Nashik Rain News: नाशिकमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस! 5 धरण ओव्हरफ्लो, जायकवाडीचा पाणीसाठा किती टक्क्यांवर?

Nashik Rain Update Dam Water Storage: नाशिकमधील 12 धरणांमधून विसर्गाला सुरुवात झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून दुतोंडया मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

 Nashik Rain Jayakwadi Dam Water Storage: नाशिकवर यंदा वरुणराजाची कृपादृष्टी पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये गेल्या 36 दिवसात 60 दिवसांचा पाऊस बरसला (Heavy Rain in Nashik) आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात दुप्पट पाऊस कोसळला असून जिल्ह्याचा धरणसाठा 70 टक्क्यांवर गेला आहे. 23 पैकी 5 धरण ओव्हरफलो झाल्याने विसर्गात मोठी वाढ करण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नाशिकमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस! (Record Break Rain In Nashik)

दरवर्षी नाशिक जिल्ह्यात सहा जुलैपर्यंत सरासरी 211 मिलिमीटर पाऊस इतका पाऊस पडतो. यंदा मात्र 411 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे गंगापूर धरणाचा पाणीसाठा 60.42 टक्क्यांवर गेला असून सरासरीपेक्षा 21 दिवस आधीच 60 टक्के धरण भरले आहे. नाशिकमधील 12 धरणांमधून विसर्गाला सुरुवात झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून दुतोंडया मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे. 

जायकवाडी धरणातील पाणीसाठा 52 टक्क्यांवर! (Jayakwadi Dam Water Storage)

नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने, जायकवाडी धरणातील पाणीसाठा 51 टक्के झाला आहे.  धरणात दाखल होणाऱ्या पाण्याची आवक रविवारी सायंकाळी 16 हजार 295 क्युसेकने सुरू होती. आज ही आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बारा दिवसांपूर्वी धरणाचा साठा 29 टक्के होता, मात्र वरील भागात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर आला.

त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठा देखील झपाट्याने वाढत आहे. जायकवाडी धरणाचा इतिहास पाहिला तर 1983 पासून जायकवाडीच्या पाण्याची टक्केवारी 18 वेळा 90 टक्क्यांपुढे, तर 8 वेळा शंभर टक्के झाली आहे. तसेच नाशिक, अहिल्यानगरमध्ये असाच पाऊस सुरू राहिल्यास यंदाही जायकवाडी 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. 

Advertisement

Vidarbha Rain : विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?

 जायकवाडी 100 टक्के कधीकधी भरले?

सन 1991: 100 टक्के
सन 2005: 100 टक्के
सन 2006: 100टक्के
सन 2007: 100 टक्के
सन 2008: 100 टक्के
सन 2009: 100 टक्के 
सन 2014: 100टक्के
सन 2016: 100 टक्के
सन 2018: 100 टक्के
सन 2020: 100 टक्के
सन 2024: 100 टक्के