PCMC Election 2026: एबी फॉर्म गहाळ, घड्याळाचा घोळ! आता थेट निवडणूक अधिकाऱ्याची उचलबांगडी; नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादीच्या उमेदवार जयश्री भोंडवेंचा एबी फॉर्म पाटील यांच्याकडून गहाळ झाला. त्यामुळे स्वतःची चूक असताना ही पाटील यांना छाननीवेळी  अपक्ष उमेदवार ठरवण्यात आले होते. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:

Pimpri Chinchwad Municiple Corporation Election 2026: पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत एबी फॉर्म गहाळ झाल्याने मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अर्ज छाननीनंतर अपक्ष ठरलेल्या उमेदवाराला, चिन्ह वाटपात मात्र राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह द्यावं लागले. याप्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली असून एबी फॉर्म गहाळ करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांची बदली करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत एबी फॉर्ममुळे मोठा घोळ झाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार जयश्री भोंडवेंचा एबी फॉर्म पाटील यांच्याकडून गहाळ झाला. त्यामुळे स्वतःची चूक असताना ही पाटील यांना छाननीवेळी  अपक्ष उमेदवार ठरवण्यात आले होते. 

Latur News: रवींद्र चव्हाणांना घरचा आहेर; विलासराव देशमुखांबद्दलच्या विधानावर भाजप कार्यकर्त्यांचा संताप

 या विरोधात जयश्री भोंडवेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सीसीटीव्ही, व्हिडिओग्राफी, तसेच इतर तांत्रिक पुरावे सादर केले. यात तथ्य असल्याचं पाहून न्यायालयाने निवडणूक आयोगाला हे पुरावे तपासण्यासाठी स्वतंत्र सुनावणीचे आदेश दिले. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चिन्ह वाटपाच्या दिवशीच तातडीने सुनावणी घेतली. जयश्री भोंडवे यांनी वेळेतचं एबी फॉर्म सादर केला. हे त्यांच्या ही निदर्शनास आले. 

निवडणूक अधिकाऱ्याची बदली

त्यानंतर श्रावण हर्डीकरांनी जयश्री भोंडवेंचा एबी फॉर्म ग्राह्य धरला. त्यामुळं अर्ज छाननीच्या अंतिम यादीत अपक्ष ठरलेल्या जयश्री भोंडवेंना चिन्ह वाटपाच्या यादीत घड्याळ चिन्ह दिल्याचं जाहीर करण्यात आले. आता या प्रकरणात महत्त्वाची कारवाई करण्यात आली असून हा सगळा घोळ ज्यांच्यामुळे झाला ते निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटलांची आता बदली करण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  Badlapur News: बदलापुरात रात्रीच्या वेळी भयंकर घडतंय, धडकी भरवणारा VIDEO आला समोर)