Crime News: ZP कार्यालयात भयंकर प्रकार! स्कॉलरशिपच्या नावाखाली विद्यार्थिनीशी नको ते केलं, मुलीने घडवली अद्दल

नराधम जिल्हा परिषद कर्मचाऱ्यावर पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा परिषद कार्यालयातील महिला सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर: 

Palghar News:  स्कॉलरशिपच्या नावाखाली विद्यार्थिनीशी गैरवर्तन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पालघर येथील जिल्हा परिषद कार्यालयात घडला आहे. यावेळी विद्यार्थिनीने तात्काळ प्रतिकार करत आरोपीच्या कानशिलात लगावली. या नराधम जिल्हा परिषद कर्मचाऱ्यावर पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा परिषद कार्यालयातील महिला सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

उघड

 ZP कार्यालयात विद्यार्थिनीशी विनयभंग 

समोर आलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्हा परिषद कार्यालयात स्कॉलरशिपची माहिती देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार  उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी कर्मचारी तानाजी डावरे (वय 45) याच्याविरोधात पोक्सो कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार १७ वर्षीय मुलगी १ एप्रिल रोजी बहिणीसह शिक्षण विभागात गेली असता, आरोपीने बोलण्याच्या बहाण्याने तिच्या अंगाला अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप आहे.

Advertisement

कठोर कारवाईची मागणी 

यावेळी मुलीने तत्काळ प्रतिकार करत आरोपीला चापट मारली आणि प्रकरण उघड झाले. घटनेनंतर मुलीने पालघर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ एफआयआर नोंदवत भारतीय न्याय संहिता कलम 74 तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे सरकारी कार्यालयातील महिला सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. मात्र जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी मनोज रानडे यांनी मात्र सदर कर्मचारी हा निश्चितच चांगला कर्मचारी आहे आणि त्याच्याकडून असं घडेल असं वाटत नाही असं म्हटलं आहे.

Pune News : पुण्यात 'या' भागातील पोलीस भरती दरम्यान भयंकर प्रकार, 9 उमेदवारांमुळे पोलिसांची झोपच उडाली

Topics mentioned in this article