2 days ago

Maharashtra Live Blog: संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून लोकसभा तसेच राज्यसभेत विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. दुसरीकडे राज्यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी वाद चांगलाच गाजत आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढले जाणार असल्याच्याही चर्चा सुरु आहेत.

Jul 24, 2025 21:10 (IST)

धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची ती खरेदी नियमानुसारच - उच्च न्यायालयाचा निर्णय

तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदी साठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले असून, यास विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत.

 न्यायमूर्ती आलोक आराधे व संदीप व्ही. मर्णे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती या धोरणात्मक निर्णयाच्या विरोधात आरोपांची राळ उठवून व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन चुकीचे आरोप करण्यात आले होते. मात्र धनंजय मुंडे यांनी राज्य मंत्रिमंडळाची रीतसर मान्यता घेऊनच शेतकऱ्यांच्या हितासाठी हा धोरणात्मक निर्णय घेऊन सदर प्रक्रिया राबवली, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Jul 24, 2025 18:14 (IST)

Live Updates: केडीएमसीच्या 2 अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक

केडीएमसीचे दोन अधिकारी पैसे घेताना रंगेहात अटक 

ठाणे लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई 

घनकचरा विभागातील दोघे अधिकारी वसंत देवळूरकर आणि सुदर्शन जाधव असे या दोघांची नावे

आजारी असलेल्या कर्मचाऱ्याकडून परत कामावर रुजू करण्यासाठी घेतली आहे 20 हजारांची लाच 

40 वर्षाच्या केडीएमसी  इतिहासात 46  अधिकाऱ्यांनी कर्मचारी एसीपीच्या  जाळ्यात

Jul 24, 2025 17:35 (IST)

जेएनयू मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निदर्शने

जेएनयू मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निदर्शने केली. 

जेएनयू विद्यार्थ्यांनी केली निदर्शने

Jul 24, 2025 17:04 (IST)

पाटोदा ग्रामीण रुग्णालयासमोर भरधाव बसने पती-पत्नीला चिरडले

पाटोदा ग्रामीण रुग्णालयासमोर अत्यंत भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या बसने दुचाकीवर आलेल्या पती-पत्नींना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच चिरडून मृत्यू झाला. पाटोदा तालुक्यातील भाटेवाडी येथील रहिवासी असून आज पाटोदा येथील बाजार दिवस असल्यामुळे बाजारासाठी येत होते. संबंधित पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना रुग्णालयासमोर अचानक आलेल्या बसने त्यांना जबर धडक दिली.  बाळु केशव वायकर आणि  पत्नी लता बाळु वायकर यांचा जागीच मृत्यू झाला. सदरील बस ही नांदेडहून पुण्याकडे जात असताना समोरून अपघात झाला आहे.

Advertisement
Jul 24, 2025 17:03 (IST)

Live Updates: शौचालय चालकाला मारहाण प्रकरणी मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांना अटक

नांदेड शहरातील बस स्थानकातील शौचालय चालकाला मराठीच्या मुद्दयावरुन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिला होता. या प्रकरणी उत्तरभारतीय शौचालय चालक अमरेश झा याच्या तक्रारी वरुन वजीराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला. आज मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी अटक देखील केली. लघुशंखेसाठी महिलांकडून हा शौचालय चालक पाच रुपये आकारत होता. याचा जाब विचारणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांसोबत त्याचा वाद झाला. मराठीत बोलणार नाही. काय करायचं करा असं आव्हान अमरेश झा याने दिल्याने त्याला चोप देउन मनसेने माफी मागावी लावली होती. या प्रकरणात वजिराबाद पोलीसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्या विरोधात  कारवाई केली.

Jul 24, 2025 16:00 (IST)

Live Updates: मनसेचे मराठी पाट्यांसाठी मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन

 मनसे कार्यकर्त्यांनी मराठी पाट्यांसाठी आग्रही भूमिका घेत मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेलवर लावलेल्या गुजराथी पाट्या तोडल्या. हालोलि गावाजवळील कैलाश सरोवर हॉटेलची पाटी तोडून  आंदोलकांनी मराठी पाट्या सक्तीने लावण्याची जोरदार मागणी केली. मधील मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर ते आच्छाड पर्यंत असणाऱ्या काही हॉटेल्स च्या पाट्या ह्या गुजराती मध्ये होत्या. याविषयी  आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत ह्या पाट्या काढायला सुरुवात केली आहे.

Advertisement
Jul 24, 2025 12:31 (IST)

Live Updates: शिर्डी साईबाबा संस्थानला धमकीचा मेल, सुरक्षेत वाढ

शिर्डी साईबाबा संस्थानला दुस-यांदा धमकी मेल..

याआधी 2 मे रोजी असाच धमकी मेल आला होता.. 

तीन महिन्यात दुस-यांदा अशा प्रकारे धमकी मेल.. 

साई मंदिर आणि आतील खोल्यात चार नायट्रिक (IEDs) ठेवून उडवून देण्याचा मेल मध्ये उल्लेख..

सदर धमकी मेल काल ( 23 जुलै रोजी ) सकाळी साईसंस्थानला भगवंथ मान या नावाने प्राप्त झाला आहे..

साई संस्थानच्या वतीनं खबरदारी म्हणून शिर्डी पोलीसात गुन्हा दाखल..

खोडसाळपणा म्हणून धमकी मेल केल्याचा प्राथमिक अंदाज...

साई मंदिरात तसेच इतर ठिकाणी सुरक्षा यंत्रणेत वाढ..

Jul 24, 2025 11:09 (IST)

Live Updates: वसईमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ‟चक्काजाम” आंदोलन

वसईमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ‟चक्काजाम” आंदोलन.

आंदोलकांनी  टायर जाळून मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला

प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलकांनी पोलिसांनी घेतले ताब्यात.

शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी प्रहारचे राज्यव्यापी ‟चक्काजाम” आंदोलन.

प्रहार जनशक्ती पक्ष पालघर जिल्ह्याच्या वतीने  जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

Advertisement
Jul 24, 2025 09:25 (IST)

Live Updates: अंबिका कला केंद्रांमधील गोळीबार प्रकरण, 3 जण ताब्यात

दौंड मधील  अंबिका कला केंद्रांमधील गोळीबार प्रकरण

ग्रामीण पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

कला केंद्र व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून यवत पोलिसात आहे गुन्हा दाखल 

चार जणांविरोधात यवत पोलिसात गुन्हा दाखल 

सोमवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास झाला गोळीबार 

गोळीबारात कोणीही जखमी नाही 

बाळासाहेब मांडेकर,गणपत जगताप,चंद्रकांत मारणे यासह आणखी एका अनोळखीवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

या तिघांना घेतले ताब्यात

ग्रामीण पोलिसांची माहिती 

अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहे.

Jul 24, 2025 08:38 (IST)

Live Updates: नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी

- नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी

- काही भागात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता

- 31 जुलैपर्यंत शहरासह जिल्ह्यात पावसाचे जोरदार कम बॅक होण्याची शक्यता

Jul 24, 2025 08:32 (IST)

Live Updates: 2006 मुंबई रेल्वे ब्लास्ट प्रकरण, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

2006 मुंबई रेल्वे ब्लास्ट प्रकरण 

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज होणार सुनावणी

पुराव्यांच्या आभावे⁠ ब्लास्ट मधील आरोपींची निर्दोष मुक्तता मुंबई उच्च न्यायालयाने केली होती

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सुप्रीम कोर्ट कायम ठेवत की त्या निर्णयाला स्थगिती देत हे पाहणं महत्वाचं

जर सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली तर राज्य सरकारसाठी हा मोठा दिलासा असणार

Jul 24, 2025 07:37 (IST)

Beed News: वाल्मिक कराड असलेल्या कारागृहात कैद्याकडे चक्क मोबाईल, सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

जिल्हा कारागृहात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याची गँग ज्या तुरुंगात आहे. त्याच तुरुंगात आता एका न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याकडे चक्क मोबाईल सापडला आहे. कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. संशयास्पद हालचालीमुळे घेतलेल्या अंगझडतीत, त्या कैद्याच्या अंतर्वस्त्रात मोबाईल लपवून ठेवलेला आढळून आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास  आता पोलीस करतायेत.

Jul 24, 2025 07:25 (IST)

Live Updates: त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात VIP दर्शन बंद

- उद्यापासून सुरू होणाऱ्या पवित्र श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात अतिमहत्वाच्या व्यक्ती वगळता VIP दर्शन राहणार बंद

- भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता गर्भगृह दर्शन सर्व भाविकांसाठी राहणार बंद

- पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार मंदिर तर श्रावणी सोमवारी पहाटे 4 वाजताच मंदिराची दारं उघडणार

- भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी वातानुकूलित दर्शनबारीची व्यवस्था उपलब्ध तसेच  राजगिरा लाडूचा प्रसाद संस्थानकडून दिला जाणार

- पोलीसांकडूनही त्र्यंबकेश्वर शहरात अतिरिक्त बंदोबस्त दिला जाणार

Jul 24, 2025 07:02 (IST)

Live Updates: कृषीखातं माणिकराव कोकाटेंकडेच कायम राहणार, सूत्रांची माहिती

- कृषीखातं माणिकराव कोकाटेंकडेच कायम राहणार 

- सूत्रांची NDTV मराठीला माहिती 

- पक्षप्रमुख अजित पवारांनी कोकाटे यांना भेटायला बोलावल्याचीही होती फक्त चर्चा

- माणिकराव कोकाटे आजपासून तिन दिवस धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Jul 24, 2025 06:40 (IST)

Live Updates: मिरजेत मुकबधीर शाळेत राज्यातील पहिली कर्णबधिरांसाठी रोबोटीक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

 सांगली जिल्ह्यातील  मिरजेतील  भिडे मूकबधिर शाळा  येथे कर्णबधिरांसाठी महाराष्ट्रतील पहिली रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे.. त्याचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या रोबोटिक आणि एआय प्रशिक्षणामुळे कर्णबधिर मुलांना मुख्य प्रवाहात येण्यास मदत मिळणार आहे.  शिवाय हे मूकबधिर मुलं या क्षेत्रात आपलं करिअर करू शकतात त्यामुळे रोबोटिक प्रशिक्षण या मुलांसाठी वरदान ठरू शकते असे मत शाळेचे मुख्याध्यापक व प्रशिक्षक यांनी व्यक्त केले आहे. 

Jul 24, 2025 06:39 (IST)

Live Updates: स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषिमंत्री कोकाटेंच्या पुतळ्याचे दहन

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे.बुधगाव येथे संतप्त शेतकऱ्यांकडून कृषीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध नोंदवण्यात आला आहे.कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडून शेतकऱ्यांच्या बाबतीत वारंवार वादग्रस्त विधाने करण्यात येत आहेत, आता तर थेट विधान भवनामध्ये पत्ते खेळत असतात त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे, हा सर्व प्रकार लाजिरवाण्या असून शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कृषिमंत्र्यांची तातडीने हाकलपट्टी करण्यात यावी,अशी मागणी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे.

Jul 24, 2025 06:39 (IST)

Live Updates: अल्पवयीन विद्यार्थिनीचा सातत्याने करीत होता पाठलाग, आरोपीला अटक

डोंबिवलीत धक्कादायक प्रकार 

अल्पवयीन विद्यार्थिनीचा सातत्याने करीत होता पाठलाग

चार ते पाच महिन्यांपासून अल्पवयीन मुलीला तरुणाकडून त्रास देणे सुरू

रिलेशनशिप  ठेवण्यासाठी तिच्यावर टाकत होता दबाव

डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी स्वामी राठोड याला केली अटक 

Jul 24, 2025 06:38 (IST)

Live Blog: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली..  या सभेदरम्यान पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत असलेले बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण

यांचा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, राजाभाऊ लिमये आणि विद्यमान संचालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

दरम्यान बँकेचा एकूण व्यवसाय प्रथमच ५ हजार कोटीवर पोहचला असून ९४ कोटी रूपयांचा नफा मिळाला आहे. त्यामुळे बँकेने सभासदांना दरवर्षीप्रमाणे १५ टक्के लाभांश जाहिर केला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी यावेळी दिली.

Jul 24, 2025 06:37 (IST)

Live Updates: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची मुंबईत बैठक

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांची काल मुंबईत बैठक झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या मुंबईतील रायगड निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीमध्ये ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमधील विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. या सर्व निवडणुका महायुतीने सामोरे जाण्याचं शिंदे शिवसेनेनं निश्चित केलं आहे. आता हे दोन्ही नेते एकत्रित याबाबतची भूमिका जाहीर करतील, असे अपेक्षित आहे.