Panvel-Karjat: पनवेल-कर्जत प्रवास होणार फास्ट! लवकरच लोकल सुरु, कोणती स्थानके असणार? काय होणार फायदा?

नवी मुंबई आणि कर्जत-कल्याण पट्टा एकमेकांना थेट जोडला जाणार आहे. काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्टे? कुठून कसा असेल मार्ग? जाणून घ्या सविस्तर... 

जाहिरात
Read Time: 2 mins

Panvel-Karjat Suburban Railway Project: मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्यामध्ये आता पाचव्या कॉरिडॉरची भर पडणार आहे. मध्य रेल्वेचा (CR) अत्यंत महत्त्वाकांक्षी पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर असून, यामुळे नवी मुंबई आणि कर्जत-कल्याण पट्टा एकमेकांना थेट जोडला जाणार आहे. काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्टे? कुठून कसा असेल मार्ग? जाणून घ्या सविस्तर... 

पनवेल- कर्जत प्रकल्पाबाबत मोठी अपडेट 

मुंबईच्या रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक मोठे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय जाळ्यातील पाचवा कॉरिडॉर म्हणून ओळखला जाणारा 'पनवेल-कर्जत' प्रकल्प आता ८५% पूर्ण झाला आहे. मान्सूनपूर्वी उर्वरित नागरी कामे पूर्ण करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट असून, पावसाळ्यानंतर सुरक्षा चाचण्या आणि ट्रायल रन घेऊन हा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे. सध्या मध्य रेल्वेकडे मेन लाईन, हार्बर लाईन, ट्रान्स हार्बर आणि पोर्ट लाईन असे चार मार्ग आहेत.

Vasai Virar Politics: वसई-विरारमध्ये भाजपला खिंडार! ॲड. साधना धुरी यांचा 'बविआ'त प्रवेश

मुंबई रेल्वे विकास महामंडळाद्वारे (MRVC) अंदाजे ३,००० कोटी रुपये खर्चून हा २९.६ किमी लांबीचा मार्ग बांधला जात आहे.  पनवेल, चिखले, पोयंजे (मोहोपे), चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके या मार्गावर असतील. या प्रकल्पातील मुख्य आकर्षण म्हणजे २.६३ किमी लांबीचा 'वावर्ले बोगदा' (Wavarle Tunnel). हा मुंबई उपनगरीय रेल्वे जाळ्यातील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे. नाधल (२३४ मी), वावर्ले (२,६३९ मी) आणि किरवली (३३३ मी) असे एकूण ३.२ किमी लांबीचे बोगदे या मार्गावर आहेत.

मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये प्रथमच या मार्गावर, विशेषतः बोगद्यांच्या आत, 'बॅलास्टलेस ट्रॅक' (सिमेंट काँक्रीट स्लॅबचे रूळ) वापरण्यात आले आहेत. यामुळे रुळांची देखभाल करणे सोपे होईल आणि प्रवास अधिक वेगवान व सुरक्षित होईल. सध्या वावर्ले बोगद्यात या रुळांचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती MRVC चे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक योगेश शर्मा यांनी दिली आहे.

Advertisement

काय होणार फायदा?

१. थेट कनेक्टिव्हिटी: नवी मुंबईतील प्रवाशांना कर्जत, कल्याण आणि खोपोलीकडे जाण्यासाठी थेट रेल्वे मार्ग उपलब्ध होईल.
२. वेळेची बचत: सध्या पनवेलवरून कर्जतला जाण्यासाठी बदलापूर किंवा ठाणे मार्गे जावे लागते, नवीन मार्गामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
३. गर्दीचे नियंत्रण: सध्याच्या उपनगरीय मार्गांवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
४. पर्यावरणपूरक खबरदारी: हा मार्ग वनक्षेत्र आणि संवेदनशील झोनमधून जात असल्याने, पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी रेल्वेने विशेष खबरदारी घेतली आहे.
Crime News: पार्किंगचा वाद.. टोळक्याने गर्भवती महिलेसह पतीला घेरलं, पुढे भयंकर घडलं; संभाजीनगरमध्ये खळबळ

Topics mentioned in this article