VIDEO: पालघरमधील 2 मित्रांच्या मृत्यूचं गुढ उलगडलं! CCTVत दिसलं भयंकर दृश्य, भितीमुळे होत्याचं नव्हतं...

या अपघातात वैभव लहांगे (वय १४) याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वैभव कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून चालक नितीन वरठा (वय २२) घाबरून गेला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर

Palghar Accident News:  पालघरमधून एक काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. भरधाव दुचाकी सोलर लॅम्पला धडकून झालेल्या भीषण अपघातात १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर दुचाकी चालक तरुणाने जोडीदाराचा मृत्यू झाल्याने घाबरुन भितीने आयुष्य संपवले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या भयंकर अपघाताची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

Pune News: 65 वर्षांचा नराधम अन् 4 वर्षांची चिमुकली; पुण्यात गोठ्यामध्ये घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार

अपघातात मित्राचा मृत्यू, चालक तरुणानेही जीव दिला 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  पालघर तालुक्यातील नानीवली गावाच्या हद्दीत एक अपघातग्रस्त दुचाकी आढळून आली होती. अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला होता, धक्कादायक बाब म्हणजे अपघातस्थळापासून १५० मीटर अंतरावर एक तरुण झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच सीसीटीव्हीद्वारे तपास केला अन् या घटनेचा खुलासा झाला. 

Advertisement

दोन्ही मृत तरुण लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून मोटारसायकलवरून घरी परतत असताना भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असताना मोटारसायकल चालकाचे नियंत्रण सुटले आणि थेट सोलर लॅम्पला जोरात धडकले. या अपघातात वैभव लहांगे (वय १४) याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वैभव कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून चालक नितीन वरठा (वय २२) घाबरून गेला. 

 भीतीच्या भरात नितीनने स्वतःच्या पॅन्टच्या साहाय्याने जवळच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.   या दुहेरी दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, घटनेने नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.  हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबतची माहिती मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन (Probationary) सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार  सुशांत यांनी दिली आहे.

( नक्की वाचा : KDMC News: केडीएमसीमध्ये लाचखोरीची पन्नाशी पूर्ण! 40 हजारांसाठी लिपिकाने स्वाभिमान विकला