चिमुकल्यांचा मृतदेह आईबापानं खांद्यावर घेतला, 15 किलोमीटरची पायपीट 'त्या' लेकरांबरोबर काय झालं?

आजोळी आल्यानंतर या चिमुकल्यांना ताप आला. त्यामुळे त्यांना डॉक्टरकडे नेण्या ऐवजी बुवाबाजी करणाऱ्याकडे नेण्यात आले.

जाहिरात
Read Time: 2 mins
गडचिरोली:

गडचिरोलीत एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अहेरी तालुक्यात पत्तीगाव हे गाव आहे. या गावी आपल्या आजोळी दोन चिमुकेल आले होते. बाजीराव वेलादी वय वर्ष सहा आणि दिनेश वेलादी वय वर्ष साडेतीन. आजोळी आल्यानंतर या चिमुकल्यांना ताप आला. त्यामुळे त्यांना डॉक्टरकडे नेण्या ऐवजी बुवाबाजी करणाऱ्याकडे नेण्यात आले. त्यांनी त्यांना जडीबूटी दिली. पण काहीच फरक पडला नाही. मग या लेकरांच्या आई वडीलांनी त्यांना जिमलगट्टा इथल्या ग्रामीण रूग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. पण पोहोचेपर्यंत या चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. धक्कादायक बाबम्हणजे त्यावेळी रूग्णालयात रूग्णवाहीका नव्हती. त्यानंतर ते मृतदेह खांद्यावर घेवून हे दाम्पत्य 15 किलो मिटरची पायपीट करत पत्तीगावात पोहोचले. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बाजीराव वेलादी आणि दिनेश वेलादी  हे चिमुके आपल्या आजोळी म्हणजे पत्तीगाव इथे आई वडीलांसह आले होते. त्यातला मोठा मुलगा बाजीराव याला ताप येत होता. त्यानंतर दिनेशलाही ताप आला. त्यानंतर या दोघांनाही बुवाबाजी करणाऱ्या पुजाऱ्याकडे नेण्यात आले. त्यावेळी पुजाऱ्याने त्यांना काही जंगली औषधं दिली. ती त्या दोघांनी घेतली. पण त्यांची तब्बेत काही सुधारली नाही. त्यांची तब्बेत आणखी बिघडली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मोठी बातमी : शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक

अशा स्थितीत जिमलगट्टा आरोग्य केंद्रात या दोघांना घेवून त्यांचे आईवडील निघाले. तिथं जाण्यासाठी  पत्तीगाववरून पक्का रस्ता नाही. अशावेळी भेटेल त्या मार्गाने या दाम्पत्यांनी आपल्या लेकरांना दवाखान्यात घेवून गेले. पण खूप उशीर झाला होता. दोन तासाच्या अंतराने या दोन्ही लेकरांचा जीव गेला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या दोघांचीही तपासणी केली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे वेलादी दाम्पत्याला सांगण्यात आले. वेलादी दाम्पत्यावर दुख:चा डोंगर कोसळला. पण त्यांच्या या वेदनांवर मिठ चोळण्याची धक्कादायक घटना त्याच्या पुढे घडली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मोठा निर्णय! शिवाजी महाराजांच्या सरदारांची वास्तू,वस्तू,समाधीचे जतन होणार

या दोन्ही लेकरांचे मृतदेह रूग्णावाहिकेतून पत्तीगावपर्यंत घेवून जायचे होते. पण रूग्णालयात रूग्णवाहीकाच उपलब्ध नव्हती. त्यावेळी देचलीपेठा इथून रूग्णवाहिका बोलवाली लागणार होती. अशा स्थितीत वेलादी दाम्पत्य आपल्या दोन्ही लेकरांना खांद्यावर घेवून तडक पत्तीगावच्या दिशेने निघालं. 15 किलोमिटरचं हे अंतर होतं. चिखल, नदी, नाले, कच्चा रस्सा तुडवत डोळ्यात अश्रू घेत हे दाम्पत्य पत्तीगावकडे निघालं. काही नातेवाईकांना हीघटना समजल्यानंतर दुचाकी त्यांच्या दिशेने पाठवण्यात आली होती. त्यावेळी ते चालत असल्याचा व्हीडिओ कुणीतरी काढला. तो नंतर समाज माध्यमावर व्हायरल झाला. पायपीट करत या दाम्पत्याने शेवटी आपलं घर गाठलं. 
 

Advertisement