Dhananjay Munde: करुणा मुंडेंचा विजय! धनंजय मुंडेंच्या वकिलांकडून मोठा खुलासा; 'लिव्ह इन रिलेशनशीप...'

करुणा मुंडेंसह मुलगी शिवानी मुंडेंना घरखर्चासाठी दरमहिना दोन लाख रुपये द्यावेत.. असा आदेशही कोर्टाने दिला आहे. या निर्णयानंतर आता धनंजय मुंडेंच्या वकिलांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News: वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे. करुणा शर्मा- मुंडे याच धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल वांद्रे न्यायालयाने दिला आहे. तसेच करुणा मुंडेंसह मुलगी शिवानी मुंडेंना घरखर्चासाठी दरमहिना दोन लाख रुपये द्यावेत.. असा आदेशही कोर्टाने दिला आहे. या निर्णयानंतर आता धनंजय मुंडेंच्या वकिलांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

"करुणा शर्मा यांनी 2022 मध्ये घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत माझे अशिल धनंजय मुंडे यांच्याकडून  मासिक भरपाईची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.यावर आता न्यायालयाने भरपाईचा आदेश दिला आहे.  महत्त्वाचे म्हणजे, न्यायालयाने श्री. धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. आदेश केवळ अंतरिम भरपाई देण्याचे निर्देश देतो, जो कोणत्याही हिंसाचाराच्या आरोपांवर नाही तर  आर्थिक विचारांवर आधारित आहे," असे स्पष्टीकरण वकील सायली सावंत यांनी दिले आहे. 

तसेच  "माझ्या अशिलाविरुद्ध कोणताही निकाल देण्यात आला नाही. हा आदेश केवळ अर्जदारांच्या आर्थिक गरजांवर आधारित देण्यात आला आहे, कोणत्याही चुकीच्या कृत्याच्या आधारावर नाही. धनंजय मुंडे यांनी स्वतः करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलांसोबत पूर्वी लिव्ह-इन संबंध असल्याचे कबूल केले होते, जो या आदेशाचा आधार बनला," असंही धनंजय मुंडेंच्या वकिलांनी म्हटले आहे.

Advertisement

नक्की वाचा - Palghar News : पालघरचा 'वाल्मीक कराड' कोण? जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत माजी आमदाराचा संतप्त सवाल

दरम्यान, "माध्यमांना विनंती आहे की जबाबदारीने व अचूक वृत्तांकन करावे आणि आदेशाबाबत कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या खोट्या वृत्तांकनापासून दूर राहावे. कोणत्याही मीडियाच्या व्यक्तीला काहीही शंका असल्यास ते रिपोर्टिंग करण्यापूर्वी वकिलांकडून स्पष्टीकरण मागू शकतात आणि असे स्पष्टीकरण देऊनच बातम्या प्रसिद्ध कराव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे. 

Advertisement