"जो करेगा जाति की बात, उसको मारूंगा लात...", नितिन गडकरी असं का म्हणाले?

निवडणुकी वेळी मी मतदारांना सांगत होतो की मी आरएसएसचा आहे. मी हाल्फ चड्डीवाला आहे. त्यामुळे मतदान करताना विचार करून मतदान करा.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

देशाच्या राजकारणात जातींना एक वेगळं महत्व आहे.ऐवढचं काय कर जातीं शिवाय आपल्या देशाचे राजकारण हे अपूर्ण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निवडणुका असोत कींवा निवडणुकांनंतरची भाषण असोत, प्रत्येक ठिकाणी जातीचा उल्लेख हा केलाच जातो. ते तर आता अनिवार्य होवून बसले आहे. आता याच जातीच्या राजकारणाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रात एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. महाराष्ट्रात सध्या जातीपातीचे राजकारण होत आहे. मला विचाराल तर मी कधीही जात-पात मानली नाही असे गडकरी यावेळी म्हणाले. शिवाय आपल्या खास शैलीत 'जो मेरे सामने जात-पात की बात करेगा, मैं उसे लात मारूंगा' असे स्पष्ट पणे बोलले. 
 

गडकरी पुढे बोलताना म्हणाले की माझा लोकसभा मतदार संघात जवळपास 40 टक्के मुस्लिम मतदार आहेत. निवडणुकी वेळी मी मतदारांना सांगत होतो की मी आरएसएसचा आहे. मी हाल्फ चड्डीवाला आहे. त्यामुळे मतदान करताना विचार करून मतदान करा. नंतर पश्चाताप करण्याची वेळ येवू नये. जो मला मतदान करेल त्याचे मी काम करणार आहे. पण जो मतदान करणार नाही त्याचेही काम मी नक्की करणार आहे असे सांगितल्याचे गडकरी म्हणाले. 
 

Advertisement

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काही महिन्यावर येवून ठेपली आहे. मागील निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्षा झाला होता. पण भाजपला बहुमत मिळाले नव्हते. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली होती. मात्र हे  सरकार काही तासात कोसळले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण अडिच वर्षानंतर हे सरकारही कोसळले. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. आता या सरकारचाही कार्यकाळ संपत आहे. लवकरच निवडणुकांची घोषणा होईल. यावेळी राज्यातले चित्र वेगळे आहे. लोकसभेला राज्यातल्या जनतेने भाजपला नाकारत काँग्रेस आघाडीला साथ दिली. त्यामुळे आता होणारी विधानसभा निवडणूक ही चुरशीची होणार हे निश्चित आहे. त्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही तापला आहे. त्यात गडकरींचे हे विधान राज्याच्या राजकारणावर काय परिणाम करेल हे पहावे लागेल.  

Advertisement