1 day ago

Maharashtra Live Blog: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त विधानांची मालिका काही थांबत नसल्याचे दिसत आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात ते रमी गेम खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली होती. माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता कोकाटे यांच्याकडून कृषिखाते काढून घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

Jul 25, 2025 20:29 (IST)

Live update : विदर्भात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा दिवस

पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात उद्या (शनिवार, 26 जुलै) ताशी 40 ते 50 किमी वेगाच्या सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

गोंदिया आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना विजेच्या कडकडाटासह अत्यंत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आलाय. तर नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, अमरावती जिल्ह्यांना मुसळधार ते खूप मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. उर्वरित संपूर्ण पश्चिम विदर्भात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून कित्येक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलीय. 

Jul 25, 2025 18:33 (IST)

Live Update: राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार! भाजप आमदारचे संकेत

उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राज्य मंत्रीमंडळात छोटा फेरबदल होऊ शकतो, असं भाकित चंद्रपूर जिल्ह्यातले भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केलं आहे. मात्र मोठ्या बदलाचे कोणतेही संकेत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा मंत्रीमंडळात समावेश असावा, ही आमची आग्रही मागणी आहे, असंही त्यांनी सांगितलं. 

Jul 25, 2025 13:23 (IST)

Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्या भेटीला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्या भेटीला…

संसद भवनात बैठक सुरू 

देवेंद्र फडणवीस यांच्या मॅराथॉन बैठका

Jul 25, 2025 11:56 (IST)

Live Updates: पुणे शहरात काय चाललंय ? गाड्यांची पुन्हा तोडफोड

पुणे शहरात काय चाललंय ?

शहरात पुन्हा  गाड्या तोडफोड

पुण्यात गाड्यांची तोडफोड सुरूच

फुरसुंगी पोलिस स्टेशन च्या हद्दीत गाड्यांची तोडफोड 

शिवशक्ती चौक आरु विहार सोसायटी येथील पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा फोडून तोडफोड दहशत 

 काही गुंडांनी हैदोस घातला गेले 6 महिन्यातील 2 वेळा हा प्रकार झाला

 तोडफोड करणाऱ्या एका आरोपीला  अटक 

तर इतर आरोपी फरार

Advertisement
Jul 25, 2025 11:50 (IST)

Beed Live Updates: महादेव मुंडे हत्या प्रकरण, आरोपींच्या मागणीसाठी रास्ता रोको

परळीतील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी परळीच्या कन्हेरवाडीत परळी अंबाजोगाई महामार्ग रोखून धरात रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आला आहे. महादेव मुंडे कुटुंब यांना न्याय द्या, आरोपींना तात्काळ अटक करा  असे फलक हातात घेऊन हा रोस्ता रोको सुरू  करण्यात आला आहे. या आंदोलनात महादेव मुंडे यांचे कुटुंब देखील सहभागी झाले आहे. 

Jul 25, 2025 10:51 (IST)

Live Updates: एसटी बस आणि दुधाची वाहतूक करणारा टेम्पो यांच्यात अपघात, 30 जखमी

रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील  ओणी - पाचल यारस्त्यावर एसटी बस आणि दुधाची वाहतूक करणारा टेम्पो यांच्यात अपघात झाला. सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास सौंदळमध्ये झालेल्या अपघातामध्ये 30 ते 35 जण जखमी झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रक चालक आणि क्लिनर यांना काही जास्त प्रमाणात दुखापत झाली असून रायपाटण त्यांच्यावरती ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. चालकाने वेगावरचे नियंत्रण गमावले आणि अपघात झाल्याचं एसटीतील प्रवाशांचे म्हणणं आहे.

Advertisement
Jul 25, 2025 10:16 (IST)

Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धक्का द्यायची तयारीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धक्का द्यायची तयारीत

एकनाथ शिंदे सीएम असताना झालेल्या वेगवेगळ्या खात्यातील थकीत  बिलाची पडताळणी केली जाणार

अनेक विभागांत अतिरिक्त बिल दाखवून शासनाचा पैसा लुटण्याचा प्रयत्न प्रशाकीय अधिकारी आणि कंत्राटदार करत असल्याचा संशय यातून थकित बिलाची फेरतपासणी केली जाणार - सूत्र

Jul 25, 2025 09:41 (IST)

Live Updates: काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार दिल्ली दौऱ्यावर

कॉंग्रेस नेते विजय वड्डेटीवार दिल्ली दौऱ्यावर

कांग्रेस पक्षानं नोटीस दिल्यानंतर वडेट्टीवार यांचा दिल्ली दौरा

जनसुरक्षा कायद्याबाबत आक्रमक भूमिका घेतली नसल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावली होती

वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट…

जनसुरक्षा विधेयकाबाबत विधानभवनात विधेयकाच्या विरोधात भूमिका न घेतल्याने विजय वड्डेट्टीवार यांना नोटीस बजावली आहे

त्यावर वड्डेट्टीवार काय चर्चा करतात हे पाहणं महत्वाचं

Advertisement
Jul 25, 2025 07:49 (IST)

Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

नांदगाव तालुक्यातील कासारी  गावाजवळील चांदेश्वरी धरण परिसरात आयशर आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत राहुल खोडके व रोहित खोडके  या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला, तर समाधान मेंगाळ हे गंभीर जखमी झाले.गॅस सिलेंडर भरून संभाजीनगरहून मनमाडकडे जात असताना आयशरची दुचाकीला जोरदार धडक बसली.या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला.जखमी समाधान मेंगाळ यास नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस करत आहेत..

Jul 25, 2025 07:21 (IST)

Live Updates: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी 

आज पासून आई तुळजाभवानीच्या भक्तांना मिळणार लाडूचा प्रसाद 

सकाळी साडेसात वाजता जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजारी यांच्या हस्ते शुभारंभ 

गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांकडून दर्शनाला येणाऱ्या भक्तांना प्रसाद मिळावा अशी करण्यात येत होती मागणी

Jul 25, 2025 07:08 (IST)

Live Updates: सात दिवसानंतर परिचारिकांचा संप मागे

पदनामात स्टाफ नर्स ऐवजी नर्सिंग ऑफिसर असा बदल कारण ही त्यांची मागणी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने केली मान्य 

या व्यतिरिक्त परिचारिकांसाठी पाळणाघर , सुसज्ज चेंजिग रुमसाठी संचालनालय स्तरावर बैठक घेऊन एक महिन्यात त्याची  अंमलबजावणी केली जाईल

परिचारिकांची रिक्त पदे आणि नवनिर्मित महाविद्यालयातील रिक्त भरण्यासाठी संचालनालयाकडून बिंदू नामावली तयार करून रिक्त पदे भरणार 

निवास स्थान मिळण्याबाबत देखील बैठक घेऊन अंमलबजावणी करणार

वेतनश्रेणी वाढीचा प्रस्ताव सादर करणार  

जी एन एम विद्यार्थ्याच्या विद्यावेतन वाढीबाबत संचालनालयाकडून  प्रस्ताव प्राप्त करून नियमानुसार कार्यवाही करणार 

मंत्री हसन मुश्रीफ आणि  सचिव धीरज कुमार यांच्या बरोबर ही बैठक पार पडली

Jul 25, 2025 06:36 (IST)

Live Updates: रमी खेळा.. जिंका आणि मला पाठवा, शेतकऱ्यांचे कृषिमंत्र्यांना साकडे

पावसाने शेतात पाणी साचले...आणलेले सोयाबीनचे बियाणे पेरता आले नाही,त्यामुळे पडून असलेले सोयाबीनचे बियाणे विक्रीतून आलेले ५५५० रुपये थेट राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मनीऑर्डरने पाठवून नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव येथील तरुण शेतकरी योगेश खुळे  यांनी ‘‘हे पैसे वापरून माझ्यासाठी एक रमीचा डाव खेळा आणि काहीतरी जिंकून पाठवा,’’ अशी  आगवेगळी विनंती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना करून सर्वांचे लक्ष वेधले.

Jul 25, 2025 06:36 (IST)

Live Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी अंतिम टप्प्यात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी अंतिम टप्प्यात 

ॲाक्टोबर - नोव्हेंबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार

विश्वसनीय सूत्रांची माहिती

तीन टप्प्यात निवडणूक होणार 

जिल्हा परिषद, नगर पालिका आणि महापालिका अशा टप्प्यात निवडणूका होणार

महापालिका निवडणूक शेवटी होणार

Jul 25, 2025 06:35 (IST)

Live Updates: मुंबई महापालिका वगळता महायुती एकत्र लढणार नाही

ब्रेकींगः स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक 

मुंबई महापालिका वगळता महायुती एकत्र लढणार नाही

पुणे आणि ठाणे महापालिकेत महायुती वेगळी लढणार

भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी एकत्र लढणार नाही

Jul 25, 2025 06:35 (IST)

Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजनाथ सिंह यांची दिल्लीत भेट

ब्रेकींगः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजनाथ सिंह यांची दिल्लीत भेट 

पीएमओ सचिवांशी झाली भेट

उद्या निर्मला सीतारामण आणि कृषी मंत्री शिवराज चौहान आणि नीती आयोगात बैठका 

उद्या दिल्लीत फडणवीसांच्या महत्वाच्या बैठका 

अमित शाहांना ही भेटण्याची शक्यता

Jul 25, 2025 06:34 (IST)

Live Updates: माणिकराव कोकाटेंकडून कृषीखाते काढून घेतले जाणार

Breaking: माणिकराव कोकाटेंकडून कृषीखाते काढून घेतले जाणार

कोकाटे यांचे कृषी खाते बदलले जाणार 

विश्वसनीय सूत्रांची माहिती

कोकाटे मंत्रीमंडळातच राहणार असल्याची माहिती