसळली, वाहतूक बंद

भिसे खिंडीत दरड कोसळली वाहतूक बंद.

रोहा नागोठणे मार्गवरील भिसे खिंडीतील घाट भागात दरडी सोबत टेकडी वरील झाडे ही कोसळून रस्ता बंद झाला आहे. तसेच टेकडी वरुन वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी.

रोहा नागोठणे मार्गांवर अनेक ठिकाणी पाणी साचले. पाण्याची लेवल वाढत असून

गोड्या नदीला पाणी वाढलं आहे.

भिसे खिंडीतील वरील बाजूकडून सतत माती अजून घसरत आहे. कदाचित मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याची शक्यता आहे. महादेव खार येथे सुद्धा रस्त्यावरती दरड आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे

कोलाड शाळेकडून रोड बंद करण्याची मागणी होत आहे.

Jul 15, 2025 15:05 (IST)

Konkan Rain: सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जाहीर

गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री पासून दमदार हजेरी लावली आहे. सावंतवाडी, कुडाळ आणि दोडामार्ग तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला. तर जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यातील गावातही पावसाचा जोर अधीक होता. दरम्यान आज सकाळपासून पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत असून गेल्या 24 तासात जिल्ह्यात 70 मिमी पाऊस झाला आहे. तर दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 123 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement
Jul 15, 2025 15:04 (IST)

Rain News: जोरदार पावसामुळे म्हसळा तालुक्यातील 4 गावांचा संपर्क तुटला

म्हसळा तालुक्यातील ढोरजे नदीवरील पुलावरून पाणी गेल्याने चार गावांचा संपर्क तुटला आहे.

म्हसळा ते कुडतुडी ढोरजे रस्त्यावरील हा छोटा पूल आहे.

याच रस्त्याला पर्याय म्हणून देवघर हा मार्ग आहे मात्र तेथेही दरड कोसळून तो देखील रस्ता बंद झाला आहे..

देवघर, कुडतुडी, देवघर कोंड, या गावातील रस्त्याचा संपर्क तुटला आहे.

येथील ग्रामस्थानी अनेकवेळा या मार्गांवरील जास्त उंचीच्या नवीन पुलाची मागणी केली आहे, मात्र याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करण्यात येते.

महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचा मतदार संघ असून मागील 25-20 वर्षा पासून खासदार सुनील तटकरे यांचे वर्चस्व असलेला म्हसळा तालूका ओळखला जातो.

Jul 15, 2025 15:03 (IST)

Rain News: रायगडच्या रोह्यात जोरदार पाऊस

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आज सकाळच्या सुमारास अतिवृष्टी पाहायला मिळाली. अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पहाटे अचानक आल्याने नागरिकांची तालांबळ उडली, रोह्यातील आडवीबाजारपेठ, दमखाडी, छत्रपती शिवाजी नगर, त्रिमूर्ती नगर,  रोहा नगर परिषद, वरसे , भुवनेश्वर येथे झालेल्या अतिवृष्टी मुळे पाणी भरलेले पाहायला मिळाले.

Advertisement
Jul 15, 2025 15:01 (IST)

Rain News: नवी मुंबई बेलापूरचा बस डेपो पाण्याखाली

नवी मुंबई शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे मुसळधार पावसाचा फटका नवी मुंबई शहरातील बेलापूरचा बस डेपो बसला आहे. नवी मुंबईतील सकल ठिकाणी पाणी साचले.

Jul 15, 2025 15:00 (IST)

Konkan News: संगमेश्वर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं

संगमेश्वर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं

रात्रभर धो-धो कोसळणाऱ्या पावसाने संगमेश्वर आठवडा बाजार परिसरात भरलं पाणी

सोनवी नदी पात्रा बाहेर पाणी मोठ्या प्रमाणात 

सोनवी आणि शास्त्री नदीच्या संगमाचं पाणी शिरलं संगमेश्वरच्या रामपेठ बाजारात

रामपेठ बाजारपेठ परिसरात पाणीचपाणी

दुकानं पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

रामपेठ शाळा, अंगणवाडी कडील रस्ता वाहतुकीस बंद 

 मुसळधार पावसामुळे व्यापारी वर्गाची धाकधूक वाढली 

साहित्य सुरक्षित स्थळी घेऊन जाण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग

Advertisement
Jul 15, 2025 14:58 (IST)

Konkan Rain: खेड शहरात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती

खेड तालुक्यात गेल्या काही तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात पाणी घुसल्याने नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

शहरातील मच्छी मार्केटच्या पाठीमागील रस्त्यावर एक महिला तिच्या दुचाकीसह पाण्यात अडकली होती. रस्ता पुराच्या पाण्याखाली गेल्याने ती महिला अडकली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

याची माहिती मिळताच सरफराज पांगारकर, एजाज खेडेकर, खालील जुईकर आणि अल सफा वेल्फेअर फाउंडेशनचे कार्यकर्ते तात्काळ मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेला सुरक्षित रित्या पाण्यातून बाहेर काढून सुखरूप घरी पाठवलं.

Jul 15, 2025 14:58 (IST)

Rain News: वाशिममध्ये पावसाची जोरदार बॅटींग

वाशिम च्या मालेगाव तालुक्यात दोन दिवस उघाडी नंतर जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. पावसामुळं पेरणी झालेल्या पिकांना जीवदान तर काही दिवसा आधी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याच्या पेरण्या खोळंबल्या आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे....

Jul 15, 2025 14:56 (IST)

Mumbai Rain: जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली

जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली

अंधेरी सबवेच्या खाली सुमारे दोन ते तीन फूट पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद

Jul 15, 2025 14:54 (IST)

Rain News: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच, सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

रत्नागिरी जिल्ह्यातील तीन नद्यानी ओलांडली इशारा पातळी

खेडमधील जगबुडी, संगमेश्वर मधील शास्त्री, आणि राजापूर मधील कोदवली नदीने ओलांडली इशारा पातळी 

नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या बाजारपेठेमध्ये शिरलं पाणी 

संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीला देखील पूर 

शास्त्री नदीचे पाणी जवळपासच्या शेतात शिरलं

जगबुडी नदीच्या पुराचं पाणी सखल भागात शिरलं

Jul 15, 2025 14:48 (IST)

Rain News: मुंबई गोवा महामार्गवर कशेडी घाटात दरड कोसळली

मुंबई पुणे जुन्या महामार्गांवर पोलादपूर तालुक्याच्या हद्दीतील  कशेडी घाटातील भोगाव हद्दीत खचलेल्या रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली आहे. मोठा दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक धोकादायक झाली असून, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सन 2005 पासून या भागात वारंवार दरडी कोसळत असून, रखडलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरू असूनही अद्याप पूर्ण झालेले नाही. मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

Jul 15, 2025 13:32 (IST)

Mumbai Rain Live Updates: मुंबईकरांनो कामाशिवाय घराबाहेर पडू नका, पुढील 3-4 तासात जोरदार पाऊस

पुढील ३-४ तासांत मुंबई जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. बाहेर पडताना खबरदारी घ्या, असं आवाहन हवामान विभागाने केले आहे. 

Jul 15, 2025 13:06 (IST)

Mumbai Rain News: नवी मुंबई बेलापूरचा बस डेपो पाण्याखाली

नवी मुंबई बेलापूरचा बस डेपो पाण्याखाली 

नवी मुंबई शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे मुसळधार पावसाचा फटका नवी मुंबई शहरातील बेलापूरचा बस डेपो बसला आहे 

नवी मुंबईतील सकल ठिकाणी पाणी साचले

Jul 15, 2025 13:00 (IST)

Mumbai Pune Rain Live Updates: पुण्यातही जोरदार पाऊस

पुणे शहर (Pune Rain Update) आणि परिसरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आज देखील पाऊस हा सातत्याने पडताना दिसत आहे त्यामुळे पुणे शहरांमध्ये काही प्रमाणात वाहतूक कुंडीचा त्रास हा पुणेकरांना सहन करावा लागलाय यासोबतच काही सखल भागात देखील पाणी साचले आहे याशिवाय पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ होताना दिसत आहे.

Jul 15, 2025 12:49 (IST)

Mumbai Rain Live Updates: समुद्रकिनारी जाऊ नका, मुंबई पोलिसांचे आवाहन

मुंबईत पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Mumbai Weather Update) दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर समुद्रालगत कोणीही जाऊ नका, असं आवाहन मुंबई पोलिसांनी ही सोशल मीडियावरुन केले आहे.

Jul 15, 2025 12:48 (IST)

LIVE Updates: नवी मुंबईत जोरदार पाऊस

नवी मुंबई (Navi Mumbai Rain) शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतील बेलापूर, वाशी, खारघर, उरण या भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन सज्जही सज्ज झाले आहे.