मंगेश जोशी, जळगाव: जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जळगावचा दौरा आटोपून मुंबईकडे परतणाऱ्या एकनाथ शिंदेंना विमानाच्या वैमानिकाने उड्डाण घेण्यास नकार दिल्याने उपमुख्यमंत्र्यांची चांगलीच पंचाईत झाली. वैमानिकांच्या ड्युटीची वेळ संपल्याने त्यांनी उड्डाण घेण्यास नकार दिला ज्यामुळे हा सगळा प्रकार घडला. अखेर गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या मध्यस्थीने हा घोळ मिटला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. आषाढी वारीनिमित्त संत मुक्ताईचा पालखी सोहळा आज पंढरपूर कडे प्रस्थान झाल्याने या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ताईनगर येथे आले होते. एकनाथ शिंदे यांची जळगाव विमानतळावर 3.45 येण्याची नियोजित वेळ होती मात्र तब्बल अडीच तास उशिरा 6.15 वाजता एकनाथ शिंदे हे जळगाव विमानतळावर पोहोचले त्यामुळे जळगाव ते मुक्ताईनगर असा वाहनाने प्रवास करत मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेऊन संत मुक्ताई च्या मंदिरात येतना शिंदे यांनी दर्शन घेतले.
मात्र नियोजित वेळेपेक्षा उशिरा आलेल्या एकता शिंदे यांना मुक्ताईनगर वरून जळगाव विमानतळावरती येण्यासाठी विलंब झाला त्यामुळे 9.15 मी मुक्ताईनगरवरून जळगाव विमानतळावर पोहोचले. मात्र टाईम झाल्यामुळे विमानाच्या वैमानिकांनी विमानाच्या उड्डाण भरण्यास नकार दिल्याने विमान प्राधिकरण व प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. दरम्यान मंत्री गिरीश महाजन गुलाबराव पाटील तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वैमानिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र वैमानिक आपल्या निर्णयावर ठाम होते. अखेर वैमानिकांसोबत बंदद्वार चर्चा करून 45 मी नंतर वैमानिकांनी विमानाच्या उड्डाणाला होकार दिला.
( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )
मात्र त्यामुळे एकनाथ शिंदेंना जळगाव विमानतळावर 45 मिनिटं प्रतीक्षा करावी लागली. मात्र याच विलंबाची एका किडनीने त्रस्त असलेल्या महिला रुग्णाला मदत झाली असून किडनी ट्रान्सपरंट करण्यासाठी मुंबईकडे निघालेल्या महिला रुग्णाला तात्काळ मुंबई त पोहोचायचे होते मात्र मुंबईकडे जाणारे विमान हे विमानतळावर पोहोचण्याआधीच निघून गेल्याने वेळेत मुंबईच्या रुग्णालयात पोहोचणे अशक्य होते. पण एकनाथ शिंदे यांचा विमान मुंबईकडे जाणार असल्याने याबाबत गिरीश महाजन यांना माहिती मिळाली व गिरीश महाजन यांनी महिला रुग्णासह तिच्या पतीला एकनाथ शिंदे यांच्या विमानाद्वारे मुंबईला सोडण्याची विनंती करण्यात आली.
शितल पाटील असे महिला रुग्णाचे नाव असून मुंबई विमानतळावरही रुग्णवाहिकेची सुविधा महिला रुग्णासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. दरम्यान, या घटनेवर गुलाबराव पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली असून एकनाथ शिंदे हे मागचे दिवस विसरले नसून कॉमन मॅन काय असतो हे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.