Ashok Kharat: शिर्डी, सिन्नर, कोपरगाव... वासनांध अशोक खरातकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी, कुठे किती घबाड?

अशोक खरात उर्फ कॅप्टन याचा दबदबा केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे, तर अहिल्यानगर जिल्ह्यातही पसरलेला असल्याचं या प्रकरणातून दिसून येत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील दवंगे, प्रतिनिधी:

Ashok Kharat Net Worth:  भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या, हायप्रोफाईल व्यक्तींची कुंडली सांगणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरातच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. स्वत:ला ज्योतिष म्हणवून घेणाऱ्या कॅप्टनने अनेक महिलांशी किळसवाणे कृत्य केल्याचे समोर आले असून त्याने कोट्यावधींची संपत्ती कमावली आहे. खरातच्या या संपत्तीचा आकडाच आता समोर आला आहे. 

अशोक खरातचे अफाट साम्राज्य

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  बलात्काराचा आरोप असलेल्या अशोक खरातने मागच्या 15 वर्षात 200 कोटींची माया जमवली. विविध मोक्याच्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या जमिनी विकत घेतल्या. सिन्नर, शिर्डी आणि कोपरगाव परिसरातही त्याने कोट्यवधींची मालमत्ता उभी केली. एवढंच नाही तर शिर्डीतील पंचतारांकित आणि अतिमहत्त्वाच्या भागात त्याच्या नावावर तब्बल चार एकरांचा भूखंड असल्याचंही समोर आलंय. बाजारभावानुसार या भुखंडाची किंमत जवळपास पन्नास कोटी रुपये असल्याचं सांगितले जात आहे. 

Advertisement

Crime News: शिर्डी हादरली! तरुणीचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, कर्मचाऱ्यांनी रात्री घडलं ते सविस्तर सांगितलं

शिर्डीतील प्राईम लोकेशनवर असलेला तब्बल चार एकरांचा भूखंड त्याने चार वर्षांपूर्वी खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे ही जमीन शेती करण्यासाठी बाबासाहेब गोंदकर यांना दिली होती. गोंदकर यांनी या ठिकाणी गव्हाची पेरणी केली होती. मात्र अचानक दमदाटी करत घाईघाईने गव्हाची काढणी करून नेण्यात आल्याचा गंभीर आरोप बाबासाहेब गोंदकर यांनी केला आहे. अशोक खरात उर्फ कॅप्टन याचा दबदबा केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे, तर अहिल्यानगर जिल्ह्यातही पसरलेला असल्याचं या प्रकरणातून दिसून येत आहे. 

घराच्या तपासात पिस्तुल अन् काडतुसे! 

दरम्यान, आज कॅप्टन अशोक खरातच्या नाशिक आणि मिरगावमधील घरांची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. या तपासामध्ये अनेक महत्वाची कागदपत्रे आणि पुरावे पोलीसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.  तसेच कॅप्टन खरातच्या फार्म हाऊसमधून एक पिस्तूल नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलं हस्तगत केली आहेत. यामध्ये एक पिस्तूल आणि काही जिवंत तर काही न वापरलेले काडतूस देखील पोलिसांना सापडल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. 

(नक्की वाचा-  रुग्णाची हॉस्पिटलकडे एक मागणी अन् 1 लाखाचे बिल 57 हजारांवर, सगळ्यांना जागृत करणारी पोस्ट)