Ro Ro Ferry: गणेशभक्तांसाठी खुशखबर! मुंबई- सिंधुदुर्ग 'रो रो सेवा' लवकरच सुरु होणार; किती असेल तिकीट दर?

Mumbai Sindhudurg Ro Ro Ferry Service: या सेवेचा टेस्ट ड्राईव्ह यशस्वीरित्या झाल्यावरच त्याचे बुकिंग सुरू होईल, अशी माहिती बंदर निरीक्षक अधिकारी उमेश महाडीक यांनी दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

गुरु दळवी, प्रतिनिधी:

Mumbai Sindhudurg Ro Ro Ferry Service:  गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशातच चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  सिंधुदुर्ग बंदर विभागाकडून विजयदुर्ग जेटीवर युद्धपातळीवर काम सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माझगाव-मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा सुरू होणार आहे. ज्यामुळे चाकरमान्यांना गावी जाणेही सोपे होणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  विजयदुर्ग बंदरात सागरी रो रो सेवेचे जेटी उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मागील आठ दिवसापासून काम सुरू असून सध्या विजयदुर्ग बंदरात प्लॉटिंग पार्टून्स उभारले जात आहेत. हे काम अजून १० ते १५ दिवस काम सुरू असणार आहे. गणेश चतुर्थीच्या आधी दोन-तीन दिवस ही सेवा सुरू होईल. असे सांगण्यात येत आहे. या सेवेचा टेस्ट ड्राईव्ह यशस्वीरित्या झाल्यावरच त्याचे बुकिंग सुरू होईल, अशी माहिती बंदर निरीक्षक अधिकारी उमेश महाडीक यांनी दिली आहे.

Mumbai to Goa मुंबईकरांचं स्वप्न होणार पूर्ण, गोवा प्रवास होणार जलद! राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा

किती असतील दर?

मुंबई वरून विजयदुर्ग ला येण्यासाठी या M2M बोटीचे अंदाजित तिकीट किती असेल? याबाबतची माहितीही आता समोर आली आहे. या बोटीमध्ये जनरल प्रवाशी भाडे--600 ते 1000 रुपये इतके असेल तर गाडी भाडे-1500 ते 2000 पर्यत असणार आहे. वरील दर हे अंदाजित आहेत, ज्यावेळी बुकिंग सुरू होईल त्यावेळी यामध्ये प्रवाशाची संख्या गाड्यांची संख्या बनून हे दर कमी जास्त होऊ शकतात, असंही सांगण्यात आले आहे. 

Navi Mumbai : उलवे-बेलापूर ध्रुवतारा जेट्टीजवळ पुलाखाली बेकायदेशीर गोडाऊन; पोलिसांचं दुर्लक्ष