NEET UG 2025: महत्त्वाचं! NEET UG परीक्षेसाठी ड्रेसकोड बंधनकारक! शूज, जीन्सवर बंदी, वाचा सविस्तर

NEET UG 2025: चेन्स असलेल्या पॅन्ट घालून परीक्षा केंद्रावर येणे विद्यार्थ्यांनी टाळावे. परीक्षा केंद्रावर जोडे किंवा शूज प्रतिबंधित आहेत. फक्त चप्पल किंवा सँडल चालणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

संजय तिवारी, नागपूर: राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत नीट-2025 ही परीक्षा आज (4 मे) दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. नागपूर विभागातून 25 हजारांवर आणि एकट्या नागपूर जिल्ह्यातून 14 हजारावर विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षा केद्रांवर येण्यासाठी विद्यार्थ्यांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. काय आहेत या ड्रेसकोडचे नियम? वाचा सविस्तर..

(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, आज होणाऱ्या नीट परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. विद्यार्थी विद्यार्थिंनी करिता परीक्षा केंद्रावर येताना ड्रेस कोड विषयक नियम पाळायचे आहेत. विद्यार्थ्यांना फुल शर्ट घालता येणार नसून हाफ शर्ट किंवा टी शर्ट घालून परीक्षेला जायचे आहे. फुल शर्ट घातलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश नाकारण्यात येणार आहे.

मुलींनी सुद्धा हाफ बाजू असलेली कुर्ती किंवा टॉप परिधान करावा असे अपेक्षित आहे. पँट साधी पाकीट वाली चालेल. मात्र त्याला मेटल बटन नको. अनेक बटन, अनेक पाकिटे आणि अनेक चेन्स असलेल्या पॅन्ट घालून परीक्षा केंद्रावर येणे विद्यार्थ्यांनी टाळावे. परीक्षा केंद्रावर जोडे किंवा शूज प्रतिबंधित आहेत. फक्त चप्पल किंवा सँडल चालणार आहे.

नक्की वाचा - Badlapur News : बदलापूरकरांच्या डोक्याला 'ताप'; रेल्वेच्या तिकीट खिडकीमुळे मनस्ताप

मुलींनी देखील परीक्षा केंद्रावर येताना हाय हिल्स च्या चपला किंवा सँडल घालणं अपेक्षित नाही. कमी हिलची सँडल चालू शकेल. मुलींनी किंवा मुलांनी ज्वेलरी घालून परीक्षा केंद्रावर येऊ नये. त्यांनी दागिने घालून परीक्षा केंद्रावर येणे अपेक्षित नाही याशिवाय, हाताची घडी, गॉगल्स, कॅप किंवा टोपी परीक्षा केंद्रात चालणार नाही. त्याचप्रमाणे हेअर बॅन्ड, कडे, ताबिज, बेल्ट, अंगठी, कान-नाकाचे दागिने, गळ्यातील हार, बिल्ला, ब्रेसलेट, इत्यादी कोणत्याही धातूच्या वस्तू वापरून येण्यासही प्रतिबंध असेल.

Advertisement

दुसरीकडे, लातूर जिल्ह्यातून 20 हजार 801 विद्यार्थी नीट परीक्षेला सामोरे जाणार आहेत. त्यासाठी लातूर जिल्ह्यात 51 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. एकाच सत्रात 4 मे रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत होणाऱ्या या परीक्षेसाठी केंद्रावर 1.30 वाजण्यापूर्वीच बायोमेट्रिक हजेरीसाठी पोहोचावे लागणार आहे. दरम्यान, प्रशासनाने परीक्षेची जय्यत तयारी केली असून, परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

नक्की वाचा - Pahalgam Attack : भारताकडून पाकिस्तानची आर्थिक कोंडी; आयात आणि निर्यातीवर तात्काळ बंदी