Nitin Gadkari News: 'परमेश्वराचे ब्राह्मणांवर मोठे उपकार, आम्हाला आरक्षण..', नितीन गडकरींचे मोठे विधान!

Nitin Gadkari On Reservation Issue: केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आरक्षणावरुन सर्वात महत्त्वाचे विधान केले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Nitin Gadkari Big Statement On Reservation:  राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जोरदार संघर्ष पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पाहायला मिळत आहे. दुसरीकडे बंजारा, वंजारा समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. अशातच केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आरक्षणावरुन सर्वात महत्त्वाचे विधान केले आहे. 

काय म्हणालेत नितीन गडकरी?

'मी ब्राह्मण आहे, परमेश्वराने आमच्यावर सर्वात मोठे उपकार केले ते म्हणजे आम्हाला आरक्षण नाही,' असे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. कोणताही माणूस जात, धर्माने नाहीतर गुणधर्माने मोठा असतो, असेही ते पुढे बोलताना म्हणाले. 

Akola News : अकोल्यात कृषीमंत्र्यांसमोरच शेतकऱ्यांचा 'संताप', पांदण रस्त्यांवरून थेट विचारला जाब

" मी नेहमी गमतीने सांगतो की आमच्यावर परमेश्वराने मी ब्राह्मण जातीचा आहे, सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रामध्ये ब्राम्हणांच महत्व नाही पण उत्तर प्रदेश, बिहार मध्ये ब्राम्हणांच खूप महत्त्व आहे.  मी ज्यावेळी तिकडे जातो , दुबे, मिश्रा, त्रिपाठी त्यांचं राज्य पॉवरफूल आहे. जसे इकडे मराठा जातीचे महत्त्व आहे तस तिकडे ब्राम्हण पॉवरफुल आहे. मी त्यांना सांगतो मी जातपात पाळत नाही.  कोणीही माणूस जात, धर्म, भाषेने मोठा नसून गुणांनी मोठा होत असतो, असे विधान नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात केले.