पंढरपूर: महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणामधील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे पंढरीचा विठुराया. पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाला राज्यासह परराज्यातील भाविक गर्दी करत असतात. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीसह चैत्र वारीमध्ये मोठी यात्रा भरते. यंदाच्या चैत्र वारीमध्येही भाविकांचा महापूर पाहायला मिळाला होता, यावेळी मंदिराच्या दानपेटीत कोट्यवधी रुपयांची देणगी भाविकांनी अर्पण केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विठ्ठलाच्या चैत्री वारीमध्ये दानपेटीत 2कोटी 56 लाख रुपयांचे दान आले आहे. त्यामुळे गरिबांचा विठुराया कोट्याधीश झाला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या चैत्री यात्रेमध्ये एक कोटी 26 लाखाचे दान विठ्ठलाला मिळाले होते. तर यंदा यामध्ये एक कोटी 29 लाखाची भर पडली आहे. गेल्या चैत्री वारीच्या तुलनेत विठ्ठलाचे दान दुपटीने वाढले. यामध्ये विठ्ठलाच्या पायावर पंचवीस लाख रुपये तर देणगी पावतीतून 63 लाखाचे व इतर पूजा आणि योजनांमधून भरीव दान मंदिरास प्राप्त झाले आहे.
त्यासोबतच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी देवीवरील श्रध्देपोटी भाविकाकडुन वेगवेगळ्या स्वरुपातील दान अर्पन केले जाते. त्यात सोने चांदीच्या लहान मोठ्या वस्तु,रोख रक्कम आदींच्या समावेश असतो.मंदीरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या दानपेट्या गुप्त दानपेटीतही भाविक दान करतात त्यातुन गेल्या आर्थिक वर्षात तुळजाभवानी मातेच्या चरणी सुमारे 65 ते 70 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
(नक्की वाचा - Mumbai AC Local : मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या संख्येत वाढ, बदलापुरातून सकाळीही AC लोकल सुटणार)
भाविकांनी एक एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या आर्थीक वर्षामध्ये केलेल्या या दानात 48 कोटी 32 लाख दोन हजार 973 रुपये रोख रकमेचा समावेश आहे.त्याशिवाय 17 किलो 620 ग्रॅम सोने,256 किलो चांदीचा समावेश आहे.अभिषेक पुजा,सिंहासन पुजेमधुनही मंदीर समितीला उत्पन्न मिळते यामध्ये सशुल्क पासचाही समावेश आहे. या सर्वांचे माध्यामातून हे दान करण्यात आल आहे.