Mumbai Crime: "मेहता सुधर जा.." मुंबईत प्रसिद्ध बिल्डरला छोटा शकिलच्या नावाने धमकी, जिवंत काडतुसही पाठवलं

जेव्हा हा लिफाफा उघडण्यात आला, तेव्हा त्यात एक जिवंत काडतूस आणि धमकीचे पत्र सापडले.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, मुंबई

Mumbai Crime:  मुंबईमधील प्रसिद्ध व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक मेहुल मेहता यांना छोटा शकीलच्या नावाने धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धमकीच्या लिफाफ्यासोबतच जिवंत काडतूस आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

मुंबईत छोटा शकीलच्या नावाने व्यावसायिकाला धमकी

कुप्रसिद्ध गँगस्टर छोटा शकीलच्या नावाने अंधेरीतील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक मेहुल मेहता यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या धमकीसोबतच एका लिफाफ्यात जिवंत काडतूसही पाठवण्यात आल्याने पोलीस दलात आणि बांधकाम व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Amravati: दारुड्या नवऱ्याचा रोजचा जाच कायमचा संपवला, अमरावतीमध्ये महिलेनं केलेल्या हल्ल्याचा धक्कादायक शेवट

मेहुल मेहता यांची अंधेरी पश्चिम येथील 'चार बंगला' परिसरातील मॉडेल टाऊनमध्ये एक मोठी बांधकाम साईट सुरू आहे. या साईटवर त्यांच्या वाहनाच्या नंबर प्लेटजवळ एक संशयास्पद लिफाफा सुरक्षा रक्षकाला आढळून आला. जेव्हा हा लिफाफा उघडण्यात आला, तेव्हा त्यात एक जिवंत काडतूस आणि धमकीचे पत्र सापडले.

मेहता सुधार जा..

पत्रात अत्यंत आक्रमक भाषेत इशारा देण्यात आला आहे की, "मेहता सुधार जा, तुझे समज मे नाही आ रहा, आज ये बाहर है, कल ये तेरे सीने के अंदर होगा... अल्ला हाफिज छोटा शकील." ​मेहता यांचे खाजगी सुरक्षा रक्षक वैभव सोमा बावकर यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि रीतसर तक्रार दाखल केली.

Advertisement

( नक्की वाचा : Doctor Suicide: मैत्री, प्रेम आणि नंतर छळ...फौझीलनं स्तुतीला टोकाचं पाऊल उचलण्यास कसं भाग पाडलं? मोठा खुलासा )

दरम्यान, मेहुल मेहता यांना यापूर्वीही छोटा शकीलच्या नावाने धमक्या आल्या आहेत, त्यामुळे ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली जात आहे. खंडणीसाठी किंवा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ही धमकी दिली गेली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुंबई गुन्हे शाखेची पथकेही समांतर तपास करत आहेत.