1 day ago

Maharashtra Live Blog:  आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. हे अधिवेशन 21 ऑगस्टपर्यंत चालेल. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरळीत पार पडावे यासाठी रविवारी सर्वपक्षीय बैठकही झाली. त्यात सर्व पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले. या पावसाळी अधिवेशनात एकूण 51 राजकीय पक्ष आणि स्वतंत्र खासदार सहभागी होतील.

या 51 पक्षांचे 54 सदस्य आजच्या बैठकीला उपस्थित होते. बैठक सकारात्मक होती. सर्व नेत्यांनी आपापल्या पक्षांची भूमिका स्पष्ट केली आणि या अधिवेशनात उपस्थित करावयाचे मुद्दे मांडले. आम्ही सरकारच्या वतीने सर्व मुद्दे लिहून ठेवले आहेत. दुसरीकडे राज्यात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीमुळे राजकारण तापले आहे. या मारहाणीचा निषेध म्हणून लातूर बंदची हाक देण्यात आली आहे. 

Jul 21, 2025 22:50 (IST)

Live Updates: विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेत शिक्षण द्यायचे याचे अधिकार राज्य सरकारला

विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेत शिक्षण द्यायचे याचे अधिकार राज्य सरकारला

मात्र त्रिभाषा सूत्र कायम राहणार 

भाषा शिकवण्याबाबत केंद्र सरकारची जबरदस्ती नाही.

केंद्र सरकारने त्रिभाषी सूत्राबाबत आपली भूमिका केली स्पष्ट 

तीन पैकी दोन भाषा भारतीय असाव्यात यावर केंद्र सरकार ठाम 

डीएमके खासदार व्ही एम माथेश्वरम यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. 

यावर जयंत चौधरी यांनी दिले उत्तर 

आठव्या वर्षी पर्यंत पहिली भाषा मातृभाषा विद्यार्थ्यांनी शिकावी.

अकराव्या वर्षा पर्यंत दुसरी भाषा शिकावी.

तिसरी भाषा १४ व्या वर्षा पर्यंत वेगळी असावी

Jul 21, 2025 21:39 (IST)

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे पाठवला आहे. तब्येतीच्या कारणामुळे राजीनामा देत असल्याच त्यांनी राजीनामा पत्रात म्हटल आहे. 

Jul 21, 2025 16:53 (IST)

Live Updates: केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतानंदन यांचे निधन

केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतानंदन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 101 व्या वर्षी  त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीपीएमच्या संस्थापक सदस्यां पैकी ते एक समजले जात होते.  

Jul 21, 2025 13:06 (IST)

LIVE Updates: लातूर राडा भोवला! अजित पवारांकडून सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याच्या सूचना

मोठी बातमी! लातूर राड्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष यांना ंमोठा झटका बसला आहे. अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. 

Advertisement
Jul 21, 2025 12:49 (IST)

Live Updates: छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न 

मध्यरात्रीच्या सुमारास शिरसाठ यांच्या घरावर हल्ल्याचा झाला प्रयत्न 

मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका तरुणाकडून हल्ल्याचा प्रयत्न 

घरावर दगडफेक करत आरडाओरडा करत हल्ला

सौरभ घुले असा हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचं नाव 

मद्यधुंद अवस्थेत घरावर हल्ल्याचा प्रयत्न 

हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Jul 21, 2025 12:32 (IST)

Live Update: आरोपींची मुक्तता होणे गंभीर: उज्वल निकम

ज्या पुरावांच्या आधारावर मुंबई सत्र न्यायालय शिक्षा थोठवतो तेच पुरावे उच्च न्यायालयात टिकतं नसतील तर चूक कोणाची?  कायद्याचे विश्लेषण करताना चूक झाली की यंत्रनेणे चुकीचे पुरावे गोळा केले याचे पोस्टमार्टम यथावकाश होईल . परंतू आज आरोपीची मुक्तता होणे गंभीर आहे, मला खात्री आहे सरकार सर्वोच न्यायालयात अपील दाखल करेल: उज्वल निकम

Advertisement
Jul 21, 2025 12:24 (IST)

Live Updates: लातूरमधील घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह: अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो.  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे.  

माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या.

Jul 21, 2025 10:54 (IST)

Live Updates: छावा संघटना आक्रमक, धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचे बॅनर फाडले, दगडफेक केली

धाराशिव मध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उडवले पत्ते

धाराशिव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बॅनर फाडले, बॅनर वर कार्यकर्त्यांकडून दगडफेक, घटनास्थळी तणावाचे वातावरण, 

पोलिसांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

जुगाराचा राजीनामा झालाच पाहिजे, सुरज चव्हाणपट्टी करण्याची मागणी

Advertisement
Jul 21, 2025 10:34 (IST)

PM Modi: हे पावसाळी अधिवेशन देशासाठी गौरवशाली: PM नरेंद्र मोदी

हे पावसाळी अधिवेशन देशासाठी गौरवशाली ठरणार आहे. या सत्रात राष्टगौरव आणि विजयोत्सव साजरा करण्याचे हे सत्र आहे. या जल्लोषात एकसुराने सहभागी होऊ. संपूर्ण जगात भारतीय सैन्याच्या सामर्थ्याचा रुप दिसले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने जे लक्ष्य ठरवले होते ते 100 टक्के पूर्ण केले. आतंकवाद्यांच्या आकांना २२ मिनिटात ऑपरेशन सिंदूरमधून जमीनदोस्त केले.

यामध्ये मेड इन इंडिया सैन्य शक्तीच्या नव्या रुपाकडे जग आकर्षित झाले आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. संसद जेव्हा या विजयोत्सवाचा एकसुराने जल्लोष करेल तेव्हा भारतीय सैन्यशक्तीला बळ मिळेल. देशवासियांना प्रेरणा मिळेल. असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

Jul 21, 2025 09:26 (IST)

Live Updates: लातूर राड्यानंतर सुनील तटकरेंच्या सुरक्षेत वाढ, पोलिसांची फौज तैनात

लातूर मधील राड्यानंतर खासदार सुनील तटकरे यांच्या दौऱ्यातील पोलीस बंदोबस्तात वाढ 

प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या दौरादरम्यान विशेष पोलीस बंदोबस्त तैनात असणार

दौऱ्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षना मारहाण केल्याने मराठवाड्यात छावा संघटना आक्रमक

धाराशिव मध्ये देखील आंदोलन करण्याचा विविध संघटनांनी दिलाय इशारा

सुनील तटकरे हे सकाळी 11:00 च्या सुमारास तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार

Jul 21, 2025 09:25 (IST)

Beed News: बीड शहरातील एकनाथ नगर भागात चोरांचा सुळसुळाट...!

 बीड शहरातील एकनाथ नगर भागात पाण्याच्या टाकीजवळ चोरी झाल्याचं सीसीटीव्हीत कैद झाले आहे. यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पाहायला मिळत आहे. या भागात आता नागरिकांकडून पोलीस गस्त घालण्याची मागणी केली जात आहे. बीड शहरात गेले काही दिवसापासून चोरांचा सत्र वाढतच आहे. अनेक वेळा पोलिसांना सांगून देखील चोऱ्याचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यामुळे चोरांना अभय नेमकं कोण देतंय असा प्रश्न देखील नागरिकांना पडला आहे.

Jul 21, 2025 09:07 (IST)

Live Updates: लातूर मारहाण प्रकरण, सूरज चव्हाण यांनी व्यक्त केली दिलगिरी

काल आमच्या नेतृत्वाबद्दल काही असंविधानिक शब्द वापरला म्हणून राग अनावर झाला 

काल जी कृती आपल्या कडून झाली त्याची दिलगिरी व्यक्त करतो 

लवकरचं विजय घाडगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करणार

Jul 21, 2025 09:06 (IST)

Live Updates: राष्ट्रवादीच्या धाराशिव दौऱ्यातून सुरज चव्हाण यांचे नाव वगळले

राष्ट्रवादीच्या धाराशिव दौऱ्यातून सुरज चव्हाण यांचे नाव वगळले

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सुरज चव्हाण यांना मुंबईत बोलावून घेतल्याची सूत्रांची माहिती 

सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्यावरून मोठा गदारोळ 

धाराशिव मध्ये देखील सुरज चव्हाण यांना जाब विचारण्याचा देण्यात आला होता इशारा

Jul 21, 2025 08:29 (IST)

Live Updates: पहलगाम दहशतवादी हल्ल्या संदर्भात काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव दाखल

ब्रेकींगः पहलगाम दहशतवादी हल्ल्या संदर्भात कांग्रेसचा स्थगन प्रस्ताव दाखल 

लोकसभा आणि राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दाखल

लोकसभेत कांग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी तर 

राज्यसभेत कांग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला आणि रेणुका चौधरी यांनी स्थगन प्रस्ताव दिला आहे.

सर्व कामकाज बाजूला ठेवून 

पहलगाम हल्ल्यावर सरकारनं निवेदन द्यावं अशी मागणी दोन्ही खासदारांनी केलीय. 

शिवाय या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा करण्याची मागणीही करण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेची माहिती सभागृहाला द्यावी यावर विरोधक आक्रमक आहेत.

Jul 21, 2025 08:28 (IST)

Live Updates: माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ कुणी काढला याची चौकशी होणार

माणिकराव कोकाटे विधीमंडळ सभागृहातील व्हीडीओ नेमका कोणी काढला याची चौकशी विधीमंडळ करण्याची शक्यता - सूत्र 

कॅबिनेट मंत्री कोकाटे रमी प्ले गेम मोबाईलवर खेळत होते. त्यांचा व्हीडीओ रोहित पवार यांनी टीव्ट केला. आता त्यावरून मोठे राजकीय आरोप ही केले जात आहे. 

कोकाटे व्हीडीओ विधीमंडळ परिसरात शूट केला तो नेमका कोणी केला याचा तपास केला जाण्याची शक्यता विशेषतः विधीमंडळ कामकाज सुरू असताना मोबाईलवरून व्हीडीओ शूट करणे गैर आहे मग नेमका कोण व्यक्ती शूट केला याची चौकशी होण्याची शक्यता 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत काही आदेश देतील असं सूत्रांनी सांगितले

Jul 21, 2025 06:23 (IST)

Live Updates: छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाचे बॅनर फाडले

छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विजयकुमार घाडगे यांना मारहाण झाल्यानंतर नंदी स्टॉप परिसरातील अजित पवार आणि सुनील तटकरे यांचे फोटो असलेले बॅनर फाडले छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर आता त्याचे पडसाद ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत छावा संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी अनेक ठिकाणी लातूरमध्ये लागलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बॅनर हे फाडले आहेत.

Jul 21, 2025 06:22 (IST)

Live Updates: लातूर येथील घटनेचे नांदेडमध्ये पडसाद, नांदेड मध्ये छावा कडून टायर जाळून निषेध

लातूर येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद नांदेड मध्यदू उमटले .. नांदेड मध्ये रात्री छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केले .. लातूर घटनेच्या निषेधार्थ नांदेड मध्ये छावा संघटनेकडून टायर जाळून आंदोलन करण्यात आले .. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले 

Jul 21, 2025 06:21 (IST)

Live Updates: अजित पवारांचे सासरवाडीत झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

अजित पवारांचे सासरवाडीत झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

अजित पवारांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर वर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख 

धाराशिवकरांचे जावई प्रेम की नव्या बदलाची नांदी?

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच दुसरीकडे अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकल्याने चर्चांना उधान 

धाराशिव शहरात ऐन वर्दळीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी लावले बॅनर 

22 जुलै रोजी आहे अजित पवारांचा जन्मदिवस

Jul 21, 2025 06:20 (IST)

Mumbai News: मुंबई मध्यरात्री पासुन मुसळधार पावसाला सुरवात

मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसाची मध्य रात्री पासुन पुन्हा सुरवात 

मुंबई मध्यरात्री पासुन मुसळधार पावसाला सुरवात 

आज मुंबई , ठाणे शहरांना पावसाचा यलो अलर्ट मात्र दोन्ही शहरात मुसळधार पाऊस 

मुंबईकरांनी पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे

Jul 21, 2025 06:20 (IST)

Live Updates: आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार २१ जुलैपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन २१ ऑगस्टपर्यंत चालेल. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरळीत पार पडावे यासाठी रविवारी सर्वपक्षीय बैठकही झाली. त्यात सर्व पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले. या बैठकीनंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, संसदेच्या या पावसाळी अधिवेशनात एकूण ५१ राजकीय पक्ष आणि स्वतंत्र खासदार सहभागी होतील. या ५१ पक्षांचे ५४ सदस्य आजच्या बैठकीला उपस्थित होते. बैठक सकारात्मक होती. सर्व नेत्यांनी आपापल्या पक्षांची भूमिका स्पष्ट केली आणि या अधिवेशनात उपस्थित करावयाचे मुद्दे मांडले. आम्ही सरकारच्या वतीने सर्व मुद्दे लिहून ठेवले आहेत.