संकेत कुलकर्णी, पंढरपूर
महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरा असणाऱ्या आषाढी यात्रेची तयारी आता सुरू झाली आहे. आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या प्रस्थानाच्या तारखा ठरल्या. आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 19 जून रोजी प्रसंत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 18 जून रोजी देहू आणि आळंदी येथून पंढरपूरला होणार आहे.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी राणा महाराज वासकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. 17 मुक्काम करत माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरला जाऊन पोहोचणार आहे. तर ६ जुलै रोजी पंढरपुरात आषाढीचा सोहळा रंगणार आहे.
आषाढीच्या तयारीसाठी चैत्र वारीपासूनच सुरुवात होते. तेव्हाच प्रस्थानाच्या तारखांची निश्चिती होते. बैठका व वारकऱ्यांची लगबग सुरू होऊन आषाढीचे वेध लागताना दिसतात.