Nashik TCS Nida Khan Arrested: नाशिक टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर शहरातून अटक करण्यात आली आहे. संभाजीनगर शहर पोलिस आणि नाशिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. धार्मिक भावना दुखावणे आणि बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत करणे असे निदा खानवर आरोप आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून निदा खानचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरू होता, अखेर तिला अटक करण्यात आली आहे.
निदा खानला कशी झाली अटक?
नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये संयुक्त कारवाई करत निदा खानला अटक केली. छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव येथील एका वसाहतीत कुटुंबासह निदाने आश्रय घेतला होता. तिच्या अटकेसाठी साध्या वेशातील वीसहून अधिक पोलिस निदा ज्या ठिकाणी वास्तव्यास होती त्या ठिकाणी लक्ष ठेवून होते यात महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. चार दिवसांपासून संभाजी नगरमध्ये पोलिस पथके तिच्या मागावर होती.
निदा खानला पकडण्यासाठी पोलिसांची तांत्रिक विश्लेषणावर आधारित मोहीम राबविली होती. दरम्यान निदाने महिनाभरात नाशिक, ठाणे, भिवंडी, मुंब्रा, छत्रपती संभाजीनगर असा प्रवास केल्याची सूत्रांची माहिती आहे. निदाच्या अटकेनंतर मोबाईलमधील अनेक डिजिटल पुरावे एसआयटीच्या हाती लागण्याची शक्यता आहे. निदा खान हिला अटक झाल्यानंतर या प्रकरणाचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे.
निदा खानवर कोणते आरोप आहेत?
निदा खान आणि इतर आरोपींनी पिडीत महिलेस धर्म परिवर्तन करण्यासाठी बुरखा दिला होता तसेच "मुहम्मद पैगम्बर यांचे पवित्र जिवन" असे मुस्लीम धर्माचे माहितीचे पुस्तकही दिले होते. निदा खान हीने पिडीत महिलेच्या धर्म परिवर्तनाच्या उदद्देशाने फिर्यादीच्या मोबाईल मध्ये इस्लामिक धर्माचे अॅपलीकेशन टाकून दिले होते, मोबाईल वरून तिच्या धर्माबाबत धार्मिक शिकवण देण्या-या युटयूब लिंक, इन्टाग्राम लिंक आणि रिल्स वारंवार पीडित महिलेला पाठविल्या आहेत.
पिडीतेला पाठवत असलेल्या धार्मिक शिकवण देण्या-या युटयूब लिंक, इन्टाग्राम लिंक, रिल्स तसेच व्हिडीओ हया तिला कुठून मिळाल्या याबाबत तपास बाकी आहे. तसेच निदा खान वेळोवेळी पीडित महिलेला धार्मिक शिकवण देत होती आणि फिर्यादी घरी घेवुन जावुन तिचे कडुन नमाज पठण करणे, हिजाब व बुरखा कसा परिधान करणे हे शिकवत होती. निदा खानला सदरचा गुन्हा करण्यासाठी कोणी अर्थसहाय्य किंवा मदत केली आहे का? निदा खानला गुन्हा दाखल झाल्यापासून कोणी आसरा दिला? निदा खानची कंपनीतून ट्रान्सफर झाल्यानंतर ती इतर आरोपींच्या संपर्कात होती का ? याबाबत तपास करणे बाकी आहे.
Mumbai News: मुंबईत BMC अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप; आझाद मैदान पोलीस ठाण्यात FIR दाखल