'त्या' एका गोष्टीमुळे ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' केला; बंडखोर खासदाराने जाहीरपणे सांगितली मनातील खरी खंत

Operation Tiger: ठाकरे गटाच्या 9 लोकसभा खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला आहे. या खासदारांनी पहिल्यांदाच पक्ष सोडण्याचं कारण सांगितलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Operation Tiger: ठाकरे गटाच्या खासदाराने पहिल्यांदाच पक्ष सोडण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई:

Operation Tiger: उद्धव ठाकरे गटाचे खंदे समर्थक आणि परभणीतून सलग 3 वेळा लोकसभेवर निवडून आलेले खासदार संजय जाधव यांनी अखेर ठाकरेंची साथ सोडली. महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'मुळे उडालेल्या प्रचंड खळबळ माजली असताना, संजय जाधव यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत का जात आहोत, याचे सर्वात मोठे कारण जाधव यांनी स्पष्ट केले. 

ठाकरे गटाच्या 9 लोकसभा खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला आहे. त्यामुळे ठाकरेंना अवघ्या 4 वर्षांत दुसऱ्या मोठ्या फुटीचा सामना करावा लागत आहे. पक्षबदलाच्या या संपूर्ण नाट्यावर पहिल्यांदाच जाहीरपणे बोलताना संजय जाधव यांनी थेट आर्थिक कोंडीवर बोट ठेवले आहे. आम्ही विरोधी बाकांवर असल्यामुळे मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी निधीच मिळत नव्हता, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

Advertisement

काय आहे कारण?

आपल्या मतदारसंघातील व्यथा मांडताना खासदार संजय जाधव म्हणाले की, माझ्या लोकसभा मतदारसंघात तब्बल 2,200 गावे येतात. लोक रोज मोठ्या आशेने आमच्याकडे येतात आणि आपापल्या गावातील कामांसाठी निधीची मागणी करतात. नांदेड-वर्धा रेल्वे लाईनचे काम गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित आहे, आम्ही 2 वर्षांपासून त्याचा पाठपुरावा करत आहोत. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. 

खासदाराला मिळणारा 5 कोटी रुपयांचा निधी अत्यंत मर्यादित असतो, त्यातून सर्व गावांचा विकास करणे अशक्य आहे. जेव्हा सत्तेकडून निधीच मिळत नाही, तेव्हा आम्ही जनतेला काय उत्तर देणार, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

( नक्की वाचा : Operation Tiger चा दुसरा अंक! खासदारांपाठोपाठ 14 आमदारही शिंदेंसोबत जाणार? ठाकरे गटाची धाकधूक वाढली )

उद्धव ठाकरेंबद्दल आदर, पण...

पक्षातील बंडखोरांना ठाकरे गटाकडून 'गद्दार' म्हटले जात असले, तरी संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की, माझे उद्धवजींबद्दल कोणतेही गार्हाणे नाही. लोक फक्त विकासाबद्दल विचारतात, कामे झाली नाहीत तर पुढच्या वेळी मतदान कसे करणार असे म्हणतात. त्यामुळे माझा पूर्ण भर केवळ विकासावर आहे. 

केंद्रीय यंत्रणांच्या कोणत्याही दबावाखाली हा निर्णय घेतलेला नाही. आमच्याकडे एवढी काही मालमत्ता नाही की तपास यंत्रणांनी आमच्यावर दबाव टाकावा. मतदारसंघातील विकासकामांसाठी सर्व खासदारांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.

Advertisement

पक्ष सोडून जात असलेल्या इतर खासदारांपैकी नागेश पाटील आष्टीकर आणि ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आष्टीकर यांनी सांगितले की, आम्ही आमच्या विचारसरणीशी कोणतीही तडजोड केलेली नाही, आम्ही फक्त एका शिवसेनेतून दुसऱ्या शिवसेनेत गेलो आहोत, असं सांगितलं.
 

Topics mentioned in this article