2 days ago

NDTV BMC Power Play: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 29 महापालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. या निवडणुकांमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीची सर्वाधिक चर्चा होत आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महानगरपालिकेवर सत्ता कोणाची येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकांत वातावरण तापले असतानाच यावर प्रकाश टाकण्यासाठी  NDTV नेटवर्कतर्फे आज (11 जानेवारी) 'NDTV BMC Power Play' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राजकीय चर्चेसोबतच मुंबईचा विकास, मुंबईकरांच्या अपेक्षा, या शहरासमोरील पायाभूत सुविधांची आव्हाने आणि ही आव्हाने पेलण्यासाठी कोणत्या नेत्याचा काय प्लॅन आहे? याबाबतच या कार्यक्रमामध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. एनडीटीव्ही मराठीच्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी सत्ताधारी पक्षांकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मंगलप्रभात लोढा, श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, नवाब मलिक उपस्थित असतील. 

त्याचबरोबर विरोधकांकडून संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल परब, सुषमा अंधारे असे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अमित ठाकरे, प्रफुल्ल पटेल, विनोद तावडे, शाइना एनसी, शीतल म्हात्रे इत्यादी नेते मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत.

Jan 11, 2026 17:36 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: "उद्धव ठाकरेंचा अहंकार प्रचंड वाढला होता, त्यामुळे..",आशिष शेलारांचा मोठा गौप्यस्फोट!

"महायुतीच्या अडीच-अडीच वर्षांच्या प्लॅनबाबत बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले, "त्यावेळी मी अध्यक्ष होतो. आज मी निवडणूक प्रमुख आहे. देवेंद्रजी तेव्हाही मुख्यमंत्री होते आणि आजही मुख्यमंत्री आहेत.अडीच-अडीच वर्षांचा प्लॅन खरा नव्हता. उद्धव ठाकरेंचा अहंकार वाढला होता. या निवडणुकीत उद्धव ठाकरे सव्वाशे वरून 84 वर आले होते. पण अहंकार असल्याने ते बोलायला तयार नव्हते. त्यांच्यातर्फे एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर यांनी बोलणं केलं होतं. राज्य सरकारमध्ये आम्ही एकत्र होतो.यासाठी भाजपने आणि देवेंद्रजीने मोठं मन दाखवलं.तेव्हा निर्णय झाला की,त्यांच्याच पक्षाचा महापौर बनेल. ती भूमिका आम्ही साकारली होती"

Jan 11, 2026 15:41 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: मुंबईचा विकास मुंबईकरांसाठी असला पाहीजे-नितेश राणे

"मुंबईचा विकास मुंबईकरांसाठी असला पाहीजे. पण मुंबईत काही ठिकाणी अशी स्थिती आहे की आपण कराचीत आहोत की पाकिस्तानात आहोत अशी स्थिती निर्माण झाली आहे.बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे एकनाथ शिंदे हेच खरे वारसदार आहेत.जे आपल्याला खरे वारसदार समजतात,ते हिंदूत्वावर बोलू पाहत नाहीत.ते हिंदूत्वाची खिल्ली उडवतात.महाकुंभची खिल्ली त्यांनीच उडवली",असं विधान राज्याचे मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांनी एनडीटीव्ही पॉवर प्ले कॉन्क्लेव्हमध्ये केलं आहे. 

Jan 11, 2026 15:06 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates:मुंबईच्या कोस्टल रोडबाबत शिवेसेनेच्या माझी खासदारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले..

"कोस्टल रोड हा 1970 पासूनचा प्लॅन आहे. गेले कित्येक वर्षे मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने कोणताही त्यात पुढाकार घेतला नाही.ही खोदलेली माती समुद्रात रेक्लेम केली तर कोस्टल रोडची कॉस्ट कमी होईल. आम्ही संकल्प केला की, मुंबई महापालिकेतर्फे तो कोस्टल रोड तयार करायचा. साधारण 15-20 हजार कोटींचा प्रकल्प असेल,तर त्याला केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य घ्यावं लागतं किंवा राज्य सरकारकडून अर्थसहाय्य घ्यावं लागतं.वर्ल्ड बँक किंवा प्रायव्हेट बँकाकडून अर्थसहाय्य घ्यावं लागतं", अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे. ते एनडीटीव्हीच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते. 

Jan 11, 2026 14:49 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: 'शरद पवार यांच्या पक्षासोबत युतीची अजिबात इच्छा नाही',प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात राजकीय संघर्ष पेटला आहे. अनेक ठिकाणी युत्या -आघाड्यांचे उमेदवार जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. अशातच पक्षांमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहे. शरद पवार यांच्या पक्षासोबत युतीची अजिबात इच्छा नाही, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.ते एनडीटीव्ही कॉन्केल्व्हमध्ये बोलत होते. 

Advertisement
Jan 11, 2026 14:11 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: मुंबईमध्ये महायुतीचीच सत्ता येणार: CM देवेंद्र फडणवीस

आमच्याकडे खूप जागा आहे. तिघे आरामात बसलो आहोत. कुठेही घुसमट नाही. आणखी छोटे- मोठे पक्ष असतील तर त्यांच्यासाठीही जागा केली आहे. एकनाथ शिंदे आपल्या नातवाला भेटायला दिल्लीत जातात अन् इकडे ते नाराज असल्याच्या बातम्या होतात. मी स्पष्टपणे सांगतो, या निवडणुकीत स्पष्ट बहुमत असेल आम्हाला कोणाचीही गरज लागणार नाही. आमची महायुती आहे आणि महायुतीचीच सत्ता येईल.

Jan 11, 2026 14:10 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: CM फडणवीस यांनी मांडला मुंबईच्या विकासाचा मेगाप्लॅन

धारावीमधील १०,००० लोकांना धारावीमध्येच आम्ही घर देत आहोत. हा पहिलाच प्रकल्प आहे. आम्ही मुंबईत ४३६ किलोमीटरचे मेट्रोचे जाळे उभारले. दिल्लीनंतर मुंबईत सर्वाधिक मेट्रोचा विस्तार झाला आहे. मुंबईमध्ये आज ५००० बसेस फिरत आहेत त्याआम्ही १०,००० पर्यंत नेऊ. मुंबईची लाईफलाईन लोकलमध्येही आम्ही सुधारणा केली आहे. सबबर्न रेल्वेमध्येही आम्ही आता मेट्रोसारखे डबे आणले आहेत. त्याचबरोबर वॉटर ट्रान्सफर्मचेही आम्ही डिझायन तयार केले आहे: देवेंद्र फडणवीस

Advertisement
Jan 11, 2026 13:44 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: उद्धव ठाकरेंनी नवीन स्क्रिप्ट रायटर ठेवावा: CM देवेंद्र फडणवीस

माझे  भाषण हे ९५ टक्के विकासावर असते. ५ टक्के मला उत्तरे द्यावे लागतात. मी चॅलेंज दिले आहे की उद्धव ठाकरेंचे विकासावर एक भाषण दाखवा आणि माझ्याकडून ५००० रुपये घेऊन जावा. मुंबईमध्ये मला उत्तरे द्यावे लागतात. हिंदूत्व आणि मराठी कधीही वेगळे होऊ शकत नाही. हिंदूत्त्व आणि मराठीला वेगळे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांची कॅसेट जुनी झाली आहेत, त्यांची रीलही तुटली आहे. त्यांनी स्क्रिप लिहण्यासाठी नवीन माणूस ठेवावा. किती दिवस संजय राऊतांची स्क्रिप्ट वाचणार आहात: देवेंद्र फडणवीस 

Jan 11, 2026 13:18 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: भाजपने नैतिकच्या गप्पा मारु नयेत: संजय राऊतांचा टोला

भाजपच्या उघड्या दरवाजातून जे गुंड भ्रष्टाचारी आत गेलेत त्यांन दूर करावं लागेल. आत जी शाळा सुरु ये ती बंद करावी लागेल. भाजपने नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत दर्शन घडवावं. पक्ष फोडण्याविषयी आमचं काही नाही. सत्तेचा वापर करून त्यांना यंत्रणेंचा वापर करून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आगा पिछा नसलेल्या माणसाच्या हाती दिला. शरद पवार असताना त्यांचा पक्ष अजित पवारांना दिला. अमित शाह आहेत तोपर्यंत त्यांच अस्तित्व राहिलं. त्यानंतर लोक त्यांना लाथा मारतील

Advertisement
Jan 11, 2026 13:16 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: आम्हाला हिंदूत्व शिकवण्याची गरज नाही: संजय राऊतांचा राणेंना टोला

मुंबईत जय महाराष्ट्र बोललं गेले पाहिजे. जय श्रीरामसाठी आम्हीही बलिदान दिलं आहे. आम्ही लढत होतो तेव्हा राणे काँग्रेसमध्ये होते. आम्ही अयोध्येत लढत होतो, जेलमध्ये होतो तेव्हा हे काँग्रेसमध्ये होते. हे आम्हाला जय श्री राम शिकवणार. हिंदुत्व त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही, ते आमच्या रक्तात आहे: संजय राऊत

Jan 11, 2026 13:14 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: मुंबईमध्ये हिंदू- मुस्लीम मुद्दा गरजेचा नाही: संजय राऊत

मुंबईत मराठी महापौर होईल यात गैर काय आहे. इथे हिंदी, पारशी महापौर होऊन गेले आहेत. देशाचा राष्ट्रपती मुस्लीम बनू शकतो.  भाजपने मुस्लीम राष्ट्रपती केला होता. अटल वाजपेयी यांनी मुस्लीम राष्ट्रपती केला होता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिमांनी देखील बलिदान दिलं आहे. मुसलमान देखील फासावर गेले होते. महाराष्ट्र बनला तेव्हा मुस्लिमांना देखील बलिदान दिलं आहे. एक निवडणूक अशी नाही तिथे भाजपने हिंदू-मुस्लीम केलं नाही. इथे विकासाच्या गोष्टी झाल्या पाहिजेत. मुंबईच्या समस्या वेगळ्या आहेत: संजय राऊत

Jan 11, 2026 13:11 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: आमच्यासाठी मुंबईमध्ये कोणीही परप्रांतीय नाही: पियुष गोयल यांचे विधान

महायुती जिंकल्यानंतर महापौर कोणाचा हे आम्ही निवडणुका झाल्यानंतर ठरवू. २०१७ खूप लांबची गोष्ट आहे. मुंबईत मेट्रो, अटल सेतूची कामे पूर्ण झाली आहेत. बुलेट ट्रेनचे कामही वेगाने सुरु आहे. मुंबईची वेगाने प्रगती होत आहे. त्यामुळे मुंबईकरांचा विश्वास, महाराष्ट्राचा विश्वास देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. आमच्यासाठी मुंबईमधील कोणीही परप्रांतीय नाही, असंही पियुष गोयल म्हणाले. 

Jan 11, 2026 13:10 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: महायुती 200 हून अधिक जागा जिंकणार: पियुष गोयल यांना विश्वास

२०० हून अधिक जागा भाजप आणि शिवसेनेच्या येतील. जनतेमध्ये काँग्रेसबाबत, महाविनाश आघाडीबाबत आक्रोश आहे. आता तिन्ही पक्ष वेगळे लढत आहेत. काँग्रेस तर या शर्यतीतही नाही. जनतेमध्ये यांच्याबाबत अविश्वासाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे कधी मतांसाठी मुस्लिमांच्या मांडीवर जाऊन बसतात. राज ठाकरेंचे पुत्र ट्रेन थांबवू असे म्हणतात. असा देश कसा चालेल? हे खूप छोटे विचार आहेत. वादग्रस्त विधाने करुन आपल्या छोट्या विचारांचे दर्शन त्यांनी करुन दिले आहे. ज्याला मतदार उत्तर देतील: पियुष गोयल

Jan 11, 2026 13:09 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: विरोधी उमेदवार उभे राहायलाही घाबरतात: पियुष गोयल

विधानसभा निवडणुकीत तुम्ही पाहिले आहे की उद्धव ठाकरेंची अवस्था काय झाली? शून्य अधिक शून्य म्हणजे शून्यच असते. आम्ही त्यांना उमेदवार उभे करण्यापासून तर अडवले नाही ना? आता माझ्या प्रभारामध्येच अनेक जागा अशा आहेत जिथे भाजप आणि शिवसेनाच निवडून येणार आहे. उभे राहणारे उमेदवारही म्हणतात काय फायदा? म्हणजे जनतेचे प्रेम इतके आहे की विरोधक उभे राहायला घाबरुन जातात.

Jan 11, 2026 12:03 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: २९ महानगरपालिकांच्या निवडणुका म्हणजे २०२९ ची नांदी: पूनम महाजन

२०१९ ला जे झाले, ज्या पद्धतीने जनता बघत होती, ते तसे राहिले नसल्याचे जनतेच्या लक्षात आले. कोण कोणासाठी काम करते हे सुद्धा जनतेला कळले. २०२४ लाही जनतेने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मत दिले. बाळासाहेबांच्या विचाराला जोडणारे २०१९ मध्ये कुठे गेले? अजित पवारांसोबतची युती ही फक्त विकासासाठी आहे. पक्ष वाढतो तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याला लढायचे असते. त्यामुळे अनेकदा युती होत नाहीत. आम्ही विकासासाठी सर्वांना घेत आहोत. २९ महानगरपालिकांच्या निवडणुका म्हणजे २०२९ ची नांदी असेल:

Jan 11, 2026 11:57 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: ही ठाकरे बंधुंच्या अस्तित्वाची लढाई: पूनम महाजन यांचे टीकास्त्र

"ही ठाकरे बंधुंच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे. त्यांच्या पुढच्या पिढीच्या अस्तित्वाची लढाई आहे. भारतीय जनता पक्षाची जनतेच्या विकासाची लढाई आहे. महाराष्ट्राचा रोडमॅप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या पद्धतीने मांडला आहे. मुंबई इथेच राहणार आहे, महाराष्ट्राची राजधानी राहणार आहे. पण तुम्ही कुठे जाणार? हा प्रश्न आहे." पूनम महाजन

Jan 11, 2026 11:56 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: "मराठी अस्मिता शिकवू नये: पूनम महाजन

"निवडणुका आल्या की मराठी अस्मिता आठवते. पण अभिजात भाषेचा दर्जा मराठीला कोणी दिला? आम्ही तो सर्वात आधी दिला. मराठी माणसाची अस्मिता कशी ठेवावी? त्याला वडापावची गाडी देऊन चालत नाही. या गोष्टी १५ तारखेपर्यंत बोलायला बऱ्या वाटतात. मराठी माणूस काही तुमची मक्तेदारी आहे का? मराठी माणसाची अस्मिता आम्हाला शिकवू नये, मराठी माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे: पूनम महाजन

Jan 11, 2026 11:56 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: "मराठी अस्मिता शिकवू नये: पूनम महाजन

"निवडणुका आल्या की मराठी अस्मिता आठवते. पण अभिजात भाषेचा दर्जा मराठीला कोणी दिला? आम्ही तो सर्वात आधी दिला. मराठी माणसाची अस्मिता कशी ठेवावी? त्याला वडापावची गाडी देऊन चालत नाही. या गोष्टी १५ तारखेपर्यंत बोलायला बऱ्या वाटतात. मराठी माणूस काही तुमची मक्तेदारी आहे का? मराठी माणसाची अस्मिता आम्हाला शिकवू नये, मराठी माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे: पूनम महाजन

Jan 11, 2026 10:50 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जाऊ देणारे महाराष्ट्रद्रोही: सुषमा अंधारे

महाराष्ट्रातील तरुण ड्रग्सच्या विळख्यात अडकला नाही पाहिजे यासाठी लढणारे नवाब मलिक आमच्यासाठी मराठी आहे मात्र ड्रग माफियांना वाचवणारे आमच्यासाठी महाराष्ट्र द्रोही आहेत. मराठी माणसाचा मराठी अस्मितेचा सन्मान करणारे मराठी माणूस आहेत. तर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जाऊ देत आहेत ते महाराष्ट्र द्रोही आहेत: सुषमा अंधारे

Jan 11, 2026 10:46 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: मुंबईकरांचे हीत जाणणारा कोणीही महापौर होईल: सुषमा अंधारे

मुंबई बीएमसीच्या गरजा काय आहेत? त्या किती प्रमाणात पूर्ण झालेल्या आहेत. त्याची पूर्तता किती झाली. हे मुद्दे चर्चेला यायला हवेत. बीएमसीच्या गरजा काय आहेत? महापौर शिंदेंचा व्हावा की भाजपचा व्हावा हे काही ठरलं आहे का? भाजपचा महापौर होण्यासाठी शिंदेसेना काम करत आहे. याहून दुर्दैव काय? सुषमा अंधारे

Jan 11, 2026 10:45 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: मराठी- हिंदू महापौर झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे: शीतल म्हात्रे

शिवसेनेमधून मुंबईचा महापौर हा मराठी व्हायला पाहिजे. जो मुंबईमध्ये मराठी बोलतो तो मराठी आहे. हा मराठा हिंदू आम्हाला मुंबईचा महापौर म्हणून बघायचे आहे. मराठी- हिंदू महापौर झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे: शीतल म्हात्रे

मुंबई बीएमसीच्या गरजा काय आहेत? त्या किती प्रमाणात पूर्ण झालेल्या आहेत. त्याची पूर्तता किती झाली. हे मुद्दे चर्चेला यायला हवेत. बीएमसीच्या गरजा काय आहेत? महापौर शिंदेंचा व्हावा की भाजपचा व्हावा हे काही ठरलं आहे का? भाजपचा महापौर होण्यासाठी शिंदेसेना काम करत आहे. याहून दुर्दैव काय? सुषमा अंधारे

Jan 11, 2026 10:44 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: मुंबईचा महापौर कोण होणार हे जनता ठरवणार: सना मलिक

मुंबईचा महापौर मुंबईची जनता ठरवणार आहे. संविधानाने सर्वांना अधिकार दिला आहे, निवडणुकीला उभे राहण्याचा, मतदान करण्याचा.. त्यामुळे कोण महापौर होणार?कोण नाही? हे कोणताही राजकीय पक्ष म्हणू शकत नाही: सना मलिक

Jan 11, 2026 09:32 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: युद्धात आणि प्रेमात सगळं माफ: विनोद तावडेंकडून अजित पवारांना क्लीनचिट

अजितदादांनी महायुती आणि आघाडीमध्ये धोरणात्मक निर्णय घेतला. याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने ते लढत आहेत. त्यामुळे प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. निवडणुका झाल्यानंतर सर्वजण एकत्र येतील: विनोद तावडे

Jan 11, 2026 09:31 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: उद्धव ठाकरेंचा हिंदूत्वावर बोलण्याचा अधिकार संपला: विनोद तावडेंचे टीकास्त्र

"उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची मांडणी करण्याचा आणि बोलण्याचा अधिकार संपला आहे. आरएसएसला उद्धव ठाकरेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आरएसएस १०० वर्ष काम करत आहे आणि ते कसे करत आहे हे सर्वांना माहित आहे. उलट उद्धव ठाकरे काही बोलले तर त्याचा आम्हालाच फायदा होईल": विनोद तावडे

Jan 11, 2026 09:30 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: एकाचवेळी अनेक निवडणुका आल्याने कंट्रोल सुटला: विनोद तावडे

यावेळच्या महानगरपालिका निवडणुका एकाचवेळी आल्या आहेत. त्यामुळे राज्यस्तरावरील नेत्यांचा कंट्रोल राहीला नाही. २९ महानगरपालिका एकाचवेळी आल्याने निर्णय घेताना काही चूका नक्कीच झाल्या. मात्र तो लक्षात आल्यानंतर लगेच दुरुस्तीही झाली, असे म्हणत विनोद तावडेंनी बदलापूर प्रकरणातील आरोपीची नगरसेवक म्हणून केलेली नियुक्ती चुकल्याचे मान्य केले आहे.

Jan 11, 2026 09:29 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: तरुणाईला महायुतीवर विश्वास: विनोद तावडे

आमचा आज जाहीरनामा प्रकाशित होतोय. विकासाच्या मुद्द्यावरच जनतेसमोर जायचे हे माननीय मोदींनी आम्हाला शिकवलं आहे. भाजप- शिवसेना युतीचे राजकारण हे मतदारांवर आधारित आहे. केम छो वरळी हे का म्हटलं गेलं? हा दुटप्पीपणा आहे. असा दुटप्पीपणा महाराष्ट्रात चालत नाही. आजच्या तरुणाईला विकास हवा आहे. कोणताही  भाषिक वाद नको आहे. त्यामुळे त्याला महायुती विकास करेल असा विश्वास आहे: विनोद तावडे

Jan 11, 2026 09:16 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: मुंबईच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही: विनोद तावडे

मुंबई खऱ्या अर्थाने चाकरमान्यांना, सामान्यांना राहण्यायोग्य करायची असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही. ठाकरे बंधु काही चॅलेंज उभे करतील ही हवाच निघून गेली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची लाईन सोडून ज्यापद्धतीने मुस्लिम मतदारांसमोर गुडघे टेकलेत, ज्या पद्धतीची ते वक्तव्य आली आहेत.. अशी भूमिका बाळासाहेबांनी कधीही घेतली नाही. भारतीय सैन्याबाबतही तुम्ही बोलता, मग तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये काय फरक राहिला? : विनोद तावडे

Jan 11, 2026 09:10 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: मुंबईकरांचा उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंवर विश्वास: विनोद तावडे

मुंबईमध्ये राज ठाकरेंचे काही चालणार नाही. त्यांना अपेक्षित जागाही मिळाल्या नाहीत. उद्धव ठाकरेंना मनसेसोबत प्रामणिक युती करायची होती तर त्यांनी जागा वाटपात  विचार करायला हवा होता. मुंबईकरांचा उद्धव ठाकरेपेंक्षा राज ठाकरेंवर जास्त आहे: विनोद तावडे

Jan 11, 2026 07:36 (IST)

NDTV BMC Powerplay LIVE Updates: मुंबईसाठी कोणाचे काय व्हिजन? दिग्गज नेते सांगणार प्लॅन

मुंबई शहराचे भविष्य कसे असेल? मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी कोणत्या नेत्याकडे कोणते व्हिजन आहे? याबाबतच एनडीटीव्हीच्या बीएमसी पॉवरप्लेमध्ये चर्चा रंगणार आहे. 

Jan 11, 2026 07:31 (IST)

BMC Powerplay LIVE Update: मुंबई महापालिकेचा रणसंग्राम... NDTV पॉवर प्लेमध्ये रंगणार चर्चांचा आखाडा

मुंबई महापालिकेचा रणसंग्राम... NDTV पॉवर प्लेमध्ये रंगणार चर्चांचा आखाडा