1 hour ago

Maharashtra Live Updates:  सोमवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार जुंपल्याचे पाहायला मिळाले. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवरुन चर्चेसाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त ते आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. 

गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री आज  4.5 एमटीपीए स्टील प्लांटचा पायाभरणी समारंभ पार पडणार आहे. हा विदर्भातील पहिलाच प्रकल्प असून यात 24,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे तर 10,000 रोजगार निर्माण होणार आहेत. तसेच हेडरी ते कोनसरी स्लरी पाईपलाईनचे उदघाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यासोबतच विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. 

Jul 22, 2025 16:33 (IST)

नाशिक शहरातील चौक मंडई परिसरात जुना वाडा कोसळला

- नाशिक शहरातील चौक मंडई परिसरात जुना वाडा कोसळला 

- वाड्याखाली दहा ते पंधरा वाहन अडकल्याने मोठ नुकसान 

- बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाचे पथक दाखल 

- वाडा बंद असल्याने मोठी जीवितहानी टळली मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणावर

Jul 22, 2025 16:32 (IST)

Live Updates: माळशिरसच्या जवानाला कोची येथे वीरमरण

केरळ मधील कोची येथे माळशिरसच्या हवालदार यशवंत बाबर यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले आहे. केल्या 35 वर्षापासून माळशिरसच्या पानीव गावचे सुपुत्र हवालदार यशवंत बाबर हे लष्करी सेवेत कार्यरत आहेत. सध्या कोची येथील संरक्षण आणि सुरक्षा दलात यशवंत बाबर कर्तव्य बजावत होते. यावेळेस हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना विरमरण आले. हवालदार यशवंत बाबर यांच्या पार्थिवास कोचीच्या लष्करी मुख्यालयात मानवंदना देण्यात आली. यानंतर त्यांचे पार्थिव आज रात्री उशिराने पुणे येथे दाखल होईल तर रात्रीच माळशिरस तालुक्यातील पानिव या गावी हवालदार बाबर यांचे पार्थिव दाखल होईल. बुधवारी सकाळी दहा वाजता लष्करी इतमामात हवालदार बाबर यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Jul 22, 2025 16:28 (IST)

पाथरी सेलू महामार्गावर झालेल्या मुसळधार पावसानंतर वाहतूक बंद

परभणी जिल्ह्यातील पाथरी सेलू महामार्गावर झालेल्या मुसळधार पावसानंतर, परिसरात असलेल्या नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं असून, या मार्गावरील वाहतूक, आज सकाळपासून बंद झाली आहे. या मार्गावर असलेल्या कुंडी गाव परिसरामध्ये, असलेला ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आला आहे आणि हे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ओढ्याकाठावर असलेल्या काही शेतामध्ये देखील पाणी घुसले आहे.

Jul 22, 2025 15:18 (IST)

Live Updates: ओला उबेर चालक संघटनेची वाहतूक आयुक्तांसोबत महत्वाची बैठक

ओला उबेर चालक संघटनेची वाहतूक आयुक्तांसोबत महत्वाची बैठक 

बैठकीत तोडगा न निघाल्यास ओला उबेर टॅक्सी चालक उद्या बारा वाजता पासून संपावर जाणार. 

यासोबतच मुंबई पुणे सारख्या शहरांमधल्या प्रमुख रस्त्यांवरती चक्काजाम देखील केला जाणार. 

ओला उबेर चालक संघटने कडून बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी दबाव तंत्र

Advertisement
Jul 22, 2025 13:16 (IST)

Live Updates: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी मी राजीनामा देत असल्याचे धनखड यांनी म्हटले होते. अखेर त्यांचा राजीनामा आता स्वीकारण्यात आला आहे. 

Jul 22, 2025 12:32 (IST)

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मीक कराडचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडने आपण दोषी असल्याचा अर्ज न्यायालयाकडे केला होता. या अर्जावरती न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली दोन्ही वकिलांच्या युक्तीवादा नंतर निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता. मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडचा दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडून फेटाळण्यात  आला आहे.

Advertisement
Jul 22, 2025 12:31 (IST)

Live Updates: माणिकराव कोकाटेंची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे तक्रार, मविआच्या खासदारांनी घेतली भेट

महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची आज भेट घेतली. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने आणि वर्तणूकीमुळे चर्चेत आहेत. शेतकऱ्यांना अरेरावी करण्याचा प्रसंग असो की कर्जमाफीच्या संदर्भात केलेले विधान असो. त्यांनी आपल्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम केले आहे. त्यांच्या या असंवेदनशील वागण्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान तर होत आहेच तसेच राज्याच्या उज्ज्वल परंपरेला धक्का देखील बसत आहे. म्हणूनच त्यांचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांच्याऐवजी संवेदनशील आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा संवेदनशील कृषीमंत्री महाराष्ट्राला द्यावा अशी मागणी केली.

Jul 22, 2025 09:38 (IST)

Devendra Fadnavis Birthday: एकनाथ शिंदेंकडून CM फडणवीस यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस... एकनाथ शिंदेंकडून खास शब्दात शुभेच्छा!

Advertisement
Jul 22, 2025 09:36 (IST)

Ajit Pawar Birthday: डोळस विकासाचा निरंतर साथीदार.. एकनाथ शिंदेंकडून अजित पवारांना शुभेच्छा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस.. एकनाथ शिंदेंकडून दादांना खास शुभेच्छा...

Jul 22, 2025 08:45 (IST)

Live updates: प्रत्येक आमदाराचे रिपोर्ट कार्ड हर्षवर्धन सपकाळ स्वतः तयार करणार

पावसाळी अधिवेशनानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ॲक्शन मोडवर

प्रत्येक आमदाराचे रिपोर्ट कार्ड हर्षवर्धन सपकाळ स्वतः तयार करणार

पावसाळी अधिवेशनात कोणत्या आमदारांनी किती प्रश्न उपस्थित केले किती लक्षवेधी लावल्या आणि किती तास चर्चा केली या सगळ्याचा अहवाल हर्षवर्धन सपकाळ तयार करणार

विशेष म्हणजे सरकारच्या विरोधात कोणी आवाज उठवला आणि किती भाष्य केलं याची देखील नोंद ते आवर्जून घेणार

यंदा पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक दिसले नाहीत विरोधकांमध्ये एक मत देखील आढळून आलं नाही

मग ते पायऱ्यांवरचं आंदोलन असू दे किंवा सभागृहामध्ये एकत्र दिसणार विरोध असू दे या सगळ्यात विरोधक कमी पडले

यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी कठोर पावलं उचलून प्रत्येक आमदारच रिपोर्ट कार्ड तयार करण्याची प्रक्रिया स्वतः हाती घेतली आहे

Jul 22, 2025 08:20 (IST)

Live Updates: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कृतीवर महायुती मित्र पक्ष नाराज

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कृतीवर महायुती मित्र पक्ष नाराज - सूत्र 

भाजपा आणि शिवसेना कोकाटे यांच्या सध्याच्या वादावर नाराजी - सूत्र 

कोकाटे यापूर्वी वादग्रस्त विधान कृती यामुळे कुप्रसिद्ध, कोकाटे यांवर कारवाई करून सार्वजनिक संदेश देणे गरजेचे महायुती मित्र पक्षातील काही नेत्यांच  मत 

कोकाटे यावर कारावई करावी याबाबत एनसीपी पक्षातील नेत्यांतही दोन मतप्रवाह, 

अजित पवार यावर कोकाटे यावर  कारावई करावी यासाठी दबाव - सूत्र 

मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यात कोकाटेवर कारवाई करण्याबाबत चर्चा - सूत्र 

कोकाटे यांचा राजीनामा घ्यायची भूमिका अजित पवार घेणार का याकड लक्ष

Jul 22, 2025 08:18 (IST)

Live Updates: माणिकराव कोकाटे यांना पक्षाकडून समज

माणिकराव कोकाटे यांना पक्षाकडून समज 

पक्ष नेतृत्व माणिकराव कोकाटे यांच्या वर्तणुकीवर नाराज 

पक्ष नेतृत्वाने माणिकराव कोकाटे यांना जाब विचारला

पक्षाकडून कोकाटेंवर काय कारवाई केली जाणार ? याकडे लक्ष 

पक्षाकडून माणिकराव कोकाटे यांना जाब विचारल्याची माहिती 

आमदार रोहित पवारांनी कोकाटेंचा रमी खेळतानाचा वीडियो केला होता शेअर

Jul 22, 2025 08:15 (IST)

Hingoli News: हिंगोलीच्या बरडा गावातील महादेव मंदिरामध्ये शिरलं पुराचे पाणी, 3 जण अडकले

हिंगोली जिल्ह्यात काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सेनगाव तालुक्यातील बरडा येथील महादेव मंदिर परिसरामध्ये ओढ्याचं पाणी घुसलं असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, बरडा येथील महादेव मंदिरामध्ये तीन जन अडकल्याची प्राथमिक माहिती आहे त्यामध्ये एक जण महादेव मंदिराचा पुजारी असून एक शेतकरी आणि सालगडी देखील असल्याची माहिती मिळत आहे, या तीन जणांना वाचण्यासाठी प्रशासनाकडून रेस्क्यू टीम घटनास्थळी परवाना करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे..

Jul 22, 2025 07:49 (IST)

LIVE Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळला उद्योजकाचा मृतदेह

छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळला उद्योजकाचा मृतदेह

दौलताबाद धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी नाक्याजवळील पुलाखाली एका उद्योजकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

सागर रामभाऊ परळकर  असे या उद्योजकाचे नाव 

पत्नीला 'मी तासाभरात घरी पोहोचतो' असे फोन करून सांगितल्यानंतर काही तासांतच त्यांचा मृतदेह आढळला

हा अपघात की घातपात यावर संशय व्यक्त केला जात आहे

सागर परळकर हे वाळूज एमआयडीसीतील पुष्पक ऍग्रो कंपनीचे संचालक आहेत.

Jul 22, 2025 07:45 (IST)

Live Updates: आयपीएस जालिंदर सुपेकर यांना क्लिनचीट

आयपीएस जालिंदर सुपेकर यांना क्लिनचीट

जालिंदर सुपेकर यांची तत्कालीन नियुक्ती विशेष पोलिस महानिरीक्षक ( कारागृह) या पदावर होती 

मात्र वैष्णवी गव्हाणे प्रकरणात त्यांच्यावर आरोपीला मदत केल्याचे  झाले होते आरोप

याचदरम्यान कारागृहातील वस्तू खरेदी  प्रकरणात 448 कोटींची निविदा काढताना त्यांनी अपव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता 

गुप्ता आणि सुपेकर यांनी नियमबाह्य कंत्राटे दिल्याचा त्यांच्यावर ठपका होता 

यासंदर्भात वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता

मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात निविदा या नियमाप्रमाणेच काढल्या गेल्याचे म्हटले आहे

Jul 22, 2025 07:44 (IST)

Live Update: परिचारिका संपामुळे रुग्णांचे हाल

परिचारिका संपामुळे रुग्णांचे हाल

कामा, जे.जे, सेंट जॉर्जेस , जी. टी रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया देखील बंद

रुग्णालयात आरोग्य सुविधा मिळत नसल्याने रुग्ण आणि नातेवाईक स्वतःहून घेत आहेत डिस्चार्ज

नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची घेतली जात आहे मदत 

डॉक्टरही हैराण 

Jul 22, 2025 07:07 (IST)

Live Updates: एसटीच्या स्वच्छता सर्वेक्षणात 149 बस स्थानके नापास

एसटीच्या स्वच्छता सर्वेक्षणात १४९ बस स्थानके नापास

राज्यातील ५६८ बस स्थानकापैकी २०१ स्थानकांना ७० पेक्षा जास्त गुण 

२३ जानेवारी पासुन सुरू झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणात स्वच्छतेच्या आधारावर देण्यात आले होते गुण 

राज्यात दिवसाला ५५ लाखापेक्षा अधिक प्रवासी काम करतात

या अभिनयाचे पहिले सर्वेक्षण झाले आहे अजुन तीन सर्वेक्षण बाकी आहेत 

संबंधित विजेत्याना ३ कोटी रू बक्षीस महामंडळ देणार आहे

Jul 22, 2025 06:23 (IST)

Live Updates: हनी ट्रॅपमध्ये सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान आहे. हसन मुश्रीफ

हनी ट्रॅप मध्ये संजय राऊत यांच्याकडे काय असते तर त्यांनी विधानसभेत दाखवले असते. पण  विधान सभेत मुख्यमंत्री यांनी सांगितले की, नो हनी नो ट्रॅप, पण सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान आहे. विरोधी पक्षच काम संजय राऊत करत असतात. ते पत्रकार आहेत म्हणून प्रभावी पणाने करतात. अशा व्यक्तीला मंत्री हसन मुश्रीफ  यांनी केले. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Jul 22, 2025 06:22 (IST)

Live Updates: आदिवासी आश्रम शाळांना शिक्षक नेमवावे, आदिवासी संघटनांची मागणी

नाशिकच्या कळवण कळवण आदिवासी विकास प्रकल्पातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांअभावी आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून तातडीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नेमावे या मागणीसाठी कळवण तालुक्यातील सरपंच,  आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी शालेय शिक्षण व व्यवस्थापन समिती सदस्य, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कळवणच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन देऊन लवकरात लवकर शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

Jul 22, 2025 06:22 (IST)

Live Updates: कृष्णा व वारणा नदीकाठच्या गावांसाठी शक्तिपीठ ठरणार कर्दनकाळ - राजू शेट्टी

सांगली जिल्ह्यातुन जाणारा शक्तीपीठ महामार्ग कृष्णा व वारणा नदी काठाच्या गावांसाठी कर्दनकाळ ठरणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.कृष्णा आणि वारणा नदी काठावरील गावातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या भरावामुळे वारणा व कृष्णा नदीकाठच्या गावांना महापुराचा धोका अधिकचा निर्माण होणार असल्याची भीती राजू शेट्टींनी व्यक्त केली आहे.

Jul 22, 2025 06:21 (IST)

Live Updates: विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेत शिक्षण द्यायचे याचे अधिकार राज्य सरकारला

विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेत शिक्षण द्यायचे याचे अधिकार राज्य सरकारला

मात्र त्रिभाषा सूत्र कायम राहणार 

भाषा शिकवण्याबाबत केंद्र सरकारची जबरदस्ती नाही.

केंद्र सरकारने त्रिभाषी सूत्राबाबत आपली भूमिका केली स्पष्ट 

तीन पैकी दोन भाषा भारतीय असाव्यात यावर केंद्र सरकार ठाम 

डीएमके खासदार व्ही एम माथेश्वरम यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. 

यावर जयंत चौधरी यांनी दिले उत्तर 

आठव्या वर्षी पर्यंत पहिली भाषा मातृभाषा विद्यार्थ्यांनी शिकावी.

अकराव्या वर्षा पर्यंत दुसरी भाषा शिकावी.

तिसरी भाषा १४ व्या वर्षा पर्यंत वेगळी असावी

Jul 22, 2025 06:21 (IST)

Live Updates: वाढदिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीत

- वाढदिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीत

- नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सुद्धा होते गडचिरोलीत

- आज 4.5 एमटीपीए स्टील प्लांटचा पायाभरणी समारंभ

(हा विदर्भातील पहिलाच प्रकल्प, यात 24,000 कोटींची गुंतवणूक, 10,000 रोजगार निर्माण होणार)

- हेडरी ते कोनसरी स्लरी पाईपलाईनचे उदघाटन करणार

- हेडरी येथील आयर्न ओर आणि ग्राईंडिंग युनिटचे उदघाटन करणार (हे महाराष्ट्रातील पहिले युनिट)

- कोनसरी येथे पॅलेट प्लांटचे उदघाटन करणार

(हा महाराष्ट्रातील पहिला आणि एकाच रचनेतील भारतातील सर्वांत मोठा प्रकल्प)

- कोनसरीत 100 खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन

- कोनसरीत आधुनिक सीबीएसई शाळेचे भूमिपूजन

- सोनमपल्ली येथे लॉईडस टाऊनशीपचे भूमिपूजन

त्यानंतर दुपारी ‘हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र’ वृक्ष लागवड मोहीमेला उपस्थित राहणार

Topics mentioned in this article