Nandurbar News: रेशनच्या तांदळाचा गुजरातमध्ये काळाबाजार! 53 लाखांच्या मुद्देमालासह 3 ट्रक जप्त

पथकाने एकुण 856 क्विटल रेशनचा तांदुळ आणि तीन ट्रकांसह या कारवाईत तब्बल 53 लाख 76 हजार 630 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार: रेशनचा तांदूळ परराज्यात काळया बाजारात विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करणाऱ्यांवर तीन ट्रक पोलीसांनी जप्त केले आहे. नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकुण 856 क्विटल रेशनचा तांदुळ आणि तीन ट्रकांसह या कारवाईत तब्बल 53 लाख 76 हजार 630 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी गावाजवळीला एका पेट्रोलपंपासमोर पोलीसांनी सापळा रचत या तीन ट्रकांना काही अंतरांनी थांबवत त्यांची तपासणी केली.  ट्रक चालकांना विचारला असता छत्रपती संभाजीनगर येथील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाच्या याट्रमध्ये नागपुर येथील एका व्यापाऱयाचा तांदुळ हा गुजरात मध्ये जात असल्याचे सागण्यात आले. मात्र या तांदळाच्या मालांची कुठलीही वैध पावती त्यांच्याकडे आढळून आली नाही.

तसेच पथकाने ट्रकांमधील मालाची तपासणी करता त्यात विविध रंगाच्या तांदुळ भरलेल्या गोण्या मिळुन आल्या. गोण्यांवर कोणत्याही कंपनीचे लेबल नव्हते तसेच गोण्यांमधील तांदुळची पाहणी करता तो साठवणुक केलेला रेशनचा जुना तांदुळ असल्याचे मिळालेल्या गोपनिय माहितीप्रमाणे दिसुन आले.

( नक्की वाचा :  Spy Racket : पाकिस्तानमध्ये शूटिंगसाठी गेली आणि हेर बनली! ISI एजंट महिला YouTuber सह 6 जणांना अटक )

त्याअन्वये नमुद तिनही इसमांना नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने ताब्यात घेतले. त्याअन्वये आरोपींविरुध्द विसरवाडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 150/2025 जिवनाश्यक वस्तु अधि. 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

Advertisement

Topics mentioned in this article