EXCLUSIVE: 'हा' मासा आता तुमच्या ताटात दिसणार नाही?, नामशेष होण्याच्या मार्गांवर आहे 'ही' प्रजाती

Silver Paplet way to extinction EXCLUSIVE Story: माशाचे उत्पादन घटत असल्याने त्याचे संवर्धन व्हावे या उद्देशाने हा दर्जा देण्यात आला आहे. मात्र मागील काही दशकांपासून पापलेटच्या उत्पादनात सातत्याने घट होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, प्रतिनिधी:

Silver Paplet way to extinction Special Story: "राज्य मासा" दर्जा लाभलेला "सरंगा अर्थात सिल्व्हर पापलेट" मासा सध्या नमाशेष होण्याच्या मार्गांवर आहे. पापलेटच्या पिल्लांची  दिवसेंदिवस बेसुमार मासेमारी होत असल्यामुळे वजनानुसार उच्च दर्जा लाभणारा 'सुपर सरंगा' मासा बाजारातून हद्दपार होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. याची करणे काय ?, कायद्यात काय तरतूद आहे. पापलेटच्या संवर्धणासाठी काय उपाय योजना करायला पाहिजेत, मच्छिमारांचे काय म्हणणे आहे. पाहूया याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट.

पापलेट म्हटलं कि, मत्स्याहारी खवय्यांच्या तोंडाला पाणी नाही सुटलं तर नवलच. चविष्ट, रुचकर, अन्य माशांच्या तुलनेत कमी काटे आणि भरपूर पोषणमूल्ये असल्याने पापलेट हा दर्दी, आणि नवख्यांचाही आवडीचा मासा. मुंबई पासून उत्तरेला  पश्चिम किनारपट्टीवर विशेषतः पालघर जिल्ह्यातील सातपाटी, वडारई, मुरबे, अर्नाळा, वसई येथील समुद्रात सापडणारा रुपेरी  'सरंगा' किंवा सिल्व्हर पापलेट माशाला सप्टेंबर २०२३ मध्ये महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून दर्जा मिळाला आहे.

तत्कालीन मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली होती, कारण हा मासा किनारपट्टीवरील मासेमारी अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा असून तो मोठया प्रमाणात निर्यातही केला जातो. स्थानिक पातळीवर या माशाचे उत्पादन घटत असल्याने त्याचे संवर्धन व्हावे या उद्देशाने हा दर्जा देण्यात आला आहे. मात्र मागील काही दशकांपासून पापलेटच्या उत्पादनात सातत्याने घट होत आहे. 

Akola News : अकोल्यात कृषीमंत्र्यांसमोरच शेतकऱ्यांचा 'संताप', पांदण रस्त्यांवरून थेट विचारला जाब

पापलेट हा मासा वजनानुसार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागला जातो. यामध्ये ५०० ग्रॅमहून अधिक वजनाच्या माशाला 'सुपर सरंगा' असे नाव देण्यात येते. याखालोखाल ३५० ते ५०० ग्रॅमचा एक नंबर, २००-३५० ग्रॅमचा दोन नंबर आणि १००-२०० ग्रॅमचा तीन नंबर आणि त्याखालील चौथा नंबर असा दर्जा दिला जातो. मात्र, अलीकडच्या काळात १०० ग्रॅमच्या आत असलेल्या पिल्लांचीच मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असल्याने मोठ्या आकाराचा पापलेट सापडण्याचे प्रमाण झपाट्याने घटले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मच्छिमार सहकारी संघांचे माजी अध्यक्ष आणि मच्छिमार नेते राजेंद्र मेहेर यांनी दिली. 

Advertisement

 सातपाटी मच्छीमार सोसायटीच्या आकडेवारी नुसार गेल्या बारा वर्षात पापलेटच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. पापलेटचे उत्पादन सरासरी वीस ते तीस टक्क्यावर आले आहे. निर्यातीसाठी मोठी मागणी आणि सर्वाधिक दर मिळणारा सुपर सरंग्याच्या उत्पादनात तर तब्बल 95 टक्के घट झाली असुन उत्पादन निव्वळ पाच टक्क्यावर आले आहे, असं बोट मालकांचे म्हणणे आहे.